मोहनीराज लहाडे
नगरः जिल्ह्याला साधुसंतांची मोठी परंपरा आहे. मात्र अलीकडच्या काळात काही साधुसंत, हभप, महाराज आणि राजकारणी एकमेकांच्या हातात हात घालून नांदताना दिसतात. अनेक राजकीय नेत्यांच्या व्यासपीठावर हभप म्हणून ओळखले जाणारे, महाराज उपस्थिती लावताना दिसतात आणि हभपच्या सप्ताहांची पूर्तता राजकारणी नेत्यांच्या उपस्थितीने होताना दिसते. यातून नगरच्या राजकीय नेत्यांना परमार्थातून राजकीय स्वार्थ किंवा स्वार्थातून राजकीय परमार्थ साधन्याची कला अवगत झाली आहे.

सध्या जिल्ह्यातील राजकीय नेत्यांकडून आयोजित केल्या जाणाऱ्या मोफत देवदर्शनाच्या सहली लक्षात घेतल्या की मतदारांच्या परमार्थातून आपला राजकीय पुण्यसंचयाची कला त्यांनी कशी विलक्षणरित्या विकसित केली आहे, हेही लक्षात येते. सध्या सण-उत्सवांचे दिवस आहेत. मागील महिना श्रावण आणि त्यापूर्वी अधिक मास होता. या काळात मतदार भाविक अध्यात्माच्या संगतीत अधिक रमण्याचा प्रयत्न करत असतो. मतदारांची ही भाविकता राजकीय नेत्यांच्या मोफत देवदर्शन सहलीसाठी अधिक पथ्यावर पडणारी ठरली आहे. त्यातूनच या सहलींची ‘टूम’ जिल्ह्यात निर्माण होत आहे. त्याचा लाभ अक्षरशः हजारो मतदार भाविक घेताना दिसतात.

bjp pradipsinh Jadeja marathi news
अजितदादांच्या बालेकिल्ल्यावर गुजरात भाजपच्या नेत्याची नजर
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर गेलेल्या आर्याने सांगितलं सत्य, म्हणाली…
Maratha reservation, Buldhana district,
बुलढाणा जिल्ह्यात सत्ताधारी, विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी
ladki bahin yojana shri ram mandir drug side effects topic in ganeshotsav themes
लाडकी बहीण योजना, श्रीराम मंदिर,अमली पदार्थांचे दुष्परिणाम; गणेशोत्सवातील देखाव्यांत वैविध्यपूर्ण विषयांची हाताळणी
26 bjp activists from chhattisgarh allotted one constituency to win marathwada
मराठवाड्यात भाजपकडून छत्तीसगडमधील कायर्कर्त्यांची कुमक
Devendra Bhuyar, Asha sevika, BJP allegation ,
आमदार देवेंद्र भुयार यांची ‘लाडक्या बहिणीं’वर दादागिरी; भाजप नेत्याचा गंभीर आरोप
Rajendra Raut, Manoj Jarange,
सोलापूर : ओबीसीतून मराठा आरक्षणप्रश्नी पवार, ठाकरे, पटोलेंच्या सह्या आणा; राजेंद्र राऊत यांचे मनोज जरांगे यांना आव्हान
Badlapur, sexual abuse, political exploitation, protest, banners, internet shutdown, ‘Mychildnotforpolitics’, rail roko, lathi charge, local response, badlpur school case
चिमुकल्यांच्या अत्याचाराचे ” विकृत राजकारण नको”, बदलापुरात ठिकठिकाणी झळकले फलक

हेही वाचा >>> मनसेचे पुण्याकडे अधिक लक्ष, लोकसभा लढण्याची तयारी सुरू

यापूर्वीही सध्या भाजपमध्ये असलेले व त्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेले आमदार बबनराव पाचपुते टिळा लावून गळ्यात विणा घेऊन वारकऱ्यांच्या दिंडीत सहभागी होत असत. दिवंगत माजी खासदार तुकाराम गडाख कीर्तन प्रवचन करीत असत. जिल्हा परिषद माजी अध्यक्ष विठ्ठलराव लंघे मोटरसायकलवरुन दिंडी काढत असत. जिल्ह्याच्या उत्तर भागातील अनेक सप्ताहाच्या कार्यक्रमातून राजकीय नेते फुगड्या घालताना दिसतात. परंपरागत विरोधकांचे हे खेळ धार्मिक कार्यक्रमातून नेहमी रंगलेले असतात. त्याची चर्चा जिल्ह्यात नेहमीच रंगत असते.

हेही वाचा >>> अकोल्याचा गड अधिक मजबूत करण्यावर भाजपचा भर

महसूल मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे व त्यांचे चिरंजीव खासदार डॉ. सुजय विखे यांच्या पुढाकारातून नगर लोकसभा मतदारसंघातील महिलांसाठी अधिक मासाचे निमित्त शोधत मोफत शिर्डी-शनिशिंगणापूरची सहल आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी श्रावण मासाचे निमित्त साधत पंढरपूर-तुळजापूर या धार्मिक स्थळांना भेटी देण्यासाठी ‘भक्तीपीठ ते शक्तिपीठ’ अशी मोफत सहल आयोजित करुन ‘पुण्य’ पदरी पाडून घेतले. या मोफत सहलीचा लाभ तब्बल ५० हजारांवर महिलांनी घेतला. ही आकडेवारी त्यांनीच जाहीर केलेली आहे. ४० दिवस ही मोहीम सुरु होती. आता पुढील वर्षीच्या डिसेंबरमध्ये वैष्णव देवीची मोफत सहल आयोजित करण्याचे खासदार विखे यांनी जाहीर केले आहे.

हेही वाचा >>> राजस्थानात भाजप आणि काँग्रेसमध्ये उमेदवार निवडीवरून चुरस वाढली

पूर्वी जेष्ठ नेते शरद पवार यांना आदर्श मानणारे परंतु आता अजितदादा गटात सहभागी असलेले आमदार निलेश लंके दरवर्षी मतदारसंघातील हजारो महिलांना नवरात्रात मोफत मोहटादेवी दर्शनाची सहल घडवून आणण्याचे ‘पुण्य’ मिळवतात. पूर्वी ते गावचे सरपंच झाले त्यावेळी त्यांनी गावातील महिलांसाठी, नंतर त्यांच्या पत्नी जिल्हा परिषदमध्ये निवडून आल्यानंतर गटातील महिलांसाठी व आता ते स्वतः पारनेर-नगर मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करु लागल्यानंतर, मतदारसंघातील १७२ गावातील महिलांसाठी मोफत दर्शन सहल आयोजित करू लागले आहेत. या मोफत देवदर्शन सहलीच्या व्यवस्थेसाठी राजकीय नेत्यांकडून निवडणुकीत मतदान घडवून आणण्यासारखे सूक्ष्म नियोजन केले जाते.

गावनिहाय याद्या तयार केल्या जातात, त्यांचे आधार कार्ड, दूरध्वनी क्रमांक जमा केले जातात. कोणत्या गावातून किती महिला सहभागी होणार याच्या संख्येनुसार आराम बसची व्यवस्था केली जाते. प्रवासात त्यांच्या फराळाची, नाश्त्याची, चहापाण्याची, जेवणाची, विश्रांतीची, दर्शन घडवून आणण्याची व्यवस्था केली जाते. या व्यवस्थेत नेत्याच्या यंत्रणेतील शेकडो कार्यकर्ते राबवत असतात. राजकीय नेत्यांकडून ज्याप्रमाणे निवडणूक यंत्रणा उभी केली जाते, अशीच यंत्रणा मोफत देवदर्शन सहलीसाठी उभी केली जाते. त्याचे नियोजन महिनाभर आधीपासूनच सुरू केले जाते. डझनावरी आरामबसची आगाऊ नोंदणी केली जाते. मतदारांचे पुण्य मिळवून देणाऱ्या या मोफत देवदर्शन सहलीची लागण इतरत्रही पसरू लागली आहे.

देवदर्शन करून परत आल्यावर माता-भगिनींच्या चेहऱ्यावरील आनंद कशातच मोजता येणार नाही. भक्तीपीठ ते शक्तीपीठ ही ४० दिवसांची, तीर्थक्षेत्रांची यात्रा सुरू होती. त्यामुळे आम्हालाही मोठे पुण्य लाभले. या यशस्वीतेनंतर आता विखे पाटील परिवाराच्या वतीने डिसेंबर मध्ये माता वैष्णवदेवी दर्शनाचे नियोजन केले जाणार आहे. मतदारसंघ हा आमचा परिवार आहे. त्याच्या सुखदुःखात कायमच सहभागी होण्याचा प्रयत्न असतो. –खासदार डॉ. सुजय विखे

देवदर्शन सहलींचा आणि निवडणुकीचा काही संबंध नाही. कारण आम्ही देवदर्शन सहल दरवर्षी आयोजित करतो. केवळ मोहटा देवीच नव्हे तर वैष्णव देवीच्या दर्शनासाठी ही सहल जात असते. मतदारसंघ आमचे कुटुंब आहे. कुटुंबासाठी आपण एक दिवस नेहमीच देत असतो. त्यामागे श्रद्धा आहे, कर्तव्याची भावना आहे. महिलांना रोजच्या व्यापातून एखादा दिवस विरंगुळा हवाच असतो. आता निवडणूक जवळ आल्याचे पाहून अन्य कोणी त्याचे अनुकरण करू लागले असेल तर त्याबाबत मी काही बोलणार नाही. -आमदार निलेश लंके