PM Narendra Modi Dwarka Visit गुजरात दौर्‍यावर असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी द्वारका नगरीला भेट दिली. मोदी यांनी समुद्राच्या तळाशी जाऊन पाण्याखाली असलेल्या पौराणिक द्वारकेचे दर्शन घेतले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाण्याखाली श्रीकृष्णाला नमस्कार केल्याची अनेक छायाचित्रे आणि व्हिडीओ प्रसिद्ध झाले. त्यांच्या दोन दिवसांच्या सौराष्ट्र (समुद्रकिनार्‍यावर वसलेले गुजरात) दौऱ्यात अहिरांची संख्या तुलनेने कमी दिसली.

समुद्राखाली असणार्‍या पौराणिक शहर पर्यटनासाठी गुजरात सरकार लवकरच माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडबरोबर एका करारावर स्वाक्षरी करणार आहे. या कराराच्या पार्श्वभूमीवर पाणबुडी पर्यटनाला चालना देण्यासाठी पंतप्रधानांनी द्वारका नगरीला भेट दिली असल्याचे सांगण्यात येत आहे. या भेटीदरम्यान पंतप्रधान मोदींनी ओखा आणि बेयट या द्वारका बेटादरम्यान बांधण्यात आलेल्या ‘सुदर्शन सेतू’चे उद्घाटन केले. या पुलासह पंतप्रधानांनी ४,८०० कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचादेखील शुभारंभ केला.

Saif Ali Khan Sister Saba Ali Khan Pataudi emotional post
“भाईजान आम्हाला तुझा…”, सैफ अली खानसाठी बहिणीची भावुक पोस्ट, बालपणीचा फोटो शेअर करत म्हणाली…
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
bollywood actors went to kareena home to meet her and kids
Video : सैफला भेटून बहिणीचे डोळे पाणावले! करण जोहर, रणबीरसह ‘हे’ बॉलीवूड कलाकार पोहोचले करीनाच्या भेटीला
Advait kadne
‘नवरी मिळे हिटलरला’ फेम अद्वैत कडणेने शेअर केला ‘मन्या’च्या लूकमधील फोटो; आशुतोष गोखले, अपूर्वा गोरेसह कलाकारांकडून कमेंट्सचा पाऊस
Marathi Actor Visited Maha Kumbh Mela 2025
“प्रयागराजच्या पवित्र भूमीवर…”, महाकुंभ मेळ्याला पोहोचला ‘हा’ मराठमोळा अभिनेता; नेटकरी म्हणाले, “भाग्यवान आहेस…”
mantra of happy married life
Video : नात्यांमध्ये इगो बाजूला ठेवा, काका काकूंनी सांगितला सुखी संसाराचा मंत्र, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “ही अरेंज मॅरेजमधील सुंदरता आहे..”
Mahakumbh mela 2025 (2)
Maha Kumbh Mela 2025: स्मशानवासीन ‘अघोरी’ साधूंचा इतिहास काय सांगतो?
Amit Shah in shirdi
Amit Shah : “शरद पवारांच्या दगाफटक्याच्या राजकारणाला २० फूट जमिनीत गाडलं”, अमित शाहांचा शिर्डीतून एल्गार; उद्धव ठाकरेंवरही टीका!

पंतप्रधान मोदींच्या भाषणात अहिर स्त्रियांची प्रशंसा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणापूर्वी प्रभू श्रीकृष्णाला नमन केले आणि अहिर समुदायातील स्त्रियांचे कौतुक केले. पंतप्रधान मोदी यांनी गेल्यावर्षी २३ आणि २४ डिसेंबरला श्रीकृष्णाची सून मानल्या जाणार्‍या उषा यांच्या आठवणीत ३७ हजार अहीर महिलांनी सादर केलेल्या महारासचादेखील उल्लेख केला. मोदींनी आपल्या दोन दिवसीय दौर्‍यात जामनगर आणि द्वारका येथे रोड शोही केला. जामनगर लोकसभा जागेवरील बहुसंख्य मतदार अहिर आहेत. या रोड शोदरम्यान त्यांनी अहिर समाजाचे आभार मानले. जामनगर लोकसभेची जागा पूर्वी काँग्रेसच्या विक्रम मैडम यांच्याकडे होती. २०१४ मध्ये ही जागा त्यांची भाची पूनम मैडम यांनी जिंकली आणि २०१९ मध्येही त्यांनी ही जागा राखली.

जामनगर लोकसभा मतदारसंघातील सात विधानसभा मतदारसंघांपैकी दोन जागेवर अहिर आमदार आहेत. कालावद, जामनगर ग्रामीण, जामनगर उत्तर, जामनगर दक्षिण, खंबालिया, द्वारका आणि जामजोधपूर या सात विधानसभा मतदारसंघांपैकी खंबालिया येथे भाजपाचे मुलू बेरा हे आमदार आहे; तर जामजोधपूर येथे आम आदमी पक्षाचे (आप) हेमंत खवा हे आमदार आहेत. १९७६ पासून खंबालिया विधानसभेची जागा अहिरांनीच जिंकली आहे.

अहिर समुदायाचा पाठिंबा काँग्रेसला

द्वारका विधानसभा क्षेत्रात अहिर समुदायाची संख्या जास्त आहे. १९७५ मध्ये द्वारका येथील मार्की गोरिया विधानसभा मतदारसंघात एक अहिर आमदार होते. १९९० पासून पबुभा माणेक हे आमदार आहेत. त्यांनी या जागेवर सलग नऊ वेळा विजय मिळवला आहे. सुरुवातीला ते अपक्ष म्हणून लढले, त्यानंतर ते काँग्रेसचे उमेदवार म्हणून निवडणुकीत उतरले आणि शेवटी २००७ मध्ये त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला.

या मतदारसंघात सथवारा (दलवाडी) समाजाची संख्या दुसर्‍या क्रमांकावर आहे. हा समाजदेखील ओबीसी वर्गात येतो. फार पूर्वीपासून या समाजाचे समर्थन भाजपाला मिळत आले आहे. द्वारका आणि ओखा येथील ब्राह्मण, शहरी मतदार आणि इतर लहान जातीय गट भाजपा आणि माणेक यांना पाठिंबा देत आले आहेत. मात्र, द्वारकामधील अहिरांचा पाठिंबा काँग्रेसला आहे. गुजरात किसान काँग्रेसचे पाल अंबालिया म्हणतात, “सथवार, वाघेरे, शहरी मतदार आणि मुस्लिमांनी मत दिल्याने माणेक विजयी होत आहेत. योग्य उमेदवार निवडण्यात माझा पक्ष चुकत असावा. अहीर उमेदवार येथून निवडून येऊ शकतात, कारण माणेक यांच्या विजयाचे अंतर केवळ चार हजार आणि सात हजार मतांच्या श्रेणीत आहे.

परंतु, ते पुढे हेदेखील म्हणाले की, मोदींच्या प्रचार-प्रसार कार्यक्रमाचा परिणाम अहिरांवर होईल. गेल्या वर्षी हजारो अहीर महिला गरबा कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. याचा उल्लेख करत मोदींनी त्यांच्या कुटुंबीयांवर कौतुकाचा वर्षाव केला आहे, ज्याचा निवडणुकीत परिणाम दिसू शकतो.

जामनगरमध्ये अहिरांना उमेदवारी

दुसरीकडे, जामनगर लोकसभा मतदारसंघात पाटीदारांचे वर्चस्व असतानाही काँग्रेस आणि भाजपा या दोन्ही पक्षांनी येथून अहिरांना उमेदवारी दिली आहे. भाजपाच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले की, पक्षानुसार या जागांवर ओबीसींचे प्राबल्य आहे. “अंजर, खंभलिया, द्वारका, मानवदर, तलाल, राजुला आणि महुवा या विधानसभा मतदारसंघात अहिर मतदारांची संख्या लक्षणीय आहे. यामुळेच भाजपाने सौराष्ट्र प्रदेशात येणाऱ्या सात लोकसभा जागांपैकी एक असलेल्या जामनगरमधून अहीर उमेदवार उभा केला असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा : “शेतकरी आंदोलन राजकीयदृष्ट्या प्रेरित”; भारतीय किसान संघाची टीका, आंदोलकांपासून दूर राहण्याचा सरकारला दिला सल्ला

यादव मतदारांचे लक्ष वेधण्यासाठी पौराणिक द्वारका शहराचे दर्शन, हे आगामी निवडणुकीच्या रणनीतीचा एक भाग असू शकते. यापूर्वी मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर पक्षाने मोहन यादव यांचे नाव मुख्यमंत्रिपदासाठी समोर केले होते. मोहन यादवदेखील ओबीसी चेहरा आहेत.

Story img Loader