येत्या २८ मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संसदेच्या नव्या इमारतीचे उद्घाटन केले जाणार आहे. मात्र मोदी यांच्याऐवजी देशाचे राष्ट्रपती किंवा लोकसभा अध्यक्षांच्या हस्ते या इमारतीचे उद्घाटन केले जावे, अशी भूमिका विरोधकांनी घेतली आहे. त्यासाठी काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, डीएमके, आम आदमी पार्टी (आप) या पक्षांसह एकूण २० पक्षांनी एकत्र येत संसदेच्या उद्घाटन कार्यक्रमावर बहिष्कार टाकला आहे. संयुक्त निवेदन जारी करत या पक्षांनी त्यांची भूमिका मांडली आहे. राजकीय हीत आणि निवडणुकीतील फायदा-तोटा लक्षात घेता विरोधी बाकावरील प्रादेशिक तसेच राष्ट्रीय पक्षांमध्ये बरेच मतभेद आहेत. यावेळी मात्र हे मतभेद दूर सारून अनेक पक्ष एकत्र आले आहेत. याआधीही मोदी सरकारचा विरोध करण्यासाठी अनेकदा हे पक्ष एकत्र आलेले आहेत. त्यांनी एकत्र येऊन एकजुटीने मोदी सरकारचा विरोध केलेला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा