BJP-JDU Alliance in Bihar : महाराष्ट्रात सलग दुसऱ्यांदा सत्तास्थापन केल्यानंतर भाजपाने महायुतीतील घटकपक्षांबरोबर चर्चा करत खातेवाटपाचा गुंता सोडवला. यानंतर आता भाजपाने बिहारमधील आपल्या मित्रपक्षांमध्ये समन्वय वाढविण्यावर लक्ष केंद्रित केलं आहे. बिहारमध्ये २०२५ च्या अखेरीस विधानसभेची निवडणूक होणार आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याच नेतृत्वाखाली निवडणूक लढवली जाईल, असं एनडीएमधील मित्रपक्षांनी म्हटलं आहे. तसेच आगामी निवडणुकीसाठी राज्यातील नेतृत्वात कोणताही फेरबदल केला जाणार नाहीत, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नुकतीच एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी बिहारमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या नेतृत्वाबाबत भाष्य केलं होतं.

अमित शाह काय म्हणाले होते?

“२०२५ च्या बिहार निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (NDA) नेतृत्वाबद्दल आम्ही एकत्र बसून निर्णय घेऊ”, असं अमित शाह यांनी मुलाखतीत म्हटलं होतं. यानंतर बिहारमधील भाजपाचे अध्यक्ष दिलीप जैस्वाल यांनी स्पष्टीकरण देताना सांगितले की, अमित शहा हे सांगण्याचा प्रयत्न करीत होते की, ते अशा पक्षाचे कार्यकर्ते आहेत, ज्याचे निर्णय संसदीय मंडळाकडून घेतले जातात. नितीश कुमार हेच २०२५ च्या निवडणुकीत बिहारमधील एनडीएचे नेतृत्व करतील, यात शंका नाही”, असंही जैस्वाल यांनी स्पष्ट केले.

Arvind Kejriwal News
Arvind Kejriwal : ‘शीशमहल’चा मुद्दा अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात जाणार? नवी दिल्लीची जागा जिंकण्यासाठीचा मुख्य अडसर?
Pushpak train accident of karnataka express play horn may save life of many passengers
Jalgaon Train Accident : कर्नाटक एक्स्प्रेसच्या चालकाने भोंगा वाजवला…
कुंभमेळ्यात दलित आणि ओबीसींना आकर्षित करण्याचा भाजपाचा प्रयत्न? नेमकं कारण काय? (फोटो सौजन्य पीटीआय)
Kumbh Mela 2025 : कुंभमेळ्यात दलित आणि ओबीसींना आकर्षित करण्याचा भाजपाचा प्रयत्न? नेमकं कारण काय?
uddhav Thackeray Devendra fadnavis
“पुढील मकर संक्रांतीपर्यंत ठाकरे-फडणवीस एकत्र”, आमदार रवी राणांचा दावा
ajit pawar ncp latest news in marathi
अजित पवार स्वबळावर लढणार का ?
Devendra Fadnavis On Local Body Election
Devendra Fadnavis : आगामी महापालिकेच्या निवडणुकीबाबत देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान; म्हणाले, “पुढील तीन-चार महिन्यांत…”
Nitish Kumar
Nitish Kumar : नितीश कुमार ‘ॲक्शन मोड’वर; बिहार विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मंत्रिमंडळात मोठे फेरबदल करणार?
CM Devendra Fadnavis Nagpur Interview
Devendra Fadnavis : कठोर राजकारणी कोण मोदी की अमित शाह? देवेंद्र फडणवीसांनी काय उत्तर दिलं?

हेही वाचा : Congress Views on Savarkar : काँग्रेसचे सावरकरांबद्दलचे विचार कसे कठोर होत गेले?

या चर्चेवर पांघरूण टाकण्यासाठी भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीने नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली राज्यभरात संयुक्त मोहीम राबवण्याची घोषणाही केली. योजनेनुसार, मुख्यमंत्री नितीश कुमार हे १५ जानेवारीला पश्चिम चंपारणमधील बगहा येथे सभा घेतील. यानंतर ते राज्यातल्या प्रत्येक एनडीएच्या संयुक्त सभांना संबोधित करतील. नितीश कुमार हे पूर्व चंपारण, सीतामढी, शेओहर आणि मुझफ्फरपूर भागात भेट देतील. २२ जानेवारीला वैशाली येथे बैठक घेऊन ते प्रचाराच्या पहिल्या टप्प्याचा समारोप करतील.

महाराष्ट्रात जे घडलंय, ते बिहारमध्ये घडणार?

बिहारमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीत भाजपा आणि नितीश कुमार यांच्या जनता दल युनायटेड (JDU) व्यतिरिक्त जीतन राम मांझी यांचा हिंदुस्तानी अवाम मोर्चा (सेक्युलर) आणि चिराग पासवान यांच्या लोकजनशक्ती पक्षाचा समावेश आहे. महाराष्ट्रात नुकतीच पार पडलेली विधानसभेची निवडणूक महायुतीने तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढवली होती. मात्र, विजयानंतर भाजप आणि शिवसेना यांच्यात मुख्यमंत्रीपदावरून रस्सीखेच सुरू झाली. अखेरीस भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, तर एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्रीपदावर समाधान मानावे लागले.

बिहारप्रमाणेच महाराष्ट्रातही भाजपा हा सत्ताधारी आघाडीतील सर्वात मोठा पक्ष आहे. परंतु, बिहारमधील एनडीए नेत्यांचे म्हणणे आहे की, राज्याचे प्रकरण वेगळे आहे. जनता दल पक्षाच्या एका नेत्याने सांगितले की, “भाजपला माहिती आहे की नितीश कुमार हे एनडीएसाठी अपरिहार्य आहेत. त्यामुळे ते निवडणुकीपूर्वी कोणताही दिखावा करणार नाहीत” दरम्यान, या मुद्द्याचे समर्थन करत राज्यातील एका भाजपा नेत्याने सांगितले की, “अमित शाह यांनी केलेल्या विधानाचे (२०२५ च्या निवडणुकांसाठी एनडीए नेतृत्वावर) दिलीप जयस्वाल यांना २४ तासांच्या आत स्पष्टीकरण द्यावे लागले. कारण, नितीश कुमार हे आणखी काही काळ राज्याच्या राजकारणावर वर्चस्व गाजवतील. भाजपाला फक्त शांतपणे त्यांच्या सूर्यास्ताची वाट पाहावी लागेल.”

नितीश कुमार यांच्या नेतृत्वाला पाठिंबा

आगामी विधानसभा निवडणुकीत एनडीएचे नेतृत्व करण्यासाठी नितीश कुमार यांना मोठा पाठिंबा मिळाला आहे. कारण, चिराग पासवान यांच्या लोकजनशक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष राजू तिवारी यांनीही त्यांच्या नावाला समर्थन दिलं आहे. तिवारी म्हणाले, “आगामी निवडणुकांमध्ये नितीश कुमार यांच्या नेतृत्वावर पूर्णपणे सहमती आहे. जयस्वाल यांनी आधीच आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आम्ही देखील त्यांच्या मताशी सहमत आहोत.”

सतत आपली भूमिका बदलत असल्याने नितीश कुमार यांना बिहारमध्ये ‘पलटू राम’ असं टोपणनाव पडलं आहे. मात्र, तरी देखील त्यांनी २००० पासून राज्याच्या राजकारणात आपली ओळख निर्माण केली आहे. जेव्हा भाजपाने रामविलास पासवान यांना मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली. तेव्हा त्यांनी राष्ट्रीय राजकारणात सक्रिय राहण्याची इच्छा बोलून दाखवली. त्यानंतर भाजपाने राज्याचे नेतृत्व करण्यासाठी आपले प्रमुख नेते सुशील कुमार मोदी यांच्याऐवजी नितीश कुमार (तेव्हा समता पक्षात असलेले) यांना पुढे आणले. या निर्णयामुळे भाजपाचे वरिष्ठ नेते कैलाशपती मिश्रा नाराज झाले. त्यांनी पक्षाच्या निर्णयाला विरोध करत काही काळ राजकारणातून विश्रांती घेतली. त्यावेळी मिश्रा म्हणाले होते की, “भविष्यात भाजपा नितीश कुमार यांच्या छायेतून बाहेर पडू शकणार नाही.”

अरुण जेटली यांनी सूचवले होते नाव

दरम्यान, बिहारचे मुख्यमंत्री म्हणून नितीश कुमार यांचा पहिला कार्यकाळ फक्त एक आठवडाच टिकला. परंतु, यामुळे त्यांना राज्याच्या राजकारणात एक महान नेता म्हणून ओळख मिळाली. त्यांनी हा दर्जा आजपर्यंत कायम राखला आहे. नितीश कुमार यांच्याविरोधात भाजपाने दुहेरी राजकारण पद्धतीची ही काही पहिलीच वेळ नाही. फेब्रुवारी २००५ च्या विधानसभा निवडणुकीमध्येही भाजपाने अशीच पद्धत वापरली होती. मात्र, त्यावेळी बिहारमध्ये वेगवेगळ्या पक्षांना जनादेश मिळाला. ऑक्टोबर २००५ च्या निवडणुकांमध्येही एनडीएने मुख्यमंत्रीपदाचा चेहरा समोर आणला नव्हता. ही निवडणूक ४ टप्प्यांमध्ये होणार होती. यातील पहिल्या टप्प्यात एनडीएची खराब कामगिरी झाल्याचं दिसून येत होतं. यानंतर एनडीएचा चेहरा म्हणून नितीश कुमार यांना समोर आणले जावे, असे आवाहन माजी केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांनी भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांना केले.

अरुण जेटली यांनी भाजपाचा संभाव्य मुख्यमंत्री चेहरा म्हणून सुशील मोदी यांचे नाव सूचवले, तर नितीश कुमार यांचे नाव महागठबंधनचे राज्यातील प्रमुख नेते म्हणून समोर आणले. त्यांची ही रणनीती बिहारच्या राजकारणावर प्रभाव टाकणारी ठरली. निवडणुकीत भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीने २४३ पैकी १३० जागांवर विजय मिळवला. नितीश कुमार यांच्या जनता दल युनायटेडने सर्वाधिक जागा जिंकल्यामुळे त्यांना मुख्यमंत्रीपद देण्यात आले, तर सुशीलकुमार मोदी यांना उपमुख्यमंत्रीपदावर समाधान मानावे लागले. यानंतर ५ वर्षानंतर बिहारमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत एनडीने तब्बल २०६ जागा जिंकत अभूतपूर्व यश मिळवलं. या निवडणुकीतही नितीश कुमार यांच्या पक्षाने तब्बल ११५ जागा जिंकल्या. तर भाजपाला ९१ जागांवर विजय मिळवता आला.

हेही वाचा : काँग्रेसने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा दोनदा पराभव केला होता? काय घडलं होतं तेव्हा?

आरजेडीबरोबर केली होती सत्तास्थापन

२०१३ मध्ये नितीश कुमार हे राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून (NDA) बाहेर पडले. २०१५ मध्ये त्यांनी राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेसबरोबर हातमिळवणी केली. या निवडणुकीत युतीने तब्बल १७८ जागा जिंकल्या आणि नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री झाले. लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दल पाठोपाठ नितीश कुमार यांचा जनता दल युनायटेड हा सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला. २०१७ मध्ये पुन्हा नितीश कुमार हे महाआघाडी सोडून राष्ट्रीय लोकशाही आघाडीत सहभागी झाले. एनडीएने २०२० मध्ये झालेली निवडणूक नितीश कुमार यांच्या नेतृत्वात लढवली. या निवडणुकीत भाजपाने सर्वाधिक ७४ जागा जिंकल्या. तर नितीश कुमार यांच्या पक्षाला केवळ ४३ जागांवरच विजय मिळवता आला. तरी देखील मुख्यमंत्रीपदी नितीश कुमार यांचीच वर्णी लागली.

२०२२ मध्ये नितीश कुमार पुन्हा भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून बाहेर पडले. त्यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी चांगलाच संताप व्यक्त केला. नितीश कुमार यांच्यासाठी एनडीएचे दरवाजे बंद झाले आहेत, असं शाह म्हणाले होते. नितीश कुमार यांच्याविरोधात भाजपाने कुशवाह नेते सम्राट चौधरी यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवले होते. मात्र, नितीश कुमार यांनी निवडणुकीत चांगलं यश मिळवलं. यावर्षी जानेवारीमध्ये जेव्हा नितीश कुमार पुन्हा एनडीएमध्ये सहभागी झाले, तेव्हा त्यांना पुन्हा मुख्यमंत्रीपद मिळालं. तर सम्राट चौधरी यांची उपमुख्यमंत्रीपदी वर्णी लागली.

भाजपासाठी नितीश कुमार इतके महत्वाचे का?

दरम्यान, नितीश कुमार हे अत्यंत हुशार नेते असून बिहारच्या राजकारणात ते आपला ठसा उमटवण्यात यशस्वी झालेले आहेत. त्यांच्या पक्षाने बिहारच्या राजकारणात एक वेगळंच स्थान निर्माण केलं आहे. प्रत्येक विधानसभा निवडणुकीत नितीश कुमार यांच्या पक्षाने चांगली कामगिरी केलेली आहे. विशेष बाब म्हणजे, भाजपा आणि राष्ट्रीय जनता दल पक्षाला सत्तास्थापन करण्यासाठी जेवढ्या जागांची गरज असते, तेवढ्याच जागा नितीश कुमार यांचा पक्षाकडे असतात. त्यामुळे कोणत्याही पक्षाला पाठिंबा देऊन कुमार यांना सत्ता उपभोगता येते. महाराष्ट्रातील मावळत्या सरकारमध्ये एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला महायुतीत मोठे महत्व होते. कारण, त्यांच्याकडे आमदारांचे संख्याबळ पुरेसे होते. यंदा मात्र, एकनाथ शिंदे यांच्या पक्षाने अधिक जागा जिंकल्य असल्या तरी, भाजपाला सत्तास्थापनेसाठी फक्त १३ जागांची आवश्यकता होती. अजित पवार यांच्या पक्षाकडून पाठिंबा मिळत असल्याने त्यांना शिंदेंची फारशी मनधरणी करावी लागली नाही.

Story img Loader