भारतीय जनता पक्षाने (भाजपा) आठवडाभरापूर्वी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. १९५ नावांच्या या यादीत दिवंगत नेत्या आणि माजी परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांच्या कन्या बन्सुरी यांचा समावेश आहे. ४० वर्षीय बन्सुरी या नवी दिल्लीतून भाजपाच्या उमेदवार आहेत. आपल्या आईची राजकीय कारकीर्द जवळून पाहिलेल्या बन्सुरी यांनी तिकिटासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाचे आभार मानले. बन्सुरी यांना तिकीट मिळाल्याने अनेक राजकीय जाणकारांनी आश्चर्य व्यक्त करत हे धक्कादायक पाऊल असल्याचे म्हटले आहे.

बन्सुरी यांना तिकीट मिळाल्याने अनेकांना आश्चर्य वाटले

इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या माहितीनुसार, दिवंगत सुषमा स्वराज यांनी बन्सुरीसाठी अनेक वेळा पक्षाच्या बैठका सोडल्या होत्या, जेणेकरून त्यांना बन्सुरीला बसमधून शाळेत घेऊन जाता यावे. तसेच बन्सुरी शाळेतून परतल्यावर सुषमा स्वराज म्हणजेच त्यांची आईसुद्धा घरीच राहण्याचा प्रयत्न करायच्या. बन्सुरी यांना तिकीट मिळाल्याने अनेकांना आश्चर्य वाटले असून, त्यात भाजपामधील अनेकांचा समावेश आहे. ती केवळ राजकारणात अगदी नवीन असल्यामुळेच नव्हे तर हायकमांडने नवी दिल्लीच्या हाय प्रोफाइल जागेसाठी नवशिक्या उमेदवाराला तिकीट देण्याचा निर्णय घेतल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. सुषमा या लालकृष्ण अडवाणी यांच्या शिष्या होत्या आणि २०१४ मध्ये त्यांनी नरेंद्र मोदींना पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून सादर करण्यास विरोध केला होता.

तिकिटामागे नेमकी खेळी काय?

मीनाक्षी लेखी यांच्यावर भाजपा नेतृत्व खूश नाही. मीनाक्षी यांनी २०१४ आणि २०१९ मध्ये दोनदा या जागेवरून मोठा विजय मिळवला आहे. पण यानंतरही त्या नवी दिल्लीत मैदान गमावताना दिसल्या. २०२४ च्या निवडणुकीत महिलांचे मत निर्णायक भूमिका बजावणार आहे. स्वत: पंतप्रधान मोदी प्रत्येक वेळी ‘महिला शक्ती’वर जोर देतात. त्याचवेळी प्रतिष्ठेच्या जागेवर लेखी यांच्या जागी सहकारी महिला नेत्याची निवड करताना काळजी घ्यावी लागणार हेही भाजपाला माहीत होते.

हेही वाचाः गुजरातच्या जनतेनं विरोधकांना स्थानच ठेवलेलं नाही; काँग्रेस नेत्याचं विधान

पाच विद्यमान भाजपा खासदारांपैकी चार जणांना तिकीट

दिल्लीत भाजपाने आतापर्यंत ज्या जागांसाठी तिकीट जाहीर केले आहे, त्या जागेवरील पाच विद्यमान भाजपा खासदारांपैकी चार जणांना तिकीट मिळाले आहे. तर दोन नावे अद्याप उघड केलेली नाहीत. २०१९ मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपाने सातही जागा जिंकल्या होत्या. आम आदमी पक्ष आणि काँग्रेस दिल्लीत एकत्र निवडणूक लढवत आहेत आणि ही एक मजबूत युती आहे हे पाहता भाजपाला कोणतीही अडचण येऊ द्यायची नाही.

हेही वाचाः जागावाटपाची चर्चा सोडून नितीशकुमार ब्रिटनमध्ये ‘सहली’ला

सोमनाथ भारतींना पराभूत करण्याची रणनीती

बन्सुरी यांना तिकीट दिल्याने पक्षाने राजधानीतील निवडणुकीसाठी वातावरण तयार केल्याचे स्पष्ट होते. बन्सुरी यांच्यासमोर आप पक्षाचे सोमनाथ भारती हे नवी दिल्लीच्या जागेवर त्यांचे प्रतिस्पर्धी असतील. या जागेसाठी भारती प्रबळ दावेदार आहेत. जर बन्सुरीने त्यांना पराभूत केले तर ती एक मजबूत राजकारणी म्हणून राजकारणात समोर येईल. बन्सुरी यांचा विजय आप पक्षाचे सुप्रीमो अरविंद केजरीवाल यांच्यासाठीही मोठे आव्हान म्हणून पाहिले जाईल. केजरीवाल नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत. आतापर्यंत बन्सुरी यांनी टीव्हीवरूनच पक्षाच्या भूमिकेवर आपला आत्मविश्वास आणि स्पष्टता असल्याचं सांगितलं आहे. परंतु त्यांच्या संवाद कौशल्याने सर्वांना प्रभावित केले आहे. सुषमा स्वराज यांचे गायन कौशल्य अजूनही आठवते, ते बन्सुरीशी सहज जोडले जाऊ शकतात.

Story img Loader