महाराष्ट्राच्या राजकारणात ‘पवार’ कुटुंबाला आणि ‘बारामती’ शहराला एक वेगळेच स्थान आहे. कारण, ही दोन्ही नावे गेली पन्नास दशके या ना त्या कारणाने सातत्याने राजकीय आखाड्यात चर्चेत राहिली आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पडल्यानंतर लोकसभा निवडणुकीमध्ये बारामती मतदारसंघामध्ये ‘पवार विरुद्ध पवार’ अशी लढत पहिल्यांदाच पहायला मिळाली. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांचा पराभव करण्यात यश मिळवले. खरे तर दोन्हीही उमेदवार एकाच कुटुंबातले होते, त्यामुळे चर्चा तर होणार होतीच. लोकसभा निवडणुकीमध्ये पराभव झाल्यानंतर सुनेत्रा पवार यांना राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने घेतला आहे. त्यामुळे एकूण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पवार कुटुंबातील आणखी एक सदस्य राजकीय रणकंदनात उतरल्याचे चित्र आहे. पवार कुटुंबावर घराणेशाहीची टीका यापूर्वीही अनेकदा झाली आहे. स्वत: शरद पवार सध्या राज्यसभेवर खासदार आहेत. त्यांच्या कन्या सुप्रिया सुळे पुन्हा एकदा लोकसभेमध्ये निवडून गेल्या आहेत. शरद पवार यांचे पुतणे अजित पवार आणि नातू रोहित पवार महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आमदार आहेत. त्यातील अजित पवार उपमुख्यमंत्री पदावर आहेत. अशातच आता सुनेत्रा पवार यादेखील राज्यसभेमध्ये प्रवेश करणार असल्यामुळे पवार कुटुंबातील पाचवा सदस्य राजकारणात उतरला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा