संतोष प्रधान

शिवसेनेच्या वर्धापनदिनाच्या पार्श्वभूमीवर ठाकरे आणि शिंदे गटांमध्ये परस्परांवर कुरघोडी करण्याची स्पर्धा लागली असली तरी जनता कोणाबरोबर आहे हे आगामी निवडणुकांमधील जनतेच्या कौलावरूनच स्पष्ट होईल. तोपर्यंत दोन्ही गट आम्हीच ताकदवाद हे दाखविण्याचा प्रयत्न करणार आहेत.

Uddhav Thackeray on Eknath Shinde
Uddhav Thackeray: “मिंध्या तू मर्दाची…”, एकनाथ शिंदेंवर टीका करताना उद्धव ठाकरेंचं आक्षेपार्ह विधान; वाचा काय म्हणाले?
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Eknath Shinde on Raj Thackeray
Eknath Shinde: राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात काय बिनसलं? शिंदे यांनी स्पष्टच सांगितलं; म्हणाले…
Eknath Shinde On Uddhav Thackeray :
Eknath Shinde : “बंद सम्राटांना कायमचं…”, मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंना मुंबईच्या सभेतून इशारा
Eknath Shinde allegation regarding Mahavikas Aghadi manifesto Jalgaon news
महाविकास आघाडीने जाहीरनामा चोरला; एकनाथ शिंदे यांचा आरोप
Shrikant Shinde criticizes Uddhav Thackeray over bag checking
बँगा तपासल्या तर आगपाखड कशासाठी ? श्रीकांत शिंदे यांची उध्दव ठाकरे यांच्यावर टीका
Uddhav Thackeray News Update News
“महाराष्ट्र दरोडेखोर अन् गुंडांच्या हाती”, उद्धव ठाकरेंची शिंदे गटावर सडकून टीका; पक्षचिन्हावरून माजी सरन्यायाधीशांनाही केलं लक्ष्य; म्हणाले…
present of MP Shrikant Shinde to promote Sulabha Gaekwad print politics news
सुलभा गायकवाडांच्या प्रचारासाठी अखेर खासदार शिंदे मैदानात

वर्धापनदिनाच्या पूर्वसंध्येला ठाकरे गटाच्या आमदार मनीषा कायंदे यांनी शिंदे गटात प्रवेश केला. हा पक्ष प्रवेश करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाला धक्का दिला. विधानसभेतील ४० आमदार फुटले असले तरी विधान परिषदेत ठाकरे गटाच फूट पाडण्यात शिंदे यांना यश येत नव्हते. अखेर ठाकरे गटाचा दुसरा आमदार फोडण्यात शिंदे गटाला यश मिळाले. या पक्ष प्रवेशाच्या वेळी शिंदे यांनी आपलीच शिवसेना खरी असून, बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारावर चालणाऱ्या पक्षाला जनतेचा पाठिंबा असल्याचा दावा केला. त्याआधी ठाकरे गटाच्या शिबिरात उद्धव ठाकरे यांनीही आपलीच शिवसेना जनमानसाच्या मनात असल्याचे सांगितले होते.

हेही वाचा >>> जमाखर्च: संजय राठोड,अन्न व औषध प्रशासन मंत्री; वाद अधिक, कामे कमी

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर झालेल्या पोटनिवडणुकांमध्ये अंधेरीत ठाकरे गट तर पुण्यातील कसबा पेठेत काँग्रेसने विजय मिळविला. अंधेरी पोटनिवडणुकीच्या वेळी भाजप आणि शिंदे गटाने ठाकरे गटाला शह देण्याचे बरेच प्रयत्न केले. अगदी उमेदवार रुजूता लटके यांचा मुंबई महानगरपालिकेतील नोकरीचा राजीनामा मंजूर होणार नाही अशी व्यवस्था केली होती. पण उच्च न्यायालयाने ठाकरे गटाला दिलासा दिला होता. अंधेरीत भाजपने आधी उमेदवारही जाहीर केला होता. पण ऐनवेळी भाजपने माघार घेतली होती. अंधेरीत पराभव स्पष्ट दिसत असल्यानेच भाजपने माघार घेतल्याचा आरोप तेव्हा उद्धव ठाकरे यांनी केला होता.

हेही वाचा >>> जमाखर्च : मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात रविंद्र चव्हाण ‘नामधारी’

मुंबई महानगरपालिकेसह राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर टाकण्यामागे भाजप आणि शिंदे गटाचा हात असल्याचा आरोपही ठाकरे गटासह काँग्रेस व राष्ट्रवादीने केला होता. शिंदे यांच्या बंडानंतर उद्धव ठाकरे यांना असलेली सहानुभूती मतांमध्ये रुपांतरित होण्याची भीती असल्यानेच भाजप अधिक सावध झाला होता. येत्या ऑक्टोबरमध्ये राज्यातील महानगरपालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. त्या निवडणुका झाल्याच तर शिवसेनेतील ठाकरे की शिंदे गटापैकी कोणाला राज्यातील जनतेचा पाठिंबा आहे हे स्पष्ट होईल. त्यानंतर लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका होतील. जनतेचा पाठिंबा ठाकरे की शिंदे गटाला आहे हे मतदान यंत्रातून जोपर्यंत स्पष्ट होत नाही तोपर्यंत दोन्ही गट आपणच खरे वा जनतेचा आपल्यालाच पाठिंबा हा दावा करीत राहतील.