पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून तीन दिवसीय गुजरात दौऱ्यावर आहेत. यादरम्यान, त्यांच्या हस्ते ते १४५०० कोटींच्या प्रकल्पांचे उद्घाटन करण्यात येणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा पंतप्रधान मोदींचा हा दौरा असल्याची चर्चा रंगू लागली आहे.
९ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ५ वाजता पंतप्रधान मोदी मेहसाणातील मोढेरा येथे अनेक प्रकल्पांचे उद्घाटन करतील. १० ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता पंतप्रधान भरूचमधील आमोद येथेही काही प्रकल्पांचे लोकार्पण करणार आहेत. तर दुपारी ३ वाजता ते अहमदाबादमधील मोदी शैक्षणिक संकुलाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे. तसेच संध्याकाळी ५ वाजता, पंतप्रधान मोदी जामनगर येथील काही प्रकल्पांचे लोकार्पण आणि उद्घाटन करणार आहेत.
हेही वाचा – पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करा असं प्रशांत किशोर मला म्हणाले होते – नितीश कुमारांचं विधान!
दरम्यान, ११ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजता पंतप्रधान मोदी अहमदाबादच्या असरवा येथील रुग्णालयाचे भूमीपूजन करणार आहेत. त्यानंतर ते उज्जैनसाठी रवाना होणार आहे. तेथे ते श्री महाकालेश्वर मंदिरात पूजा करतील. तर सायंकाळी ६ वाजता श्री महाकाल लोक येथील कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.
काही दिवसांपूर्वीच नरेंद्र मोदी यांनी सुरतमध्ये ३४०० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या विविध प्रकल्पांची भूमीपूजन केले होते. डिसेंबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या काही महिन्यांपूर्वी पंतप्रधान मोदींचा दौरा असल्याने अनेक चर्चांना उधाण आहे.