Piyush Goyal Remark : केंद्रीयमंत्री पीयूष गोयल यांनी राज्यभेत चर्चेदरम्यान एक विधान केलं, होतं ज्यावरून प्रचंड गदारोळ झाला आणि अखेर पीयूष गोयल यांना आपलं विधान मागे घ्यावं लागलं.
पीयूष गोयल यांनी विरोधकांना उद्देशून म्हटलं होतं की, हे लोक संपूर्ण देशाला बिहार बनवतील. त्यांच्या विधानानंतर विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली आणि गोयल यांनी माफी मागीवी अशी मागणी केली. विरोधकांच्या मागणीनंतर गोयल यांनी आपल्या वक्तव्याबाबत स्पष्टीकरण दिले.
गोयल म्हणाले, मी एक गोष्ट स्पष्ट करू इच्छितो, की माझा बिहार किंवा बिहारच्या लोकांचा अपमान करण्याचा काहीच हेतू नव्हता. जर यामुळे कोणाच्या भावना दुखवाल्या असतील, तर मी तत्काळ माझे विधान मागे घेतो.
केंद्रीयमंत्री पीयूष गोयल यांनी बिहारबाबत केल्या वक्तव्यानंतर विरोधकांनी हा बिहारच्या जनतेचा अपमान असल्याचं म्हटलं. याशिवाय खासदारांनी गांधी पुतळ्यासमोर विरोध प्रदर्शनही केले. यावेळी काँग्रेस, राजद, डावी आघाडी आणि शिवसेनेसह जवळपास सर्वच विरोधी पक्षांच्या खासदारांची उपस्थिती होती.
या खासदारांनी पीयूष गोयल यांनी आपल्या वक्तव्याबाबत माफी मागावी अशी मागणी केली. याशिवाय राजदचे खासदार मनोज झा यांनीही राज्यसभेत हा मुद्दा मांडत पीयूष गोयल यांनी माफी मागावी अशी मागणी केली होती.
संसदेत गदारोळ –
केंद्रीयमंत्री पीयूष गोयल यांच्या वक्तव्याशिवाय अन्य मुद्य्यांवरूनही संसदेत जोरदार गदारोळ पाहायला मिळाला. संसदेच्या हिवाळी अधिवेशनात चीन आणि महागाईसह अन्य अनेक मुद्य्यांवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी पाहायला मिळाली आहे. विरोधक सातत्याने सरकारला चीनच्या मुद्य्यावर चर्चा करण्याची मागणी करत आहेत.