यवतमाळ – पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लोकसभा निवडणुकीपूर्वी येत्या बुधवारी यवतमाळ जिल्ह्यात दौऱ्यावर येणार आहेत. यापूर्वीचा त्यांचा नियोजित दौरा पुढे ढकलण्यात आल्यानंतर आता २८ फेब्रुवारीरोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत यवतमाळ येथे भव्य महिला मेळावा होणार आहे. २०१४ पासून लोकसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यवतमाळात सभा घेण्याचा पायंडा या निमित्ताने कायम राहिला आहे.

२८ फेब्रुवारी रोजी यवतमाळ शहरालगत नागपूर मार्गावरील भारी शिवारात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत बचत गटांच्या महिलांचा मेळावा होणार आहे. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा आणि महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्या पुढाकाराने हा मेळावा होत असला तरी संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा या मेळाव्याच्या तयारीला लागली आहे. जवळपास दोन लाख महिला या मेळाव्याला येण्याचा अंदाज आहे. ४३ एकर खुल्या जागेवर ही सभा होणार असून २६ एकरवर मंडप उभारण्याचे काम सुरू आहे.

Yogi Adityanath who made the statement Batenge to Katenge now has a different slogan Pune news
‘बटेंगे तो कटेंगे’ असे वक्तव्य करणारे याेगी आदित्यनाथ यांचा आता ‘हा’ नारा
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
During the speech of Devendra Fadnavis the chairs started emptying nashik news
देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणावेळी खुर्च्या रिकाम्या होण्यास सुरुवात
Narendra Modi Kharghar, Narendra Modi latest news,
पंतप्रधानांच्या आगमनाच्या अखेरच्या क्षणापर्यंत सरकारची स्वच्छ खारघर मोहीम सुरूच
nehru literature soon in one click available on digital form on mobile
नेहरूंचे साहित्य लवकरच एका क्लिकवर!
Mumbai traffic routes marathi news
मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी वाहतुकीत बदल
jupiter retrograde 2024
५ दिवसांनंतर शनी-गुरू करणार कमाल; ‘या’ तीन राशींच्या दारी नांदणार लक्ष्मी
election day fun facts election day activities voting activities on Election Day
मतदान दिनाच्या गमतीजमती!

हेही वाचा – मोदी सरकारविरोधात बोलणं सत्यपाल मलिकांना भोवणार? सीबीआयच्या छापेमारीनंतर राजकीय चर्चांना उधाण!

२०१४ पासून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा जिल्ह्यात येत आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधानपदाचे दावेदार असताना नरेंद्र मोदी यांनी आर्णी तालुक्यातील दाभडी येथे शेतकऱ्यांसमवेत ‘चाय पे चर्चा’ करून शेतमालास हमीभाव देण्याची ग्वाही दिली होती. त्यानंतर ते पंतप्रधानपदी विराजमानही झाले. मात्र शेतकरी अद्यापही हमीभावासाठी आंदोलन करीत आहेत. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी केळापूर येथे महिला मेळाव्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आले होते. त्यावेळीसुद्धा महिलांसाठी अनेक योजनांची घोषणा त्यांनी केली होती. आता तिसऱ्यांदा ते लोकसभा निवडणुकीपूर्वीच महिला मेळाव्यासाठी यवतमाळला येत आहेत. या सभेत महिलांसाठी केंद्र व राज्य शासनाने राबविलेल्या विविध योजनांचा आढावा घेण्यासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित महिलांना भावनिक साद घालून लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकण्याची शक्यता आहे. पंतप्रधानांच्या सभेनंतर काही दिवसांतच लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होते. त्यामुळे या सभेस राजकीय दृष्ट्याही महत्व आले आहे.

यवतमाळ – वाशिम लोकसभा मतदारसंघात सध्या महायुतीच्या भावना गवळी प्रतिनिधित्व करीत आहेत. भावना गवळी या शिंदे गटाच्या आहेत. हा मतदारसंघ शिंदे गटाला सुटणार आहे. या मतदारसंघात भापजने केलेल्या सर्वेक्षणातून विद्यमान खासदारांना बदलविण्याबाबत अहवाल पक्षाकडे दिले आहे. मात्र भावना गवळी यांनी महायुतीच्या मेळाव्यात ‘मेरी झाशीं नही दुंगी’ म्हणत आपण यवतमाळ-वाशिममधून लोकसभा निवडणूक लढणार असल्याचे जाहीर केले आहे. या अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत महिला मेळावा होत असल्याने या सभेला विशेष महत्त्व आले आहे.

हेही वाचा – तरुण शेतकऱ्याच्या मृत्यूनंतर पंजाबमध्ये संताप, जनभावना ओळखून भाजपाच्या नेत्यांनी सोडले मौन!

हा मेळावा वरकरणी शासकीय वाटत असला तरी पंतप्रधान नरेंद्र मोदींची ही राजकीय सभा असल्याची टीका विरोधकांनी केली आहे. सर्वच प्रमुख विभागांना महिलांना सभेसाठी आणण्याचे ‘टार्गेट’ देण्यात आले आहे. त्यासाठी मोफत प्रवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. सभास्थळापासून तीन किमी अंतरावर पार्किंग असल्याने येणाऱ्या नगारिकांची मात्र दमछाक होणार आहे. शिवाय सभास्थळ नागपूर-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गालगत असल्याने या मार्गावरील वाहतूक सभेच्या दिवशी पूर्णपणे थांबविण्यात येण्याची शक्यता आहे. सभेसाठी परिसरातील झाडांचीही कत्तल होत असल्याने वृक्षप्रेमींनीही नाराजी व्यक्त केली आहे. सुरक्षेच्या नावाखाली यंत्रणा सामान्यांना वेठीस धरत असल्याने जनमानसांत संताप व्यक्त होत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभा निवडणुकीपूर्वी दरवेळी यवतमाळ जिल्ह्यात येतात आणि खोटी आश्वासने देतात अशी टीका शिवसेना (उबाठा) प्रवक्ते व शेतकरी नेते किशोर तिवारी यांनी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ मध्ये दाभडी येथे शेतकऱ्यांशी चाय पे चर्चा केली. मात्र त्या चर्चेत दिलेले एकही आश्वासन पूर्ण केले नाही. २०१९ मध्ये पांढरकवडा येथील सभेतही महिलांसाठी विविध घोषणा केल्या. त्याही पूर्ण झाल्या नाहीत. – किशोर तिवारी, शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते