दिगंबर शिंदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
सांगली : सत्तेवर असलेल्या बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये वादाची ठिणगी विटा येथे शनिवारी झालेल्या कार्यक्रमामध्ये पडली. कामगार तथा पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या जाहीर सत्काराचे आयोजन भाजपच्यावतीने करण्यात आले होते. यावेळी खास आमंत्रित केलेल्या बाळासाहेबांची शिवसेनेचे उपनेते आमदार अनिल बाबर यांना २०१९ मध्ये निवडून देउन चूक केली, यापुढे वरिष्ठांना सांगून ही चूक सुधारली जाईल असा इशारा भाजपचे प्रवक्ते आ. गोपीचंद पडळकर यांनी जाहीर सभेत आमदार बाबर यांच्यासमोरच दिला. तर कोणत्या ठिकाणी काय बोलायचे याचे संस्कार व भान आपल्याला असल्याचे सांगत अनिल बाबर यांनी पडळकर यांच्यावरील संस्कारावरच प्रश्नचिन्ह उपस्थित करत पडळकर यांना किंमत देत नसल्याचे सूचित केले.
हेही वाचा… पालकमंत्री उदय सामंतांच्या सामोपचाराच्या भूमिकेमुळे ‘नियोजन’ची बैठक खेळीमेळीत
हेही वाचा… फडणवीस-बावनकुळेंच्या नागपुरात भाजपची पाटी कोरी; तेरा पंचायत समित्यांमध्ये एकही सभापतीपद नाही
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बाहेर पडून भाजपच्या मदतीने राज्यात सत्तांतर घडवून आणले. शिवसेनेतून बाहेर पडून नवीन गट बांधणीमध्ये सांगली जिल्ह्यातील शिवसेनेचे एकमेव आमदार असलेले अनिल बाबर हे मुख्यमंत्री शिंदे यांच्या सोबत आहेत. या गटाकडून आमदार बाबर यांना मंत्री पद निश्चित मानले जात असताना पहिल्या टप्प्यात त्यांना मंत्रिपदापासून वंचित राहावे लागले. तत्पूर्वी जिल्ह्याचे पालकमंत्री पद बाबर यांनाच ज्येष्ठत्वानुसार मिळेल असा होरा होता. मात्र, सांगलीचे पालकमंत्री पद भाजपला आल्याने कामगार मंत्री खाडे यांच्या वाट्याला हे पद आले. या निमित्ताने खानापूर तालुका भाजपच्या वतीने मंत्री खाडे यांच्या जाहीर सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. पंधरा दिवसाांपूर्वी मतभेद गाडून एकत्र आलेले खासदार संजयकाका पाटील व आमदार पडळकर यांना या कार्य्रकमाचे निमंत्रण होते. याशिवाय सत्तेत भागीदार असलेल्या बाळासाहेबांची शिवसेना या गटाचे उपनेते आमदार बाबर यांना विशेष निमंत्रित करण्यात आले होते. मात्र, खासदार पाटील यांनी या कार्यक्रमापासून चार हात दूर राहणेच पसंत केले. तर आमदार बाबर, आमदार पडळकर व भाजपचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार पृथ्वीराज देशमुख आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना पडळकर यांनी आमदार बाबर यांना २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये मदत केली ही चूकच ठरली असल्याचे सांगत जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीमध्ये गद्दारी केल्याचा आरोप बाबर यांच्यावर केला. आमदार बाबर यांचे आटपाडीतील समर्थक तानाजी पाटील हे निवडून आले, मात्र, माजी आमदार राजेंद्र देशमुख यांचा पराभव झाला तो केवळ आमदार बाबर यांच्यामुळेच असा पडळकर यांचा रोख होता. २०२४ मध्ये होणार्या निवडणुकीवेळी वरिष्ठांना सांगून ही चूक दुरूस्त केली जाईल असेही त्यांनी सांगितले.
हेही वाचा… साईबाबा प्रकरणात कुणाचे चुकले? काय चुकले?
पडळकर यांच्या भाषणानंतर आमदार बाबर यांनी भाषण करण्यास नकार दिला. मात्र, आयोजकांच्या आग्रहानंतर त्यांनी केवळ आपणावर चांगले संस्कार झाले असून कोठे काय बोलायचे हे आपणास कळते असे सांगत आमदार पडळकर यांच्या संस्कारावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. भाजपचा कार्यक्रम असतानाही बाबर यांना खास निमंत्रित करून आयोजकांनी अवमान केला असल्याची भावना बाबर समर्थकांची झाली असून या निमित्ताने दोन्ही गटात वादाची ठिणगी पडली आहे.