सोलापूर : आगामी विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली असताना इकडे सोलापूर जिल्ह्यात मोहोळ तालुक्यात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे वजनदार नेते, माजी आमदार राजन पाटील-अनगरकर यांच्या विरोधात त्यांच्याच पक्षातील नेत्यांसह सर्वपक्षीय नेते मंडळींनी एकत्र येऊन रणशिंग फुंकले आहे. राजन पाटील यांच्या अनगर गावात अप्पर तहसील कार्यालय मंजूर झाल्याच्या मुद्यावर पेटलेल्या संघर्षात राजन पाटील व तेथील आमदार यशवंत माने यांच्या प्रतिमांना जोडे मारून त्यांना ‘ तालुका बंदी ‘ जाहीर करण्यापर्यंत विरोधकांची मजल गेली आहे. आश्चर्य म्हणजे हे आंदोलन राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील यांच्याच पुढाकाराने तीव्र होत आहे. त्यामुळे हा कलगीतुरा आणखी कोणते टोक गाठणार याची साऱ्यांनाच उत्सुकता आहे.

सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील मोहोळ तालुक्यातील राजकीय संघर्ष नेहमीच टोकाचा असतो. स्थानिक राजकारणात वर्षानुवर्षे राजन पाटील यांची मजबूत पकड राहिली आहे. याच तालुक्यातील नरखेड गावचे उमेश पाटील हे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेश प्रवक्ते असून त्यांचे राजन पाटील यांच्याशी नेहमीच खटके उडाले आहेत. विरोधकही कधी टीका करणार नाहीत, एवढी जहरी टीका उमेश पाटील हे राजन पाटील व त्यांच्या कुटुंबीयांवर करीत असतात. उल्लेखनीय बाब म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वतः मोहोळ तालुक्यातील भेटीत या उभयतांचा संघर्ष अनुभवला आहे. राजन पाटील यांचे वडील बाबूराव पाटील-अनगरकर यांची मोहोळ तालुक्यात १९५२ सालापासून हुकूमत होती. त्यांचे विरोधक काँग्रेसचे दिवंगत माजी मंत्री शहाजीराव पाटील होते. त्यांच्या पश्चात १९९५ पासून तालुक्यात राजन पाटील यांचे कायम वर्चस्व राहिले आहे. २००९ साली मतदारसंघाच्या पुनर्रचनेत मोहोळ विधानसभा मतदारसंघ राखीव झाला. येथून माजी मंत्री प्रा. लक्ष्मण ढोबळे व रमेश कदम हे यापूर्वी राजन पाटील यांच्याच मर्जीने आमदार झाले होते. विद्यमान आमदार यशवंत माने मूळचे इंदापूरचे असले तरी त्यांना राजन पाटील यांनी निवडून आणले आहे. आतापर्यंत त्यांच्याशिवाय राजकारणात पान हलत नाही, अशी स्थिती चालत आली असताना अलिकडे त्यांचे विरोधक वाढले आहेत. त्यांचे खच्चीकरण करण्यासाठी विरोधक याच तालुक्यातील टाकळी सिकंदरच्या भीमा सहकारी साखर कारखान्याचे सर्वेसर्वा, भाजपचे राज्यसभा खासदार धनंजय ऊर्फ मुन्ना महाडिक यांची मदत घेतात. परंतु राजन पाटील यांचा स्थानिक राजकारणावरील प्रभाव कायम राहिला आहे.

Udayanraje Bhosale criticism of Sharad Pawar candidate
पाडा पाडा म्हणणाऱ्या पवारांचे उमेदवारच लोक पाडतील; उदयनराजे यांचे टीकास्त्र
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Kangana Ranaut criticism that Priyanka Gandhi has no respect for democracy
प्रियंका गांधीना लोकशाहीचा आदर नाही,कंगना रानौतची टीका..
jharkhand assembly election 2024 amit shah attack at rahul gandhi
झारखंडमध्ये ‘राहुल विमान’ कोसळणार! केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची टीका
Arjuni Morgaon Constituency , Ajit Pawar, Manohar Chandrikapure,
विदर्भात अजित पवारांची भाजपकडून कोंडी
sunetra pawar dhairyasheel mane on central textile committee
केंद्रीय वस्त्रोद्योग समितीवर धैर्यशील माने, सुनेत्रा पवार
ajit pawar
पिंपरी: अजित पवारांच्या पक्षाच्या देहू शहराध्यक्षाच्या मोटारीतून रोकड जप्त
Hadapsar, NCP, Hadapsar latest news,
हडपसरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वर्चस्वासाठीची लढाई

हेही वाचा : परळीत मुंडे मैदानात पण कमळाविना !

अलिकडेच राजन पाटील यांनी स्वतःच्या अनगर गावात दुय्यम निबंधक कार्यालयापाठोपाठ अप्पर तहसील कार्यालयही मंजूर करून घेतले आहे. या अप्पर तहसील कार्यालयाशी अनगरसह नरखेड, शेटफळ व पेनूर या चार महसूल मंडळांतील ४३ गावे जोडली आहेत. नरखेड, पेनूर व शेटफळ ही तीन महसूल मंडळे राजन पाटील यांच्या विरोधकांशी संबंधित आहेत. त्यातूनच अप्पर तहसील कार्यालय मंजुरीला तीव्र विरोध होऊन संघर्ष पेटला आहे. त्याचाच एक भाग म्हणून पूर्वाश्रमीचे राजन पाटील यांचेच घनिष्ठ सहकारी राहिलेले मनोहर डोंगरे व त्यांचे पुत्र विजयराज डोंगरे यांच्यासह भाजपमधून राष्ट्रवादी शरद पवार गटात दाखल झालेले संजय क्षीरसागर, शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख चरणराज चवरे, शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे स्थानिक नेते दीपक गायकवाड, मानाजी माने आदींची उमेश पाटील यांनी एकत्र मोट बांधली आहे. या संघर्षाला आगामी विधानसभा निवडणुकीची किनार असल्यामुळे हा चर्चेचा विषय ठरला आहे.

हेही वाचा : काकांचा पत्ता कापून अखिलेश यादवांनी ब्राम्हण नेत्याला दिले विरोधी पक्षनेतेपद; कोण आहेत माता प्रसाद पांडे?

या संघर्षात आमदार यशवंत माने यांच्या जातीच्या दाखल्यावर त्यांच्या पक्षाचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी जोरदार आक्षेप घेत त्यांची आमदारकी आपण मान्यच करीत नसल्याचे सांगतात. तर यशवंत माने यांनी आपण कैकाडी समाजाचे (अनुसूचित जात) असल्याचे स्पष्टीकरण देताना, उमेश पाटील यांच्यामुळेच त्यांच्या तहसीलदार पत्नीला लाचलुचपतीच्या गुन्ह्यात अडकण्याची वेळ आल्याचा पलटवार केला आहे. एकमेकांवरील आरोप-प्रत्यारोपांनी पातळी सोडल्याचे दिसून येते. या टोकाला गेलेल्या संघर्षाचे स्वरूप आगामी विधानसभा निवडणुकीत प्रत्यक्षात कसे राहणार ? राजन पाटील यांची सत्तास्थाने उलथलून टाकण्यासाठी सर्व विरोधकांनी घेतलेली शपथ फलद्रूप ठरणार का ? महत्वाचे म्हणजे या संघर्षाला उपमुख्यमंत्री अजित पवार हे लगाम घालणार का ? शेवटच्या टप्प्यात आणखी कोणती राजाकीय उलथापालथ होणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.