दयानंद लिपारे

कोल्हापूर : गडहिंग्लजमधील ‘गोडसाखर’ कारखान्याच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ, भाजपचे नेते डॉ. प्रकाश शहापूरकर यांना यश आल्याने त्यांचा डंका वाजला. निवडणुक काळात झालेली टीका, वादग्रस्त विधाने यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही आमदारांमध्ये अंतर पडले आहे. पराभवाचा सामना करावा लागलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजेश पाटील, जनता दलाचे माजी आमदार श्रीपतराव शिंदे यांच्या राजकीय अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Rahul Gandhi poha Nagpur
राहुल गांधी नागपुरात आले आणि…टमाटरने सजवलेल्या तर्री पोह्यांसाठी थेट….
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Ramdas Athawale, RPI pune, office bearers of RPI,
महायुतीची डोकेदुखी रिपाइं वाढणार ! खासदार रामदास आठवले यांच्याकडून रिपाइं पदाधिकाऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न
Congress leader rahul Gandhi rally in nanded
आरक्षणासाठी ५० टक्के मर्यादा तोडू! नांदेडमधील सभेत राहुल गांधींकडून मोदी लक्ष्य
jharkhand assembly election 2024 amit shah attack at rahul gandhi
झारखंडमध्ये ‘राहुल विमान’ कोसळणार! केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची टीका
sunetra pawar dhairyasheel mane on central textile committee
केंद्रीय वस्त्रोद्योग समितीवर धैर्यशील माने, सुनेत्रा पवार
Controversial statement of MP Dhananjay Mahadik on Ladki Bahin Yojana
लाडकी बहीण योजनेवरून खासदार धनंजय महाडिक यांचे वादग्रस्त विधान; खासदार प्रणिती शिंदे, आमदार सतेज पाटील यांचे टीकास्त्र
pune police arrested three for stealing mobile phones
मोबाइल चोरणाऱ्या सराइतांना अटक; १२ मोबाइल संच जप्त; ९ गुन्हे उघड

गडहिंग्लज तालुक्याची अर्थ वाहिनी म्हणून कारखान्याचे संस्थापक आप्पासाहेब नलवडे यांचे नाव असलेल्या सहकारी साखर कारखान्याची संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक मोठ्या इर्षेने पार पडली. सहकार क्षेत्राच्या वलयाचा फायदा घेऊन सोयीच्या आघाडी करण्यात आल्या. प्रचार काळामध्ये आरोप प्रत्यारोपांची राळ उडाली. कारखान्यात पुन्हा सत्ता मिळवण्यात यश मिळालेले आमदार मुश्रीफ, माजी अध्यक्ष डॉ. शहापूरकर यांच्या विरोधात विरोधकांनी शरसंधान केले होते. आता हा जुना कारखाना सक्षम करण्याची मोठी जबाबदारी त्यांच्या खांद्यावर असणार आहे. या निमित्ताने झालेले राजकीय मंथन कागल, गडहिंग्लज, आजरा, चंदगड या तालुक्यांवर प्रभाव टाकणारे असणार आहे. तद्वत त्याचा परिणाम कागल व चंदगड विधानसभा मतदारसंघात दिसणार आहे.

हेही वाचा… पाच तासांत तयार होते नवीन गाव

मुश्रीफ – पाटील अंतर वाढले

कोल्हापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे हसन मुश्रीफ व राजेश पाटील हे दोन आमदार आहेत. त्यांच्यातील वाद आजवर छुपा होता. गोकुळ दूध संघात राजेश पाटील यांच्या पत्नी व निकटच्या कार्यकर्त्यांचा पराभव झाल्याने पहिली ठिणगी उडाली. तेव्हा त्यांनी हा स्वकियांकडून घात झाला आहे. वेळ येईल तेव्हा हिशोब पूर्ण केल्याशिवाय हा आमदार स्वस्थ बसणार नाही, असा इशारा दिला होता. गोडसाखर कारखान्यामध्ये आमदार पाटील यांचा मुश्रीफ यांनी पुन्हा पराभव केला आहे. निवडणुकीच्या निकालानंतर राजेश पाटील यांनी मुश्रीफ यांची भेट घेऊन अभिनंदन केले. इतक्यावरून दोघांतील वाढलेले अंतर कमी होणार नाही. आगामी विधानसभा निवडणुकीत पाटील यांचा पत्ता कट करून नवे नाव पुढे आणले जाईल असेही संकेत मिळत आहेत. आमदार पाटील यांनी मजूर संघाच्या निमित्ताने वातावरण निर्मिती केली होती. ती त्यांनी गडहिंग्लज कारखान्यामध्ये पुन्हा करून पाहिली. त्यात यश मिळण्याऐवजी त्यांनी शत्रूंची संख्या वाढवून घेतली आहे. चंदगड बाजार समितीचा कारभार, खत प्रकल्प यावरूनही उलट सुलट चर्चेला उधान आले आहे. यातून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फेरबांधणी होणार असल्याचे दिसत आहे.

हेही वाचा… भारत जोडो यात्रेत बिरसा मुंडा यांचा आठव

कुपेकर कि पर्याय ?

गेल्या विधानसभा निवडणुकीवेळी विधानसभेचे दिवंगत अध्यक्ष बाबा कुपेकर यांच्या पत्नी माजी आमदार संध्यादेवी कुपेकर व कन्या नंदिनी बाभुळकर यापैकी एक जण निवडणूक लढवणार असे वातावरण असताना त्यांनी ऐनवेळी तलवार म्यान केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवारी मिळालेले राजेश पाटील बहुरंगी लढतीत अल्पमतांनी विजयी झाले. भाजपमधील अंतर्गत वादामुळे तेथील उमेदवारास थोडक्यात पराभूत व्हावे लागले. भाजपने तेथे पुन्हा पेरणी सुरू केले आहे. राजेश पाटील यांच्यावरील नाराज असलेले पक्षाचे कार्यकर्ते कुपेकर – बाभुळकर यांनी राजकीय भूमिका स्पष्ट करण्याची मागणी करू लागले आहेत. राष्ट्रवादी अंतर्गत चाचपणी म्हणून जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष अप्पी पाटील किंवा संग्रामसिंह कुपेकर यांचे नाव पुढे आणले जात आहे.

हेही वाचा… सुनील टिंगरे : युवकांमध्ये लोकप्रिय

शिंदे गटाची अग्निपरीक्षा

राज्यातील जनता दलाचा प्रभाव मिणमिणता असताना गडहिंग्लज साखर कारखान्याचे २१ वर्षे नेतृत्व करणारे जनता दलाचे माजी आमदार श्रीपतराव शिंदे यांनी या भागात ठसा निर्माण केला होता. कारखाना निवडणूक पराभवामुळे त्यांची पिछेहाट झाली असून ती भरून काढून राजकारण करणे आव्हानास्पद असणार आहे. कागल विधानसभा मतदारसंघातत गडहिंग्लजचा समावेश असल्याने श्रीपतराव शिंदे गटाची मोलाची मदत मुश्रीफ मिळवत असतात. आता या दोन्ही गटातीलही संघर्ष पुढे आला आहे. शिंदे यांना वगळून गडहिंग्लज नगरपालिकेत आणि विधानसभेसाठी मुश्रीफ यांनी स्वबळाची तयारी चालवली आहे. एकूणच जिल्ह्याच्या दक्षिण भागात गडहिंग्लज कारखाना निवडणुकीच्या निमित्ताने नव्याने फेरबांधणी सुरू झाली आहे.