दीपक महाले
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
जळगाव : राजकारणातील घराणेशाही हा न संपणारा विषय आहे. काही जणांकडून त्याचे समर्थन केले जाते. तर, काही जण त्यास विरोध करतात. सध्या जळगाव जिल्ह्यातील एक मंत्री आणि दुसऱ्या माजी मंत्र्यात घराणेशाहीवरून एकमेकांवर टीकास्त्र सोडले जात आहे. गंमत म्हणजे या दोघांच्या घरात राजकीय घराणेशाही आहे.
हेही वाचा… विरोधकांनी सावरकर मुद्द्यावर चर्चेसाठी समोर येण्याचे बाळासाहेब थोरात यांचे आवाहन
नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा येथे जाहीर कार्यक्रमात भाजपचे ग्रामीण विकास मंत्री गिरीश महाजन यांनी आमदार एकनाथ खडसेंना घरातच सर्व पदे पाहिजेत, असा टोला लगावला होता. महाजन यांच्या या टीकेचा खडसे यांनी खरपूस समाचार घेतला. महाजन यांच्या घरातही पदे आहेत. त्यांच्या पत्नी साधना महाजन या पंचवीस वर्षे सरपंच, जिल्हा परिषद सदस्या आणि नगरपालिकेच्या अध्यक्षा का राहतात, असा प्रश्न खडसे यांनी विचारला. महाजन यांच्या घरातही पदे आहेत. हे ते कसे विसरतात ? त्यांनी पंचवीस वर्षे एकाच घरात पदे ठेवली, ती पदे दुसर्याला द्यायला पाहिजे होती, अशी टीका खडसेंनी केली.
हेही वाचा… राहुल गांधींची यात्रा भारतीय राजकारणावर प्रभाव टाकेल, तेलंगणातील महिला उद्योजिकेचा विश्वास
तळोदा येथे जाहीर कार्यक्रमात महाजन यांच्या शेजारी खासदार हीना गावित बसल्या होत्या. हीना यांचे वडील डाॅ. विजयकुमार गावित हे मंत्री आहेत. विजयकुमार यांची दुसरी मुलगी जिल्हा परिषदेची अध्यक्षा आहे. त्यांचे भाऊ आमदार आहेत, हे सर्व एकाच कुटुंबातील आहेत. हे सर्व भाजपचे आहेत. आणि त्यांच्या शेजारी जाऊन महाजन घराणेशाहीविषयी वक्तव्य करतात, याबद्दल खडसे यांनी आश्चर्य व्यक्त केले. महाजन यांना घराणेशाहीचा तिटकारा असल्यास त्यांनी साधना महाजन सांभाळत असलेली पदे दुसर्यांना द्यावयास हवी होती. एक बोट दुसर्याकडे दाखवित असताना चार बोटे आपल्याकडे असतात हे महाजन यांनी विसरू नये, असा टोलाही खडसे यांनी हाणला. साधना महाजन या कुटुंबातीलच आहेत, मग हे महाजन का विसरत आहेत ? गिरीश महाजन यांना मुलगा असता तर मुलगा आणि सून दोघेही राजकारणात आले असते, भाजपमध्ये घराणेशाही असलेल्यांची संख्या मोठी आहे. त्यात राणे, फडणवीस या कुटुंबाचा खडसे यांनी उल्लेख केला. देवेंद्र फडणवीसांचे वडील हे आमदार होते. त्यांच्या काकू या मंत्री होत्या. देवेंद्र फडणवीस हे परिवारातून राजकारणात आले आहेत, मग त्यांनाही हा नियम लागू केला पाहिजे की नाही, असा प्रश्नही खडसेंनी उपस्थित करुन महाजन यांची बोलती बंद करण्याचा प्रयत्न केला आहे.
जिल्हा दूध संघाच्या निवडणूक राजकारणामुळे आधीच महाजन-खडसे यांच्यातील वाद विकोपाला गेला असताना त्यात घराणेशाहीच्या विषयावरून वाद चिघळण्याची शक्यता आहे.