प्रफुल्ल खोडाभाई पटेल मुख्य प्रशासक असणा-या लक्षद्वीपमध्ये वाहतुकीचे गंभीर संकट उभे राहिले आहे.लोकांचा प्रदेश प्रशासनाविरुद्ध संताप वाढत आहे. लोकं रस्त्यावर उतरून निदर्शने निदर्शने करत आहेत. प्रशासनाकडून आंदोलकांना मोठ्या प्रमाणात अटक करण्यात आली आहे. प्रशासनाकडून केल्या जाणाऱ्या अटकेवरून मोठा वाद निर्माण झाला होता. या बाबत प्रशासनाने एक निवेदन जाहीर केले आहे. यात म्हटले आहे “की आंदोलकांकडून प्रामुख्याने प्रतिबंधात्मक आदेशांचे उल्लंघन करण्यात आले आहे”.खोट्या आणि “बनावट मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवू नये. प्रशासन विविध योजना, धोरणे, प्रकल्प इत्यादी सुरू करून बेटांच्या सर्वांगीण विकासासाठी पावले उचलत आहे”.
गेल्या काही वर्षांमध्ये बेटे आणि मुख्य भूभागादरम्यान धावणाऱ्या जहाजांची संख्या हळूहळू कमी झाली आहे. त्यांची संख्या सात वरून दोन झाली आहे.यजहाजांचे जहाजे कमी होण्या मागचं मुख्य कारण म्हणजे जाहाजांचे टप्प्याटप्प्याने बाहेर पडणे. यासाठी वेगवेगळी कारणे आहेत. जसे की डिकमिशनिंग, देखभाल आणि दुरुस्ती. उदाहरणार्थ, एम व्ही मिनिकोय आणि एम व्ही अमिनदीवी ही जहाजे कालिकतमधील बेपोर बंदरावर चालत असत. या जाहनांची वाहतूक थांबवण्या आली.या मार्गावरील सेवा अद्याप पूर्ववत झालेली नाही. लक्षद्वीप हा ३६ बेटांचा द्वीपसमूह आहे, त्यापैकी १० बेटांवर लोकवस्ती आहे. त्याच्या ६५००० लोकसंख्येपैकी एक मोठा भाग मुख्य भूभागावर अभ्यास करतो किंवा काम करतो किंवा अत्यावश्यक गोष्टींसाठी त्यावर अवलंबून असतो. त्यामुळे त्त्यांना वारंवार प्रवास करावा लागतो.
प्रवास करण्यात येत असलेल्या अडचणींमुळे लोक आक्रमक होऊ लागली आहेत. गुरुवारी बेटांना कोचीशी जोडणारी जहाज सेवा पुन्हा सुरू करण्याची मागणी करत विरोधकांनी राजधानी कावरट्टी येथील सचिवालयावर मोर्चा काढला. संपूर्ण मुस्लिम-वस्ती असलेल्या केंद्रशासित प्रदेशातील संवेदनशीलतेबद्दल प्रशासक पटेल उदासीन असल्याची माहिती मिळत आहे. ते २०२१ मध्ये प्रस्तावित गोहत्या बंदी, मध्यान्ह भोजनातून मांस आणि चिकन काढून टाकण्याचा निर्णय आणि आर्थिक नुकसानीचे कारण देत डेअरी फार्म बंद करण्यावरून निर्माण झालेल्या वादात सापडले होते हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे.