दिगंबर शिंदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
उपमुख्यमंत्रीपदानंतर विधान सभेतील विरोधी पक्षनेता निवडताना पक्षाने पुन्हा डावलल्यामुळे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील नाराज असल्याची चर्चा सुरू असताना त्यांचे पुत्र प्रतीक जयंत पाटील यांच्या अभिनंदन फलकावरून पक्षाध्यक्ष शरद पवारांसह, विरोधी पक्ष नेते अजित पवार, खा. सुप्रिया सुळे यांची छायाचित्रे गायब झाल्याने सध्या सांगलीत जोरदार चर्चा सुरू झाली आहे. ही केवळ पक्षांतर्गत नाराजी दाखवण्याचा प्रकार आहे की त्यातून आगामी काळात वेगळी भूमिका घेण्यासाठी दरवाजा किलकिला करण्याचा प्रकार आहे याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे दिवंगत नेते आर. आर. पाटील यांचे पुत्र रोहित पाटील यांच्या अभिनंदन फलकावरून अशाच प्रकारे पक्षाध्यक्ष शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांची छायाचित्रे ‘अदृश्य’ झाली होती. या पार्श्वभूमीवर प्रतीक जयंत पाटील यांच्याबाबतही असाच प्रकार घडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. राज्यात सध्या सत्तांतराचे वारे सुरू असल्याने सर्वच पक्षांच्या नेत्यांभोवती संशयाचे ढग दाटून आलेले आहेत. याअंतर्गतच राष्ट्रवादीच्या या दोन ज्येष्ठ नेत्यांच्या मुलांच्या राजकीय प्रवासातील हे बदल सध्या राजकीय जगात सगळ्यांचेच लक्ष वेधून घेत आहेत.
हेही वाचा- सोलापुरात राष्ट्रवादीचे उरले सुरले गडही भाजपच्या रडारवर
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्यातील मातब्बर नेते जयंत पाटील यांचे राजकीय वारसदार म्हणून पुत्र प्रतीक यांच्या राजकारणातील पदार्पणासाठी गेल्या तीन वर्षांपासून जोरदार प्रयत्न केले जात आहेत. याचाच भाग म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या संवाद मेळाव्याच्या निमित्ताने त्यांचे जिल्ह्यात विविध ठिकाणी नाव पुढे राहील याची व्यवस्था करण्यात आली होती. सांगलीमध्ये तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात विधानसभेसाठी या जयंत पाटील यांच्या पुत्राला उमेदवारी देण्याची जाहीर मागणी करण्यात आली होती. या मागणीवर आमदार पाटील यांनी सूचक मौन पाळले होते.
दरम्यान मंगळवारी प्रतीक पाटील यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. या निमित्ताने शुभेच्छा जाहिराती मोठ्या प्रमाणात झळकल्या. या जाहिरात फलकांवर पक्षाच्या घड्याळ चिन्हासोबत केवळ वडील आमदार जयंत पाटील आणि आजोबा राजारामबापू पाटील यांचीच छायाचित्रे प्रसिध्द करण्यात आली आहेत. या जाहिराती इस्लामपूर व आष्टा शहर आणि वाळवा तालुका राष्ट्रवादी यांच्या वतीने प्रसिध्द करण्यात आल्या आहेत. मात्र, या जाहिरातीवर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार, विरोधी पक्ष नेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्या छायाचित्रांना अजिबात स्थान मिळालेले नाही. पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांची छायाचित्रे वगळण्याच्या या कृतीची सध्या जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
हेही वाचा- नांदेडमधून भाजपचा एक तरी मंत्री व्हावा यासाठी चिखलीकरांची मोर्चेबांधणी
महाविकास आघाडीच्या हाती सत्तासूत्रे आली त्यावेळी उपमुख्यमंत्रीपद मिळेल अशी आशा जयंत पाटील यांना वाटत होती. पण पवार कुटुंबातच अजित पवार यांना हे पद दिले गेले. आता सत्ताबदल झाल्यानंतर विरोधी पक्षनेतेपद तरी मिळेल असे जयंत पाटील यांना वाटत होते. पण अखेरच्या क्षणी पुन्हा अजित पवार यांच्याकडे विरोधी पक्षनेतेपद दिले गेल्याने जयंत पाटील पक्ष नेतृत्वावर नाराज आहेत का, अशी शंका व्यक्त होत आहे. या नाराजीतूनच मुलगा प्रतीक पाटील यांच्या शुभेच्छा जाहिरातीतून पक्षाच्या जेष्ठ नेत्यांची नावे वगळली आहेत का, अशी शंकाही उपस्थित होत आहे. ही कृती सहज आहे, की आगामी राजकारणासाठी दरवाजा किलकिला करण्याचा प्रकार याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.