Rajasthan Assembly Election 2023: राजस्थान विधानसभेच्या निवडणुकीची चाहुल लागली आहे. यावर्षी राज्यात निवडणुका होत असल्यामुळे सर्वच पक्ष आपापली रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि एमआयएम पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांचे राजस्थानमध्ये दौरे वाढले आहेत. या दौऱ्यावर राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते सचिन पायलट यांनी जोरदार टीका केली आहे. “राजस्थानमध्ये निवडणुका असल्यामुळे मोदी आणि ओवैसी यांचे दौरे वाढले आहेत. त्यांचा उद्देश फक्त आपल्या पक्षाला मतं मिळावीत एवढाच आहे. एकदा का निवडणूक झाली की दोघेही राजस्थानमध्ये पुन्हा दिसणार नाहीत”, अशी टीका सचिन पायलट यांनी केली आहे.

हे वाचा >> विश्लेषण: सर्वोच्च न्यायालयामध्ये वकिलांना वरिष्ठता प्रदान करण्याच्या प्रक्रियेवर केंद्राला पुनर्विचार का करायचा आहे?

maharashtra assembly election 2024 issue of bullying is effective in campaigning in three constituencies of Marathwada
मराठावाड्यातील तीन मतदारसंघांत गुंडगिरीचा मुद्दा प्रचारात प्रभावी
15 November Mesh To Meen Horoscope
१५ नोव्हेंबर पंचांग: कार्तिक पौर्णिमेला कोणाला होईल धनप्राप्ती?…
Amit Shah on Uddhav Thackeray
Amit Shah : “उद्धव ठाकरे तुमच्यात दम असेल तर…”, अमित शाहांचं भर सभेत खुलं आव्हान, म्हणाले…
Sanjay singh
Sanjay Singh: आपचे राष्ट्रीय प्रवक्ते संजय सिंह म्हणतात, “हम ना बटेंगे ना कटेंगे; हम भाजप को लपेटेंगे”
Devendra fadnavis mim
‘एमआयएम’वर उद्धव ठाकरेंपेक्षा देवेंद्र फडणवीस यांची अधिक प्रखर टीका
Asaduddin Owaisi Statement over Modi
Asaduddin Owaisi : “आंबेडकर जिंदा है तो गोडसे…”, असदुद्दीन ओवैसींची पंतप्रधान मोदींच्या विधानावर जोरदार टीका
Ajit Pawar on Udyanraje Bhosale
Ajit Pawar: ‘साताऱ्याला पिपाणीनं वाचवलं, नाहीतर…’, अजित पवारांच्या मिश्किल टिप्पणीनं भाजपाचीच कोंडी
Sunil Tatkare on Jayant Patil
“जयंत पाटील आतल्या गाठीचे, त्यांनी…”, अजित पवार गटाकडून टीका; म्हणाले, ‘यावेळी त्यांचा करेक्ट कार्यक्रम करणार’

जिथे काँग्रेस मजबूत त्याच मतदारसंघात मोदींचे दौरे

श्रीगंगानगर येथे एका कार्यक्रमात बोलत असताना सचिन पायलट यांनी सांगितले की, दिल्ली-दौसा-लासौट महामार्गाचे उदघाटन करत असताना मुद्दामहून दौसा येथे कार्यक्रम घेतला जात आहे. कारण दौसा हा काँग्रेसचा मजबूत किल्ला आहे. राजस्थान विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे फक्त काँग्रेस ज्याठिकाणी मजबूत आहे, त्याचठिकाणी जाणे पसंत करतात. पायलट यांनी यावेळी छत्तीसगढमधील काँग्रेस नेत्यांवर झालेल्या ईडीच्या कारवाईबाबतही नाराजी व्यक्त करत केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. केंद्रीय यंत्रणाचा ज्यापद्धतीने गैरवापर सुरु आहे, ते सर्व देशाला दिसत आहे.

मत घेतल्यानंतर हे लोक पुन्हा राज्यात दिसणार नाहीत

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांच्यावर टीका करत असताना पायलट म्हणाले की, फेब्रुवारी महिना खूपच खास आहे. पंतप्रधान दौसा याठिकाणी जात आहेत. ओवैसी टोंकमध्ये जाणार आहेत. यावर्षी निवडणूक येत आहे, त्यामुळे दोन्ही नेत्यांचे दौरे वाढले आहेत. हे दोघेही मागचे चार वर्ष कुठे होते? फक्त निवडणूक जवळ आली की दोघेही येतात, भाषण देतात आणि धर्माच्या बाता मारतात. हे लोक निवडणुकीच्या आधी आणि नंतर पुन्हा राज्यात दिसणार देखील नाहीत.

शेतकऱ्यांच्या विरोधी कायदे करणाऱ्यांनी महागाई वाढविली

“आम्ही इथे राजस्थानच्या सुख-दुःखात सहभागी होतो. मात्र हे तेच लोक आहेत, ज्यांनी शेतकऱ्यांविरोधात कायदे बनविले. हे तेच लोक आहेत, ज्यांनी धर्माच्या नावावर मतदान घेऊन सत्ता हस्तगत केली. मात्र सत्तेत आल्यानंतर त्यांनी ना महागाई कमी केली, ना बेरोजगारी दूर केली.”, अशी टीका देखील सचिन पायलट यांनी केली.