पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेट म्हणून दिलेल्या साधारण १२०० भेटवस्तूंचा लिलाव करण्यात येत आहे. त्यासाठी pmmementos.gov.in वेबसाईटवर जाऊन या वस्तू खरेदी करण्यासाठी जास्तीत जास्त बोली लावावी असे आवाहन केले जात आहे. या ई लिलावात वेगवेगळी चित्रे, शिल्पे, हस्तकलेचे नमुने तसेच वेगवेगळ्या खेळाडूंनी दिलेल्या भेटवसूत, स्मृतिचिन्हे तसेच पुतळ्यांचा समावेश आहे. येत्या २ ऑक्टोबरपर्यंत या वस्तूंचा लिलाव करण्यात येणार असून या लिलाव प्रक्रियेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

हेही वाचा >>> त्रिपुरात भाजपामध्ये गळती सुरूच; आणखी एका आमदाराचा राजीनामा

ई लिलावासाठी ठेवण्यात आलेल्या नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याला आतापर्यंत चार बोली लागल्या आहेत. या पुतळ्याची मूळ किंमत ५ लाख रुपये ठरवण्यात आली असून त्याला आतापर्यत सर्वात जास्त ६.१५ लाख रुपयांची बोली लागली आहे. राष्ट्रीय पोलीस स्मारकाच्या हुबेहुब प्रतिकृतीलाही खरेदी करण्यासाठी अनेकजण पुढे आले आहेत. या प्रतिकृतीची मूळ किंमत ५ लाख रूपये ठरवण्यात आली असून तिला आतापर्यंत ५.६५ लाख रुपयांची बोली लागली आहे.

हेही वाचा >>> आगामी लोकसभा निवडणुकीत बिहारमध्ये ३२ जागा जिंकण्याचे भाजपाचे लक्ष्य?; बहुमताने सरकार स्थापन करण्याचाही अमित शाहांना विश्वास!

नरेंद्र मोदी यांना कॉमनवेल्थ गेम्स २०२२, डेफलिम्पिक २०२२ आणि थॉमस चषक चॅम्पियनशिप २०२२ या स्पर्धांमध्ये नेत्रदीपक कामगिरी करणाऱ्या काही खेळाडूंनी भेटवस्तू तसेच स्मृतिचिन्हे दिलेली आहेत. यामध्ये एकूण २५ भेटवस्तू आहेत. या भेटवस्तूंना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२२ मध्ये सुवर्णपदक जिंकलेल्या भावना पटेल यांनी स्वाक्षरी केलेल्या लाल रंगाच्या टेबल टेनिस रॅकेटला तिघांनी खरेदी करण्याची तयारी दाखवली आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२२ मधील महिला हॉकी संघाने सही केलेले टी-शर्टही विक्रीसाठी ठेवण्यात आले आहे. या टी शर्टची मूळ किंमत २.४ लाख रुपये ठरवण्यात आली असून या शर्टला खरेदी करण्यास अद्याप कोणी समोर आलेले नाही.

हेही वाचा >>> गोव्यात विजय सरदेसाईंचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार का? राजकीय वर्तुळात चर्चा

दरम्यान, नरेंद्र मोदी यांनी भेट म्हणून दिलेल्यांमध्ये अयोध्येतील राम मंदिर, वाराणसीतील काशी-विश्वनाथ मंदिरंच्या प्रतिकृतींचा समावेश आहे. २०२१ साली अशाच ई लिलावाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये भालाफेकपटू नीरज चोपडाने फेकलेला भाला विक्रीसाठी ठेवण्यात आला होता. हा भाला १.५ कोटी रुपयांना खरेदी करण्यात आला होता.

Story img Loader