जम्मू-काश्मीरमधील लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्समध्ये चर्चा झाली आहे. जागावाटपाबाबत नॅशनल कॉन्फरन्सचे उपाध्यक्ष ओमर अब्दुल्ला म्हणाले की, नॅशनल कॉन्फरन्सचे उमेदवार तीन जागांवर निवडणूक लढवतील आणि उर्वरित जागांवर आम्ही काँग्रेस उमेदवारांना पाठिंबा देऊ. उधमपूर, जम्मू आणि लडाखच्या जागांवर काँग्रेसचे उमेदवार असतील आणि अनंतनाग-राजौरी, बारामुल्ला आणि श्रीनगरच्या जागांवर नॅशनल कॉन्फरन्सचे उमेदवार असतील, असं काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सचे ठरले आहे. दुसरीकडे पीडीपीने मेहबूबा अनंतनाग-राजौरीमधून, वाहिद उर रहमान पारा श्रीनगरमधून आणि माजी राज्यसभा खासदार फयाज अहमद मीर बारामुल्ला मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे.

पीडीपीबरोबरच्या युतीच्या मुद्द्यावर ओमर अब्दुल्ला म्हणाले की, आम्ही एकत्र निवडणुका लढवण्याचा प्रयत्न केला होता, पण शक्य होऊ शकले नाही. आम्ही त्यांना लोकसभा निवडणुकीत आम्हाला मदत करण्यास सांगितले होते. आम्ही त्यांना विधानसभेत मदत करू, पण तसे काही झाले नाही. लोकशाहीत त्यांना कुठूनही निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे. नॅशनल कॉन्फरन्सने गुज्जर नेते मियाँ अल्ताफ लाहरवी यांना अनंतनाग-राजौरीमधून उमेदवारी जाहीर केली आहे. नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष आणि श्रीनगरचे विद्यमान खासदार फारूख अब्दुल्ला यंदा निवडणूक लढवणार नसले तरी त्यांच्या जागी ओमर अब्दुल्ला निवडणूक लढवणार का? हे अद्याप पक्षाने जाहीर केलेले नाही.

Uddhav Thackeray speech
“…अन् प्रियांका गांधींनी भाजपाचे दात घशात घातले”, पंतप्रधान मोदींच्या ‘त्या’ आव्हानाला उद्धव ठाकरेंचं प्रत्युत्तर
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Dhananjay Munde
Dhananjay Munde : “पंकजाताईने मन मोठं केलं म्हणून…”, धनंजय मुंडेंचं परळीकरांसमोर वक्तव्य; म्हणाले, “मतदारसंघात लोकसभा निवडणुकीवेळी…”
maharashtra assembly election 2024 narahari jhirwal vs sunita charoskar dindori assembly constituency
लक्षवेधी लढत : झिरवळ सलग तिसऱ्या विजयाच्या प्रयत्नात
rebels in mahayuti gives relief to patolas sakoli assembly constituency
लक्षवेधी लढत : महायुतीतील बंडखोरीने पटोलेंना दिलासा
maharashtra assembly election 2024 ramtek nagpur rebellion in one constituency party loyalty in another Congress MP ex minister in rebel campaign
एका मतदारसंघात बंडखोरी, दुसऱ्यामध्ये ‘पक्षनिष्ठा’; काँग्रेस खासदार, माजी मंत्री बंडखोराच्या प्रचारात
Tuljapur Devanand Rochkari, Tuljapur, Dheeraj Patil,
तुळजापुरात मैत्रीपूर्ण लढत की, आघाडीत बिघाडी? मविआचा अधिकृत उमेदवार कोण? रोचकरी की, पाटील?

जम्मू भागातील दोन जागांसाठी नॅशनल कॉन्फरन्स आणि पीडीपी दोन्ही पक्षांनी काँग्रेस उमेदवारांना पाठिंबा दिला आहे. जम्मूमध्ये रमण भल्ला आणि उधमपूरमध्ये चौधरी लाल सिंग यांना काँग्रेसनं निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. दरम्यान, नवी दिल्लीत काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सने सोमवारी अधिकृतपणे जम्मू-काश्मीर आणि लडाखसाठी त्यांच्या जागा वाटप कराराची घोषणा केली, ओमर यांच्यासह ज्येष्ठ काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांनी पत्रकार परिषदेत यासंदर्भात माहिती दिली. काँग्रेस उधमपूर, जम्मू आणि लडाखची जागा लढवणार आहे. तर नॅशनल कॉन्फरन्स काश्मीरच्या तीन जागांवर आपले उमेदवार उभे करतील.

हेही वाचाः भीम आर्मीचे चंद्रशेखर आझाद सपा आणि बसपाच्या उमेदवारांना टक्कर देणार; नगीना मतदारसंघ कोण जिंकणार?

पीडीपी अजूनही इंडिया आघाडीचा भाग आहे की नाही यावर खुर्शीद म्हणाले, पीडीपी आमच्या आघाडीमध्ये आहे. जागा वाटप हा आघाडीचा एक भाग आहे आणि एकूणच आघाडी हा वेगळा मुद्दा आहे. जम्मू-काश्मीर क्षेत्रफळाच्या दृष्टीने लहान असल्याने आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करूनही पीडीपीबरोबर जागावाटपाची चर्चा समाधानकारक झालेली नाही. तत्पूर्वी पीडीपीचे मुख्य प्रवक्ते सुहेल बुखारी यांनी इंडियन एक्स्प्रेसला सांगितले की, “आम्ही लढत असलेल्या तीन जागांव्यतिरिक्त इतर जागांवर काँग्रेसला आमचा पाठिंबा आहे. आम्ही त्यांना पाठिंबा दिला आहे आणि आता त्यांनीसुद्धा आम्हाला पाठिंबा दिला पाहिजे. काँग्रेस ही भाजपाच्या वर्चस्वाचा आव्हान देणारी सर्वात मजबूत शक्ती आहे, भाजपाचा उद्देश देशाच्या लोकशाही, घटनात्मक संविधानाचा नाश करणे आहे,” असंही सुहेल बुखारी म्हणालेत. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसच्या आघाडीने कारगिल स्वायत्त हिल डेव्हलपमेंट कौन्सिलची निवडणूक लढवली होती आणि भाजपाचा पराभव करून ती जिंकली होती. दोन्ही मित्रपक्ष एकत्र येऊन परिषद चालवत आहेत, तिची सर्वोच्च पदे वाटून घेतली आहेत. काश्मीर खोऱ्यातील चुरशीच्या निवडणूक लढाईची तयारी करताना जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० रद्द करण्याच्या विरोधात मेहबुबा भक्कमपणे उभ्या राहिल्या असून, जनतेनंही त्यांना पाठिंबा दिला आहे. जनतेसाठी लढा देण्यासाठी सगळ्यांना एकत्र घेऊन जाण्याची मेहबुबा मुफ्ती यांची योजना आहे. माझा आवाजच माझा जाहीरनामा असल्याचंही पक्षाच्या उमेदवारांची घोषणा करताना मेहबुबा मुफ्ती म्हणाल्या आहेत.

२०१९ च्या निवडणुकीत पीडीपीला काश्मीर खोऱ्यात मोठा धक्का बसला होता, भाजपाबरोबरच्या मागील युतीमुळे नॅशनल कॉन्फरन्सने तिन्ही जागा जिंकल्या होत्या. अनंतनागमध्ये नॅशनल कॉन्फरन्सचे नवोदित उमेदवार आणि निवृत्त न्यायाधीश हसनैन मसूदी यांनी मेहबूबा आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते जी. ए. मीर यांचा पराभव केला होता. जम्मू, उधमपूर आणि लडाखसह उर्वरित तीन जागा भाजपाने जिंकल्या होत्या. ऑगस्ट २०१९ मध्ये काश्मीर नेत्यांवरील कारवाईनंतर १४ महिन्यांच्या नजरकैदेतून मेहबुबांची सुटका झाली होती, त्यानंतर पहिल्या पत्रकार परिषदेत मेहबूबा यांनी त्यांच्या समोर पूर्वीच्या जम्मू आणि काश्मीर राज्याचा झेंडा घेऊन भाजपावर जोरदार हल्ला चढवला होता. मेहबूबा आणि ओमर दोघेही जानेवारी २०२३ मध्ये राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत जम्मू-काश्मीरच्या टप्प्यात त्यांच्याबरोबर एकत्र चालले होते. २०१४ मध्ये पीडीपीने भाजपाबरोबर युतीचे सरकार स्थापन केल्यानंतर नेहमीच पीडीपी अन् भाजपामध्ये वादाच्या बातम्या समोर आल्यात. भाजपाबरोबर सरकार स्थापन करण्याचा हा निर्णय जम्मू प्रदेशाच्या जनादेशाचा आदर करण्यासाठी होता, ज्याने भाजपाला प्रचंड मतदान केले होते, असंही पीडीपीनं त्यावेळी सांगितलं होतं. डिसेंबर २०२० मध्ये झालेल्या जिल्हा विकास परिषदेच्या निवडणुकीत गुपकर आघाडीने विजय मिळवला असला तरीही पीडीपी आणि नॅशनल कॉन्फरन्स या दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये मतभेद कायम आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी नॅशनल कॉन्फरन्सने त्यांना कोणतीही जागा देण्यास नकार दिला. खोऱ्यातील नॅशनल कॉन्फरन्सच्या कॅडरलाही जागांच्या सीमांकनामुळे निवडणुकीत जिंकण्याचा उत्साह आला असल्याचे समजते. श्रीनगरचा विस्तार मध्य काश्मीरच्या पलीकडे काही दक्षिण काश्मीर जिल्हे आणि अनंतनाग, पूंछ आणि राजौरीपर्यंत करण्यात आला आहे. प्रादेशिक मित्रपक्षांना डावलून पक्षाची बाजू न घेण्याकरिता इंडिया आघाडीचे कोणतेही वरिष्ठ नेते प्रचारासाठी जम्मू-काश्मीरला भेट देतील, अशी शक्यता नाही, असंही नॅशनल कॉन्फरन्सला वाटते. पीडीपी अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती अनंतनाग-राजौरी मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवत आहेत. डीपीएपीचे प्रमुख गुलाम नबी आझाद हेही येथून निवडणूक लढवत आहेत. PDP संसदीय मंडळाचे प्रमुख सरताज मदनी यांनी रविवारी (७ एप्रिल) काश्मीरमधील ३ जागांसाठी पक्षाच्या उमेदवारांची घोषणा केली होती. पक्षाच्या युवा शाखेचे अध्यक्ष वाहिद पारा हे श्रीनगरमधून आणि माजी राज्यसभा सदस्य मीर फयाज बारामुल्लामधून निवडणूक लढवत आहेत.