कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्याचे राजकीय विद्यापीठ म्हटल्या जाणाऱ्या कागल विधानसभेची तंतोतंत पुनरावृत्ती शेजारच्याच चंदगड विधानसभा मतदारसंघात पाहायला मिळणार आहे. येथेही अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजेश पाटील, त्यांच्या विरोधात निसटता पराभव झालेले भाजपचे शिवाजी पाटील गेल्या वेळी तिसऱ्या स्थानी राहिलेले जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष मविआचे विनायक तथा अप्पी पाटील यांच्यात मुख्य लढत होणार आहे. गटा ताटाच्या राजकारणात कोण कोणासोबत राहणार यावर चंदगडाची पाटीलकी अवलंबून असणार आहे.

चंदगड आणि गडहिंग्लज तालुक्याचा मिळून बनलेल्या या मतदारसंघात गेल्या निवडणुकीला राजेश पाटील हे थोडक्या मताने विजयी झाले होते. त्यांना ५५५५८ ,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जाणारे भाजपचे बंडखोर शिवाजी पाटील यांना ५१ हजार १७३ मते मिळाली होती. तर अप्पी पाटील ४३ हजार ९७३ मते घेऊन तिसऱ्या स्थानी होते. शिवसेनेच्या संग्रामसिंह कुपेकर यांना ३३ हजार २१४ मते मिळालेली होती..

maharashtra election commissioner news in marathi
राज्य निवडणूक आयुक्तपदाचा आज निर्णय; नितीन करीर, राजीव जलोटा, राजगोपाल देवरा स्पर्धेत
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
zilla parishad loksatta
राज्यातील सहा जिल्हा परिषद, ४४ पंचायत समितींवर ‘प्रशासक राज’; मुदतवाढ नाहीच
Pankaja Munde
Pankaja Munde : बीड जिल्ह्यातील तणावाच्या परिस्थितीवर पंकजा मुंडेंचं मोठं विधान; म्हणाल्या, “मी गृहमंत्र्यांशी…”
Mumbai Ravi Raja opposed for Municipal administration decided to tax commercial slums
व्यावसायिक स्वरुपाच्या झोपड्यांना मालमत्ता कर लावण्यास विरोध, माजी विरोधी पक्ष नेते रवी राजा यांचे आयुक्तांना पत्र
Satej Patil On Municipal Elections 2025
Satej Patil : आगामी महापालिकेच्या निवडणुका काँग्रेस स्वतंत्र लढणार की आघाडीत? सतेज पाटलांचं मोठं विधान; म्हणाले, “शक्य असेल तिथे…”
Hemlata Patil
Hemlata Patil : काँग्रेसला मोठा धक्का? ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर प्रवक्त्या डॉ.हेमलता पाटील पक्ष सोडणार?
bhaskar jadhav and uday samant
Uday Samant : “शिवसेनेची काँग्रेस झालीय”, भास्कर जाधवांच्या विधानावर उदय सामंतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “मोठ्या नेतृत्त्वाचं…”

हेही वाचा…मदत निधीच्या आरोपावरून भाजपा-काँग्रेसमध्ये जुंपली; पंतप्रधान मोदींच्या दाव्यात किती सत्य?

राजेश पाटील विकास कामाच्या बळावर निवडणुकीला सामोरे जाणार आहेत. राजेश पाटील यांना पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि मेहुणे खासदार संजय मंडलिक यांची मदत याही वेळी मिळेल हे उघड आहे. या भागात मोठ्या संख्येने असणाऱ्या काजू उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आमदार पाटील यांनी पुरेशी मदत केली नसल्याने नाराजी असल्याचे सांगितले जाते. गेल्या वेळी शिवाजी पाटील यांना माजी मंत्री भरमू सुबराव पाटील यांची मोठी मदत झाली होती. लोकसभा निवडणुकीची समीकरणे पाहता यावेळी ते शिवाजी पाटील यांच्यासोबत कितपत राहणार यावर बरेचसे अवलंबून असणार आहे. विनायक पाटील यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आहे. जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सतेज पाटील हे त्यांना मदत करतील. खेरीज पाटील हे कर्नाटकातील बडे नेते सतीश जारकीहोळी बंधू यांचे निकटचे नातेवाईक असल्याने आणि हा मतदारसंघ सीमा भागाला लागून असल्याने तिकडून मोठी रसद प्राप्त होण्याची शक्यता आहे. अप्पी पाटील हे गडहिंग्लज तालुक्यातील असल्याने या भागातील मते त्यांच्यासोबत मोठ्या प्रमाणात राहतील असाही अंदाज व्यक्त केला जात आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळी विधानसभेचे दिवंगत अध्यक्ष बाबा कुपेकर व माजी आमदार संध्यादेवी कुपेकर यांच्या कन्या नंदिनी बाभुळकर या रिंगणात राहणार का यावर मविआचे भवितव्य अवलंबून असणार आहे.

हेही वाचा…केंद्रात कुणीही असो, निवडणुकीत पंजाब राहतो नेहमी विरोधातच; काय आहे हा इतिहास

गेल्या वेळी भाजपचे सहकार क्षेत्रात मोठे काम नाव असलेले अशोक चराठी हे ऐनवेळी जनसुराज्य शक्ती पक्षाकडून राहिले होते. त्यांना १२ हजार ७०० मते मिळाली होती. त्यांच्यामुळे भाजपचे शिवाजी पाटील याचे विजयाचे गणित बिघडल्याचे सांगितलं जाते. अशाच प्रकारचे गटातटाचे राजकारण या आगामी विधानसभा निवडणुकीला कसे होणार, कोण कोणासोबत राहणार यावरही बरेच अवलंबून असणार आहे.

Story img Loader