महेश सरलष्कर

‘देशात परिवर्तन घडवून आणण्याच्या माझ्या वचनाने मला पंतप्रधान केले. कुशल कामगिरीने मला पुन्हा पंतप्रधान होण्याची संधी दिली. पुढील वर्षी १५ ऑगस्टला याच लालकिल्ल्यावरून मी देशाने मिळवलेले यश, तुमचे सामर्थ्य, तुमचे संकल्प, त्यामध्ये झालेली प्रगती, त्याचे गौरवगान अधिक आत्मविश्वासाने मी प्रस्तृत करेन’, अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली. ७६ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त मंगळवारी लालकिल्ल्यावरून दीड तास केलेले भाषण म्हणजे २०२४च्या लोकसभा निवडणुकीनंतर ‘मी पुन्हा येईन’ची जणू गर्जनाच होती!

narendra modi yogi adityanath campaign in maharashtra
लालकिल्ला : मोदी-योगींच्या प्रचाराने काय साधणार?
BJP Devendra Fadnavis Assets Net Worth Updates in Marathi
Devendra Fadnavis Income : उपमुख्यमंत्र्यांची एकूण संपत्ती किती?…
star pravah mi honar superstar chhote ustaad season 3 show winner
मी होणार सुपरस्टार – छोटे उस्ताद ३ : यवतमाळची गीत बागडे ठरली महाविजेती! मिळालं ‘एवढ्या’ लाखांचं बक्षीस
Narendra modi Rahul Gandhi Bal Thackeray
Narendra Modi : नरेंद्र मोदींचं मविआ नेत्यांना आव्हान; बाळासाहेब ठाकरेंचा उल्लेख करत म्हणाले, “राहुल गांधींकडून…”
Manifesto Mira Bhayander, Mira Bhayander,
मिरा भाईंदरसाठी महाविकास आघाडीचा जाहीरनामा; रेल्वे टर्मिनस, दिवाणी न्यायालयाची घोषणा
Bhokardan Constituency Assembly election 2024 BJP Santosh Danve Chandrakanta Demons print politics
लक्षवेधी लढत: भोकरदन : लोकसभेतील पराभवानंतर दानवेंची प्रतिष्ठा पणाला
Ajit Pawar on Amit Shah
‘देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री?’, अमित शाहांच्या त्या विधानावर अजित पवारांचं मोठं विधान; म्हणाले, “निवडणूक झाल्यावर…”
Sachin Pilgaonkar
नवरा माझा नवसाचा २’ने थिएटरमध्ये ५० दिवस पूर्ण केल्यानंतर श्रियाची सचिन पिळगांवकरांसाठी खास पोस्ट; म्हणाली, “रॉकस्टार मला…”

संसदेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये विरोधकांच्या ‘इंडिया’ने लोकसभेत मांडलेल्या अविश्वास ठरावावरील चर्चेला उत्तर देताना मोदींनी केलेल्या भाषणातील मुद्द्यांची पुनरावृत्ती लालकिल्ल्यावर पाहायला मिळाली. संसदेमध्ये मोदींनी काँग्रेस व अन्य विरोधी पक्षांवर थेट हल्लाबोल केला होता, इथे मोदींनी आगामी लोकसभा निवडणुकीतील भाजपच्या संभाव्य मतदारांना उद्देशून ‘एनडीए’वर विश्वास दाखण्याचे आवाहन केले. ‘मी तुमच्या मधून आलो, तुमच्यासाठी जगतो, स्वप्न देखील मला तुमच्या विकासाची पडतात, मी तुमच्यासाठी घाम गाळतो, पंतप्रधानपद हे दायित्व नव्हे, तुम्ही माझे कुटुंब आहात, तुमचे दुःख मी सहन करू शकत नाही, तुमचे संकल्प सिद्धीला नेण्यासाठी मी सेवक बनून काम करेन’, असे मोदी म्हणाले. या विधानांमधून मोदींनी २०२४च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची दिशा निश्चित केली. १४० कोटी देशवासी माझे कुटुंब असल्याचे सांगत मोदींनी पुन्हा एकदा, ‘मी फकीर असून भ्रष्टाचारमुक्त सरकार देण्याची क्षमता फक्त माझ्यामध्ये आहे’, असा संदेश मतदारांपर्यंत पोहोचवला.

गरीब, ओबीसी, मागास, दलित, आदिवासी…

देशातील गरीब, नवमध्यमवर्ग, ओबीसी-मागास, दलित, आदिवासी, महिला, पसमंदा आणि भाजपच्या कट्टर समर्थकांसमोर मोदींनी ‘विकासाआड येणारा शत्रू’ उभा केला. मोदी म्हणाले की, भ्रष्टाचाराच्या वाळवीने देशातील सगळ्या व्यवस्थांना पोखरून काढले. तुमचे हक्क हिरावून घेतले. आता भ्रष्टाचारमुक्तीची नवी स्वच्छता मोहीम राबवली जात आहे. भ्रष्टाचार नष्ट करण्याचे मी वचन दिले आहे, त्यासाठी मी लढत राहीन! देशातील घराणेशाहीवर आधारलेल्या राजकीय पक्षांनी जनसामान्यांची क्षमता, योग्यता, सामर्थ्य नाकारले. त्यांच्या तुष्टीकरणाच्या राजकारणाने सामाजिक न्यायाची हत्या केली. तुमच्यासारख्या सामान्य लोकांना विकासापासून वंचित ठेवले. २०४७ पर्यंत देशाला विकसीत बनवायचे असेल तर भ्रष्टाचार सहन करू नका! मोदींनी भाषणामध्ये विरोधकांच्या ‘इंडिया’चे नाव न घेता मतदारांना महाआघाडीपासून दूर राहण्याचे अप्रत्यक्ष आवाहन केले.

भाजपने फक्त राजकारणासाठी नव्हे तर गरिबांच्या कल्याणासाठी केंद्रात सत्ता मिळवली असल्याचे मोदी सातत्याने सांगतात. स्वातंत्र्यदिनानिमित्त देशवासियांना उद्देशून केलेल्या भाषणातही हाच मुद्दा अधोरेखित केला. ९ वर्षांमध्ये १३.५ कोटी लोक गरिबातून मुक्त होऊन मध्यमवर्ग बनले. मध्यमवर्ग वाढला की, देशाची क्रयशक्ती वाढते, आर्थिकचक्र अधिक वेगाने फिरू लागते, असे मोदी म्हणाले. ओबीसी समाजातील सोनार, धोबी असा विविध समाजघटकांसाठी विश्वकर्मा जयंतीनिर्मित्त नवी योजना लागू केली जाणार असून केंद्र सरकार १५ हजार कोटी खर्च करणार आहे. शेतकरी, फेरीवाले, शहरी गरीब यांच्यासाठी राबवलेल्या योजनांचा आणि आर्थिक मदतीचा मोदींनी उल्लेख केला.

राष्ट्रचरित्र…. समृद्धीचे क्षण

भाजपने २०१४ व २०१९ मधील लोकसभा निवडणुका ‘राष्ट्रवादा’च्या आधारे जिंकल्या होत्या. यावेळी मोदींनी ‘राष्ट्रचरित्र’ या शब्दांची भर घातली. विकसीत भारत घडवायचा असेल तर देशाची एकता महत्त्वाची आहे. पण, त्याला श्रेष्ठत्वाची जोड द्यावी लागेल. देशातील संस्था, सेवा, उत्पादने, निर्णयप्रक्रिया सर्व जागतिक दर्जाचे झाले पाहिजे. देशाच्या विकासाठी महिला सबलीकरणाचे अतिरिक्त सामर्थ्य गरजेचे आहे. प्रांतिक आशा-आकांक्षा पूर्ण कराव्या लागतील. भारत विश्वमित्र झाला पाहिजे. त्यासाठी साधनसुचिता, पारदर्शिता आणि निष्पक्षता हवी, असे मोदी म्हणाले.

हजार-बाराशे वर्षांपूर्वी झालेल्या लढाईत झालेल्या राजाच्या पराभवाची छोटी घटना या देशाच्या इतिहासाला मोठे वळण देऊन गेली. देश गुलामगिरीत अडकला, लूटमार झाली, देश गरिबीच्या खाईत लोटला. हा हजार वर्षांच्या अत्यंत प्रतिकुल काळात असंख्य देशवासीयांनी स्वातंत्र्यासाठी संघर्ष केला. १९४७ मध्ये देशाला स्वातंत्र्य मिळाले, या स्वातंत्र्याच्या अमृतकाळाचे हे पहिले वर्ष आहे. आता देशाला तपस्या, त्याग करण्याची गरज आहे. हा काळ निर्णायक असून पुढील हजार वर्षांचा सुवर्ण इतिहास लिहिला जाणार आहे. त्याचा जगावर प्रभाव राहणार आहे. १४० कोटी देशवासीयांची उर्जा जागृत होत असून भारताला पुन्हा समृद्ध केले पाहिजे, असे मोदी म्हणाले. राष्ट्रचरित्र आणि गतवैभवाचे उद्दिष्ट ठेवून मोदींनी मतदारांना भावनिक आवाहन केले.

तरुण मतदारांवर लक्ष केंद्रित

संभाव्य मतदार म्हणून पहिल्यांदा मतदान करणाऱ्या तरुण-तरुणींवर भाजपने लक्ष केंद्रित केलेले आहे. या संभाव्य मतदारांना केलेल्या आवाहनाचे पडसादही मोदींच्या भाषणात उमटले. मोदींनी ‘लोकसंख्या, लोकशाही आणि वहुविविधता’चाही मंत्र दिला. ३० वर्षांहून कमी वयोगटातील लोकसंख्या भारतात सर्वाधिक आहे. महानगरांमध्ये नव्हे तर ‘टी-३’, ‘टी-२’ मधील तरुण देशाचे भविष्य घडवत आहेत. ते भारतात डिजिटल क्रांती घवत आहेत. गाव-खेड्यातील, झोपडपट्टीत राहणारे तरुण क्रीडा क्षेत्रात योगदान देत आहेत. प्रयोगशाळेत असंख्य प्रयोग करत आहेत, उपग्रह बनवत आहेत. स्टार्टअप सुरू करत आहेत. तंत्रज्ञानावर आधारलेला भारत हेच तरुण घडवत आहेत. पूर्वी तरुणांना कर्तृत्व दाखवण्याची, यशस्वी होण्याची संधी मिळत नव्हती, आता त्यांना इतक्या संधी उपलब्ध आहेत की, कुठल्या क्षेत्रातील संधी मिळवायची इतकाच प्रश्न उरला आहे, असे मोदी म्हणाले. लालकिल्ल्यावरील भाषणातून मोदींनी भाजपचे नेते आणि कार्यकर्त्यांच्या हाती आगामी लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या मुद्द्यांची थैली सुपूर्द केली.