कविता नागापुरे

भंडारा : शासनाच्या विविध गृहनिर्माण योजनांतर्गत ग्रामीण भागातील पात्र लाभार्थ्यांना दरवर्षी नियमितपणे घरकुलाचा लाभ मिळणे बंधनकारक आहे. मात्र, मागील दोन वर्षांपासून जिल्ह्यात घरकूल योजनांमध्ये सातत्याने अनियमितता दिसून येत आहे. अशातच, दोन दिवसांपूर्वी जिल्ह्यातील ९१४ घरकूल प्रस्तावांसाठी १२ कोटी ३५ लाख ७२ हजार ८०० रुपयांच्या निधीस शासनाची मान्यता मिळाली. यावरून आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि जिल्ह्याचे माजी पालकमंत्री, भाजप नेते डॉ. परिणय फुके यांच्यात श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे. पटोले यांनीच घरकुलासाठी पाठपुरावा केला असताना नेहमी दुसऱ्यांच्या तव्यावर पोळी भाजणाऱ्या डॉ. फुके यांनी नानांच्या घरकुलावर अतिक्रमण केल्याची चर्चा जिल्ह्यात सुरू आहे.

Rahul Gandhi poha Nagpur
राहुल गांधी नागपुरात आले आणि…टमाटरने सजवलेल्या तर्री पोह्यांसाठी थेट….
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
maharashtra assembly elections 2024 security need in maharashtra
‘सेफ’ राहण्यासाठी, एक होण्यापेक्षा…
flat Palava Colony animals, Dombivli Palava Colony animals, Dombivli flat animals
डोंबिवली पलावा वसाहतीमधील अलिशान सदनिकेतून विदेशी वन्यजीव जप्त, ठाणे वन विभागाची कारवाई
ajit pawar
पिंपरी: अजित पवारांच्या पक्षाच्या देहू शहराध्यक्षाच्या मोटारीतून रोकड जप्त
banana cultivation farmer kiran gadkari tried different experiment for banana farming
लोकशिवार: आंतरपिकातील यश !
Eurasian Water Cat Pune District, Indapur,
पुणे जिल्ह्यात प्रथमच दुर्मीळ ‘युरेशियन पाणमांजरा’चा शोध, इंदापूरमधील विहिरीमध्ये पडलेल्या पाणमांजराची सुटका
Controversial statement of MP Dhananjay Mahadik on Ladki Bahin Yojana
लाडकी बहीण योजनेवरून खासदार धनंजय महाडिक यांचे वादग्रस्त विधान; खासदार प्रणिती शिंदे, आमदार सतेज पाटील यांचे टीकास्त्र

जिल्ह्यात यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेंतर्गत लाभार्थ्यांच्या घरकुलाचे प्रस्ताव २०१९ पासून प्रलंबित होते. हिवाळी अधिवेशनात शुक्रवार, ८ डिसेंबर रोजी ९१४ घरकुलांसाठी जवळपास साडेबारा कोटींचा निधी मंजूर करण्यात आला. पटोले यांच्या पाठपुराव्यामुळेच घरकूल योजनेचा निधी मंजूर झाला, असे सांगत त्यांच्या समर्थकांनी समाजमाध्यमांवर शुभेच्छांची उधळण केली. मात्र, दुसरीकडे डॉ. फुके यांनी प्रसार माध्यमांवरून आपणच निधी मंजूर करून घेतल्याचे जाहीर केले.

हेही वाचा… रायगडमध्ये पालकमंत्री उदय सामंत यांच्या विरोधात शिंदे गटातच नाराजी

पटोले यांच्या पाठपुराव्यामुळे घरकूल मंजूर झाले होते, मात्र शासनाने निधी मंजूर न केल्यामुळे कामे रखडली होती. राजकीय इच्छाशक्तीच्या बळावर अखेर पटोले यांनीच हा निधी खेचून आणल्याचे समाजकल्याण सभापती मदन रामटेके यांनी त्यांच्या ‘फेसबुक पेज’वर नमूद केले. सध्या या विषयावरून पटोले आणि फुके समर्थकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. दुसरीकडे, इतर घरकूल योजनांचे प्रस्ताव प्रलंबित असताना एका योजनेसाठी निधी मंजूर झाल्याचा गवगवा करीत श्रेय लाटण्यासाठी हपापलेल्या काँग्रेस-भाजप नेते, समर्थकांबाबत घरकूल लाभार्थी तीव्र नाराजी व्यक्त करीत आहेत.

फुकेंची केविलवाणी धडपड

नाना पटोले विधानसभा अध्यक्ष असतानाच त्यांनी घरकुलाची यादी मंजूर करून घेतली होती. मात्र, निधीअभावी कामे रखडली होती. यानंतर पटोले यांनी मुख्यमंत्र्यांकडे निधी मंजूर करण्यासाठी तगादा लावला. अखेर त्यांच्या पाठपुराव्यामुळेच हा निधी मंजूर झाला. मात्र, भाजपधोरणाप्रमाणे डॉ. परिणय फुके या यशाचे श्रेय लाटण्यासाठी केविलवाणी धडपड करीत आहेत.- मदन रामटेके, समाजकल्याण सभापती, जि. प. भंडारा.

हेही वाचा… मावळमध्ये खासदार बारणे उमेदवारीवर निश्चिंत

इतरांनी श्रेय घेणे योग्य नाही

आमदार डॉ. परिणय फुके यांच्या प्रयत्नानेच यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेअंतर्गत साकोली विधानसभा क्षेत्रातील वैयक्तिक घरकूल लाभार्थ्यांसाठी निधी मंजूर झाला. यासाठी फुकेंनी मागील दोन वर्षांपासून वारंवार पाठपुरावा केला होता. त्याची दखल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली. यामुळे इतरांनी श्रेय घेणे योग्य नाही. – दिवाकर मने, डॉ. परिणय फुकेंचे स्विय सहाय्यक