pm narendra modi on ajmer sharif dargah : राजस्थानच्या अजमेर येथील सुप्रसिद्ध ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती दर्ग्याच्या जागी पूर्वी शिवमंदिर होते, असा दावा करणारी याचिका हिंदू सेनेने न्यायालयात दाखल केली. या याचिकेनंतर अजमेरच्या स्थानिक न्यायालयाने गेल्या बुधवारी अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालय, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण व अजमेर दर्गा समितीला नोटीस बजावली आहे. प्रदीर्घ काळापासून अजमेर दर्ग्याने उपखंडातील सुफी स्थळांपैकी एक महत्वाचे स्थळ म्हणून स्वत:ची ओळख तयार केली आहे. सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि अध्यात्मिकतेमुळे दर्ग्याला राजकीयदृष्ट्याही महत्त्व आलं आहे.

अजमेर दर्ग्यावर राष्ट्रपती आणि पंतप्रधानांची श्रद्धा

राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांची या दर्ग्यावर श्रद्धा आहे. ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती यांच्या पुण्यतिथीनिमित्त दरवर्षी दर्ग्यावर उरूसही भरतो, तेव्हा ते चादरही पाठवतात. मोईनुद्दीन चिश्ती भारतातील सर्वात प्रतिष्ठित सूफी संतांपैकी एक आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही अनेकदा अजमेर दर्ग्याला चादर पाठवली आहे. मार्च २०१६ मध्ये जागतिक सुफी मंचाची एक बैठक पार पडली. या बैठकीला २० देशांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले होते की, “सूफी पंथासाठी ईश्वराची सेवा हीच मानवतेची सेवा आहे. ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती यांच्या शब्दात सर्व उपासनेपैकी सर्वशक्तिमान उपासना तीच आहे, जी निराधार आणि शोषितांना मदत करते”.

Tourists unaware of public holiday rules crowd in front of Veermata Jijabai Bhosale Park
सार्वजनिक सुट्टीच्या नियमाबाबत अनभिज्ञ पर्यटकांची राणीच्या बागेसमोर गर्दी
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
mohan bhagwat in disputed religious land
Mohan Bhagwat: मोहन भागवतांच्या भूमिकेशी ‘दी ऑर्गनायझर’ची फारकत; म्हणे, “वादग्रस्त धार्मिक स्थळांचं सत्य समोर आलंच पाहिजे!”
Chandrashekhar Bawankule On Uddhav Thackeray
Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल; म्हणाले, “२०१९ मध्ये मोठी गद्दारी…”
Alibaug, Gorai, Madh , Growth Hub, tourism revenue,
अलिबाग, गोराई, मढचा ‘ग्रोथ हब’अंतर्गत कायापालट; पर्यटनाद्वारे महसूल सहा वर्षांत ६००० कोटी डाॅलरवर नेण्याचे उद्दिष्ट
Public Works Minister Shivendra Raje, Satara Shivendra Raje,
साताऱ्यातील आम्ही चारही मंत्री एकत्रितपणे जिल्ह्याचा विकास करू, सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रराजेंचा विश्वास
shradhha kapoor shakti kapoor
शक्ती कपूर यांनी ‘ही’ सवय सोडण्यासाठी बिग बॉसमध्ये घेतला होता सहभाग; आठवण सांगत म्हणाले, “मी श्रद्धाला सिद्ध करून…”
prashant bhushan on gst nirmala sitharaman
Nirmala Sitharaman: “निर्मला सीतारमण जीनियस आहेत, १ लाखाच्या कारवर…”, प्रशांत भूषण यांनी GST चं मांडलं गणित!

हेही वाचा : PM Vishwakarma Scheme : तामिळनाडू सरकारने केंद्रातल्या भाजपा सरकारच्या या योजनेला जातीयवादी का म्हटलं? योजना लागू करण्यास का दिला नकार?

“सुफीवाद हा शांतता, करुणा आणि समतेचा आवाज असून सार्वत्रिक बंधुत्वाची हाक आहे. दहशतवादी विचारांचा बीमोड करण्यादृष्टीने सुफीवाद आदर्श आहे. सूफी धर्माचा संदेश केवळ दहशतवादाशी लढण्यापुरता मर्यादित नाही, तर त्यात ‘सबका साथ, सबका विकास’ या तत्त्वाचाही समावेश आहे”, असंही नरेंद्र मोदी होते. दरम्यान, यावर्षी ऑगस्टमध्ये केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू म्हणाले, “भारताला मिळालेला सुफी वारसा आपल्या विविधतेतील एकतेच्या प्राचीन परंपरेचा पुरावा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली, सूफी कॉरिडॉर प्रकल्प या समृद्ध वारसाचे जतन करून भावी पिढ्यांना प्रेरणा देईल. जगभरातील हृदयांना आपल्या देशाच्या आत्म्याशी जोडण्याचा हा प्रवास आहे.”

बराक ओबामा, परवेझ मुशर्रफ यांनी दिली होती भेट

अजमेरपासून सुरू होणाऱ्या सुफी कॉरिडॉरचे उद्दिष्ट हे देशभरातील सुफी देवस्थानं किंवा दर्गा यांना आधार देणं आणि चांगल्या पायाभूत सुविधा निर्माण करणं आहे. अजमेर दर्गा भारताच्या सांस्कृतिक कूटनीतीचाही एक भाग आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनीही दर्ग्यावर चादर अर्पण केली आहे. परवेझ मुशर्रफ, जनरल झिया-उल-हक, बेनझीर भुट्टो आणि शेख हसीना यांसारख्या नेत्यांसह शेजारील देशांतील इतर राजकीय नेत्यांनी देखील दर्ग्याला भेट दिली आहे. राष्ट्रपतींसह प्रमुख राजकारणी, मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री आणि बॉलिवूड अभिनेत्यांनी दर्गावर येऊन श्रद्धांजली वाहिलेली आहे. या दर्ग्यात सेलिब्रिटींची इतकी गर्दी असते की, अजमेरमध्ये सय्यद कुतुबुद्दीन सखी यांनी ‘बॉलीवूड दुआगो’ सुरू केलेला आहे, ज्याद्वारे सेलिब्रिटींच्या राहण्याची तसेच यात्रेची सोय केली जाते.

पंतप्रधान मोदी दर्ग्याला पाठवतात चादर

अजमेरचा दर्गा हे देशभरातील मुस्लिमांचं श्रद्धास्थान आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे माजी केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी आणि राजस्थान पक्षाचे माजी नेते अमीन पठाण यांच्यासह भाजपच्या मुस्लिम चेहऱ्यांना पुढे करून येथे चादर पाठवत असतात. मात्र, झपाट्याने बदलणाऱ्या राजकीय परिस्थितीमध्ये हे सर्व बदलताना दिसत आहे. अजमेर कोर्टाने हिंदू सेनेची याचिका स्वीकारून नोटीस जारी केल्याने अजमेरमधील अनेकांसाठी आश्चर्य व्यक्त केलं आहे. काहीजण या घटनेला अविश्वसनीय आणि अकल्पनीय म्हणत आहेत. याचे एक कारण म्हणजे, या दर्ग्याचा इतिहास या दर्ग्याचा उल्लेख ऐतिहासिक दस्तावेजांमध्ये आढळतो.

हेही वाचा : Rajya Sabha Election 2024 : राज्यसभेचं तिकीट एक अन् इच्छुक अनेक, खासदारकीसाठी भाजप नेत्यांची दिल्लीवारी; कुणाची लागणार वर्णी?

अजमेर दर्ग्याबाबत ओवीसी काय म्हणाले?

अजमेर दर्ग्याचा ८१३ वा उरूस येत्या जानेवारीमध्ये साजरा केला जाणार असून अनेक वर्षांपासून त्याचा सन्मान केला जातो. सम्राट अशोक यांनी देखील दर्ग्याबाबत विशेष प्रेम होते. दरम्यान, एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी म्हणाले, “अजमेरचा दर्गा सुमारे ८०० वर्षे जुना आहे… जवाहरलाल नेहरूंपासून आतापर्यंतच्या सर्व पंतप्रधानांनी येथे चादर पाठवली आहे. १५ ऑगस्ट १९४७ पर्यंत धार्मिक स्थळांची स्थिती स्थिर ठेवणाऱ्या प्रार्थनास्थळ कायद्याचे कनिष्ठ न्यायालये पालन का करत नाहीत”, असा प्रश्नही ओवेसी यांनी उपस्थित केला.

दर्ग्यावरून काँग्रेसची भाजपा सरकारवर टीका

राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत म्हणाले, “जगभरातील अनेक लोक अजमेर दर्ग्यावर चादर चढवायला जातात. पंडित जवाहरलाल नेहरू, अटलबिहारी वाजपेयींपासून ते मोदींपर्यंतच्या सर्वच पंतप्रधानांनी तिथे चादर चढवली आहे. एकीकडे तुम्ही दर्ग्यावर चादर चढवता आणि दुसरीकडे तुमच्या पक्षाचे लोक न्यायालयात खटले दाखल करून गोंधळ घालत आहेत, हा कोणता संदेश आहे? भाजपा आणि आरएसएसने उचललेल्या पावलांमुळे समाजात जातीय द्वेष निर्माण होत आहे”, असा आरोपही अशोक गेहलोत यांनी केला.

हेही वाचा : 2,100-Year-Old Temple: इजिप्तमध्ये सापडला गुप्त मंदिराचा दरवाजा; २१०० वर्षं जुन्या मंदिराचं रहस्य उघड!

राजस्थान भाजपाचे प्रमुख मदन राठोड म्हणाले की, “मला या प्रकरणावर भाष्य करायला आवडणार नाही, कारण हे प्रकरण कोर्टात गेलेलं आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा या सर्वांनीच म्हटलंय की, आम्हाला वाद निर्माण करायचा नाही. भारतात अशी अनेक उदाहरणे आहेत, जिथे मुघल राजवटीत वास्तूंचे नुकसान करण्यात आले आहे. तर काही वास्तूंवर कब्जाही करण्यात आला आहे. न्यायालयांनी त्यावर आपला निर्णय दिला असून यापैकी काही वास्तू आम्हाला परत मिळाल्या आहेत.”

अजमेर येथील प्रसिद्ध हॉटेलचं नाव बदललं

अजमेर उत्तरचे आमदार आणि विधानसभा अध्यक्ष वासुदेव देवनानी म्हणाले, “न्यायालय जे काही सांगेल, त्याचे पालन सर्वांनी केले पाहिजे. अशी आणखी काही प्रकरणे आहेत, ज्यांचा निकाल कोर्टाने दिला आहे. मी सर्वांना विनंती करेन की, यावर राजकारण करू नका.” अलीकडेच, भजनलाल शर्मा यांच्या नेतृत्वाखालील सरकारने अजमेर येथील प्रसिद्ध हॉटेल ‘खादिम’चे नाव बदलून ‘अजयमेरू’ असे ठेवले. नावात बदल करण्याची मागणी करताना देवनानी यांनी दावा केला होता की, “राजस्थानचे १२ व्या शतकातील योद्धा राजा पृथ्वीराज चौहान यांच्या कारकिर्दीत अजमेर हे अजयमेरू म्हणून प्रसिद्ध होते. प्राचीन ग्रंथ आणि इतिहासाच्या पुस्तकांमध्येही अजयमेरूचा उल्लेख आहे.”

Story img Loader