Ram Rahim : हरियाणा निवडणुकीसाठी दोन दिवस उरलेले असताना डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरुमीत राम रहिम सिंग पुन्हा एकादा सुनारिया तुरुंगातून बुधवारी बाहेर आला आहे. भाजपा सरकारने राम रहिम सिंगला पुन्हा एकदा पॅरोलची रजा मंजूर केली आहे.

राम रहिमचा मुक्काम बागपतमध्ये

राम रहिम सिंग ( Ram Rahim ) हा उत्तर प्रदेशातल्या त्याच्या डेरा या ठिकाणी म्हणजेच बागपतमध्ये राहणार आहे. २० दिवसांचा पॅरोल त्याला मंजूर करण्यात आला आहे. ऑगस्ट महिन्यात राम रहिमला २१ दिवसांची फर्लो रजा मंजूर करण्यात आली होती, २ सप्टेंबरला संपली. यानंतर आता लगचेच म्हणजेच २ ऑक्टोबरला पुन्हा एकदा राम रहिम पॅरोलवर बाहेर आला आहे.

स्मृती इराणी दिल्ली विधानसभेची निवडणूक लढवणार? केजरीवालांना शह देण्यासाठी भाजपाचा प्लान काय? (फोटो सौजन्य पीटीआय)
Delhi Elections 2025 : स्मृती इराणी दिल्ली विधानसभेची निवडणूक लढवणार? केजरीवालांना शह देण्यासाठी भाजपाचा प्लान काय?
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
ajit pawar ncp latest news in marathi
अजित पवार स्वबळावर लढणार का ?
bjp deciding direction of campaign for the delhi assembly elections
लाल किल्ला : दिल्ली निवडणुकीची सूत्रे भाजपच्या हाती?
Sanjay Raut on MVA
Sanjay Raut on MVA: महाविकास आघाडी फुटली का? संजय राऊतांनी केलं स्पष्ट; म्हणाले, “आम्ही भाजपामध्ये असताना…”
Nitish Kumar
Nitish Kumar : नितीश कुमार ‘ॲक्शन मोड’वर; बिहार विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मंत्रिमंडळात मोठे फेरबदल करणार?
Image Of Ramdas Athawale
Ramdas Athawale : रामदास आठवलेंचा पक्षही दिल्लीच्या मैदानात, विधानसभा निवडणुकीसाठी जाहीर केले १५ उमेदवार
Hasan Mushrif
Hasan Mushrif : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत हसन मुश्रीफ यांचं विधान चर्चेत; म्हणाले, “आता पुढील निवडणुकीच्या…”

२०१७ मध्ये राम रहिमला २० वर्षांचा कारावास

२०१७ मध्ये डेरा सच्चाचा प्रमुख राम रहिम ( Ram Rahim ) याला दोन अनुयायी महिलांवर बलात्कार केल्या प्रकरणी २० वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सिरसा या ठिकाणी असलेल्या डेराच्या मुख्यालयात राम रहिमने या दोघींवर बलात्कार केला. या प्रकरणाला याच मुलींनी वाचा फोडली. ज्यानंतर राम रहिमला २० वर्षे तुरुंगवासाची शिक्षा झाली.ज्यानंतर तो राम रहिम आत्तापर्यंत फर्लो किंवा पॅरोलच्या रजेवर आत्तापर्यंत ११ वेळा तरी बाहेर आला आहे. तुरुंगाबाहेर त्याने जवळपास २७५ दिवस घालवले आहेत.

बलात्कारी राम रहिम निवडणुकीच्या तोंडावरच कसा बाहेर येतो?

हरियाणा निवडणुकीच्या तीन दिवस आधी राम रहिमला ( Ram Rahim ) पॅरोल रजा मंजूर करण्यात आली आहे. एवढंच नाही तर पंजाब आणि राजस्थानची निवडणूक होती तेव्हाही राम रहिम पॅरोल किंवा फर्लोच्या रजेवर तुरुंगाबाहेर होता. हरियाणात डेरा सच्चाचे भरपूर अनुयायी आहेत त्यामुळे त्याला पॅरोल मंजूर करण्यात आला आहे. २०२२ मध्ये राम रहिम ( Ram Rahim ) तीनवेळा बाहेर आला होता. फेब्रुवारी २०२२ मध्ये त्याला फर्लो रजा मंजूर झाली. त्यानंतर पंजाब निवडणुकीच्या वेळी त्याला रजा मंजूर करुन बाहेर काढण्यात आलं होतं. पंजाबच्या निवडणुकीत आपने काँग्रेसचा पराभव करत ११७ पैकी ९२ जागा जिंकल्या आणि एकहाती सत्ता मिळवली. या निवडणुकीत भाजपाला फक्त २ जागा मिळाल्या. तर शिरोमणी अकाली दलाला ३ जागा मिळाल्या तर काँग्रेसचे उमेदवार १८ जागांवर निवडून आले. त्यावेळी राम रहिमला ३० दिवसांची पॅरोल रजा मंजूर करण्यात आली होती. ज्यामुळे अनेकांच्या भुवया उंचवाल्या होत्या. १५ ऑक्टोबर २०२२ ते २५ नोव्हेंबर २०२२ या कालावधीतही राम रहिम रजा मंजूर करुन बाहेर होता. त्याकाळा अदामपूर या ठिकाणी पोटनिवडणूक होती. माजी मुख्यमंत्री भजनलाल यांचा या मतदारसंघावर तगडा प्रभाव आहे. या निवडणुकीत भजनलाल यांचा नातू भव्य बिश्नोई भाजपाच्या तिकिटावर निवडून आला.

हे पण वाचा- राम रहिमवर हरियाणा सरकारची ‘कृपा’, १४ महिन्यांत मिळाली १३३ दिवसांची पॅरोल, कायदाही बदलला

२०२३ मध्ये काय घडलं?

२०२३ मध्ये राम रहिम ( Ram Rahim ) ऑगस्ट महिन्यात ३० दिवसांच्या पॅरोलवर बाहेर होता. त्यावेळी हरियणात ग्रामपंचायत निवडणूक होती. या निवडणुकीतही भाजपाच्या अनेक उमेदवारांचा विजय झाला. त्यानंतर २१ नोव्हेंबर २०२३ ते १३ डिसेंबर २०२३ या कालावधीत राजस्थानच्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी राम रहिम बाहेर होता. या निवडणुकीत भाजपाचा विजय झाला. भाजपाला २०० पैकी ११५ जागा मिळाल्या आणि राजस्थानची एकहाती सत्ता मिळाली.

२०१४ मध्ये डेराचा भाजपाला पाठिंबा

२०१४ ची लोकसभा निवडणूक होती तेव्हा डेरा सच्चा सौदाने भाजपाला हरियाणातून खुला पाठिंबा जाहीर केला होता. या निवडणुकीत हरियाणातल्या १० पैकी सात जागा भाजपाने जिंकल्या होत्या. त्यानंतर त्याचवर्षी झालेल्या हरियाणा विधानसभा निवडणुकीत डेरा सच्चा सौदाने भाजपाला पाठिंबा दिला. या निवडणुकीतही भाजपाला विजय मिळाला होता.

हरियाणातली ही निवडणूक पार पडल्यानंतर भाजपाच्या अनेक दिग्गज नेत्यांना बाबा राम रहीमची ( Ram Rahim ) भेट घेतली होती. डेराच्या मुख्यालयाबाहेर व्हिआयपी वाहनांची रांग हा फोटो व्हायरलही झाला होता. २०१७ मध्ये राम रहिमला तुरुंगवासाची शिक्षा झाली तेव्हा त्यानंतर २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत राम रहीमने भाजपाला पाठिंबा दिला नाही. त्या निवडणुकीत राम रहीमने कुठल्याही पक्षाला पाठिंबा दिला नाही.

राम रहिमच्या इतक्या सुट्ट्या कुणालाच आत्तापर्यंत मिळालेल्या नाहीत

या वर्षाच्या सुरुवातीला डेराचा प्रमुख राम रहिम ( Ram Rahim ) पुन्हा एकदा पॅरोलवर बाहेर आला. १९ जानेवारी ते १० मार्च असा प्रदीर्घ काळ तुरुंगाबाहेरची सुट्टी त्याने उपभोगली. यावेळी काारण होतं ते लोकसभा निवडणुकीचं. राम रहिमचा ( Ram Rahim ) जावई आणि तीनदा काँग्रेस आमदार असलेल्या हरिमिंदर जस्सी यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आणि ते भाजपात गेले. लोकसभा निवडणुकीत भाजपाला हरियणातून दहा पैकी पाच जागा मिळाल्या तर काँग्रेसला पाच जागा मिळाल्या. या निवडणुकीतही राम रहिमने त्याचा पाठिंबा कुणाला आहे? हे सांगितलं नव्हतं. मात्र निवडणूक जिंकायची असली की बलात्कारी राम रहिमला तुरुंगाबाहेर काढा हे भाजपाचं सूत्र ठरलेलं आहे हेच या प्रसंगांवरुन दिसून येतं.

Story img Loader