प्रबोध देशपांडे

बुलढाणा जिल्ह्यात आगामी काळात जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिका निवडणुकीची धामधूम राहणार आहे. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही महिन्यांमध्ये राजकीय पक्षांसह इच्छुकांनी पूर्वतयारीवर जोर दिला आहे. या निवडणुकांसाठी सत्ताधारी पक्षांमध्ये आघाडी होणार का? की स्वबळाची ताकद आजमावली जाणार? यावरून राजकीय वर्तुळात चर्चेचे फड रंगले आहेत. जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांसाठी या निवडणुका प्रतिष्ठेच्या ठरणार असल्याने त्यांनी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. आता निवडणूक कार्यक्रमांची प्रक्रिया पूर्ण होऊन तारखा जाहीर होण्याची प्रतीक्षा आहे.

maharashtra Congress chief nana patole slams mahayuti government over leader of opposition post
विरोधी पक्षनेते पदासाठी अर्ज करावा लागतो का? नाना पटाले अध्यक्षांना सवाल  म्हणाले….
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Ajit Pawar :
Ajit Pawar : लोकसभेतील अपयशानंतर कोणते बदल केल्यानंतर पक्षाला विधानसभेत यश मिळालं? अजित पवारांनी सांगितली चार सूत्र; म्हणाले…
Ajit Pawar At Napur.
Ajit Pawar : “…परंतु काही गोष्टी” अजित पवारांनी सांगितले आमदारांची संख्या न वाढण्यामागचे कारण
Ajit pawar maratha leader rising in Delhi
Ajit Pawar: अजित पवार दिल्लीतील नवे मराठा स्ट्राँगमॅन; खासदार सुनेत्रा पवार यांना शरद पवारांसमोरील बंगला मिळाल्यामुळे चर्चांना उधाण
Rajya Sabha Winter Session.
Parliament Session : सभापतींना हटवण्यावरून राज्यसभेत गोंधळ, सलग दुसऱ्या दिवशी सभागृहाचं कामकाज स्थगित
Vidhan Bhavan premises Central Vista vidhan
विधानभवन परिसराचा कायापालट, अध्यक्षपदी फेरनिवड होताच राहुल नार्वेकर यांचा पुनरुच्चार; सेंट्रल विस्टाच्या धर्तीवर विकास
Independent MLA Sharad Sonawane.
MLA Sharad Sonawane : अपक्ष आमदाराची महायुतीकडे मंत्रिपदाची मागणी, विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसत झळकावला फलक

काय घडले – काय बिघडले?

निवडणुकांचा उत्सव म्हणजे पदाधिकारी व कार्यकर्त्यांसाठी सुगीचा काळ, तर नेत्यांची कसोटी असते. बुलढाणा जिल्ह्यात पुढील काही महिन्यांमध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी राहील. बुलढाणा जिल्हा परिषद व जिल्ह्यातील १३ पंचायत समित्यांच्या प्रारूप प्रभाग रचनेची अधिसूचना जिल्हाधिकाऱ्यांनी २ जूनला प्रसिद्ध केली. त्यामुळे आता राजकीय हालचालींना वेग आला आहे. बुलढाणा जिल्हा परिषदेत महाविकास आघाडीच्या झेंड्याखाली काँग्रेस, शिवसेना व राष्ट्रवादीने एकत्र येत सर्वात मोठा पक्ष असूनही भाजपला सत्तेबाहेर ठेवले. महाविकास आघाडीच्या सत्तेत अध्यक्षपद काँग्रेसकडे, तर शिवसेनेकडे उपाध्यक्षपद होते. यापूर्वी भाजपने राष्ट्रवादीसोबत हातमिळवणी करून सत्ता उपभोगली.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यातील बदलेल्या सत्ता समीकरणाचे पडसाद बुलढाणा जिल्हा परिषदेत उमटले. जिल्ह्यात एकमेकांचे सूर जुळत नसतानाही नेत्यांना महाविकास आघाडीसाठी एकत्र यावे लागले. २०१७ मध्ये झालेल्या बुलढाणा जिल्हा परिषदेच्या ६० जागांसाठी झालेल्या निवडणुकीत सर्वाधिक २४ जागा भाजपने जिंकल्या होत्या. काँग्रेस १४, राष्ट्रवादी ८, शिवसेना १०, भारिप व अपक्ष प्रत्येकी दोन सदस्य होते. भाजपच्या एका सदस्याने कालांतराने राजीनामा दिला. मार्च महिन्यात कार्यकाळ संपल्याने सध्या जिल्हा परिषदेवर प्रशासक आहेत. जिल्हा परिषद निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया होण्यासाठी आणखी काही दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.

जिल्हा परिषद निवडणुकीला महाविकास आघाडी एकत्रित सामोरी जाते की ते स्वबळावर निवडणूक रिंगणात उतरतात? यावर बरीच गणिते अवलंबून राहतील. या निवडणुकीसाठी भाजपकडून सूक्ष्म नियोजनावर भर देण्यात आला आहे. गेल्या अडीच वर्षांच्या काळात सत्तेपासून दूर राहिलेल्या भाजपचे पूर्ण बहुमत मिळवण्याचे लक्ष्य राहील. काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेकडूनही निवडणुकांसाठी जुळवाजुळव सुरू आहे. काही जागांवर वंचित बहुजन आघाडी, प्रहार जनशक्ती पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना प्रमुख पक्षांना धक्का देऊ शकतात.

सोलापूर : सक्षम नेतृत्वाअभावी सोलापूरच्या ‘विकासा’ची राजकीय चोरी

बुलढाणा जिल्ह्याातील नऊ नगरपालिकांचा कार्यकाळ देखील संपला आहे. त्यातील आठ नगरपालिकांची प्रभागरचना अंतिम टप्प्यात, तर चिखली नगर पालिकेची हद्दवाढ झाल्याने प्रभागरचना नव्याने करावी लागणार आहे. चिखली, बुलढाणा, खामगाव, मलकापूर, मेहकर, नांदुरा, शेगाव या ‘ब’ वर्ग व देऊळगाव राजा, जळगाव जामोद या ‘क’ वर्ग पालिकांची निवडणूक होणार आहे. राष्ट्रवादीचे नेते तथा पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, शिवसेनेचे खासदार प्रतापराव जाधव, काँग्रेस नेते राहुल बोंद्रे, माजी आमदार दिलीपकुमार सानंदा, हर्षवर्धन सपकाळ, भाजपचे नेते आ. डॉ. संजय कुटे, जिल्हाध्यक्ष आमदार आकाश फुंडकर, आमदार श्वेता महाले आदी जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांसाठी अत्यंत प्रतिष्ठेच्या व महत्त्वपूर्ण ठरणार आहेत.

संभाव्य राजकीय परिणाम

२०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीची रंगीत तालीम म्हणून देखील या निवडणुकांकडे पाहिले जात आहे. वाढलेली लोकसंख्या लक्षात घेता बुलढाणा जिल्हा परिषदेच्या आठ, तर पंचायत समित्यांच्या १६ जागा वाढल्या आहेत. महाविकास आघाडीतील पक्षांनी राज्यातील प्रयोग जिल्ह्यात राबवल्यास त्या राजकीय यशाचा परिणाम आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीवर होऊ शकतो. त्यामुळे भाजपसाठी स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निकाल खूप महत्त्वाचे ठरणार आहेत.

Story img Loader