दिगंबर शिंदे

सांगली : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यात भाजपची मोर्चेबांधणी सुरू असताना पक्षांतर्गत मतभेदाचे दर्शनही होत असून प्रस्थापितांकडून नवनियुक्त पदाधिकारी अडचणीत कसे येतील याचीच तजवीज केली जात आहे. याची दखल घेत पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा प्रभारी सुरेश हळवणकर यांनी पक्षनेत्यांना सत्कार मेळाव्यात कानपिचक्याही दिल्या. मात्र, आपला मतदार संघ म्हणजे आपली जहागिरी अशा कोशात असलेल्यांनी वेगळी भूमिका घेण्याची तयारीही सुरू केली आहे. पक्षाचा विस्तार अथवा पक्षाचा कार्यक्रम तळागाळापर्यंत जाण्यासाठी नवनियुक्त पदाधिकारी अधिक उत्साहाने काम करत असताना प्रस्थापितांची नाराजी पक्षाकडूनच अदखलपात्र ठरवली जात असल्याने भाजपचे काँग्रेसीकरण होत असल्याचे निदर्शनास येत आहे.

Former Shekap district secretary and Meenakshi Patil son Aswad Patil will join BJP print politics news
शेकापचे पाटील कुटुंबीय भाजपच्या वाटेवर
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
akola ZP
वंचितची प्रतिष्ठा पणाला लागणार; अकोला जिल्हा परिषद निवडणुकीचे वेध, राजकीय पतंगबाजी रंगणार
nashik BJP rebels girish mahajan
बंडखोरांचा पुन्हा भाजपमध्ये प्रवेश अवघड
BJP started journey to become superpower with record target of registering 1.5 crore workers
भाजप ‘समृद्धी’ महामार्गाने ‘शत प्रतिशत’कडे
bjp and ajit pawar ncp political conflict over allegations against dhananjay munde
धनंजय मुंडे यांच्या विरोधात भाजपचे सुरेश धस, चित्रा वाघ यांचा बोलविता धनी कोण ?
bjp membership registration campaign target to add 50 lakh new members in maharashtra
भाजप सदस्यनोंदणी ! ‘ हे ‘ आमदार अव्वल तर ‘ हे ‘ पिछाडीवर
Gulabrao Deokar , BJP, Ajit Pawar group, Ajit Pawar ,
गुलाबराव देवकर यांची पाऊले आता भाजपकडे, अजित पवार गटात पक्षप्रवेशास विरोध

भाजपने सांगलीचा काँग्रेसचा गड २०१४च्या लोकसभा निवडणुकीत काबीज करीत असताना काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यातील मतभेदाचा सुयोग्य वापर करून घेतला. त्यात मोदी लाटेमध्ये काँग्रेसची झालेली धुळधान सावरण्यासाठी सक्षम नेतृत्व अद्याप काँग्रेसला गवसलेले नाही. काँग्रेसची अवस्था नेतृत्वहिन झालेल्या संधीचा फायदा घेत सलग दोन वेळा भाजपचे सांगलीची जागा आपल्याकडे ठेवण्यात यश मिळवले. मात्र, हे यश कायम ठेवत असताना प्रस्थापिताविरोधात असलेल्या नाराजीचा फटका बसू नये यासाठी भाजपची सध्या मोर्चेबांधणी सुरू आहे. यातूनच पक्षाची दारे उघडी ठेवून नवे नेतृत्व रूजविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

हेही वाचा… रघुनाथदादा पाटील यांच्यामुळे भारत राष्ट्र समितीची ताकद वाढणार?

सांगली लोकसभा मतदार संघामध्ये सहा विधानसभा मतदार संघ आहेत. यामध्ये सांगली, मिरज हे दोन मतदार संघ भाजपकडे तर तासगाव-कवठेमहांकाळ राष्ट्रवादीकडे आणि पलूस-कडेगाव आणि जत हे काँग्रेसकडे आहेत. तर खानापूर-आटपाडी शिवसेना शिंदे गटाकडे आहेत. महायुतीच्या स्थानिक नेत्यांचे प्रामुख्याने लक्ष आहे ते विधानसभा मतदार संघाकडे. विद्यमान खासदार संजयकाका पाटील हे तिसर्‍यांदा लोकसभेसाठी इ च्छुक आहेत. त्यासाठी त्यांनी तयारीही सुरू केली असून जत, खानापूर, आटपाडी, कवठेमहांकाळ या ठिकाणी आपला गट अधिक ताकदवान करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, त्यांना विट्याचे विद्यमान आमदार अनिल बाबर, जतचे विलासराव जगताप, आटपाडीचे आमदार गोपीचंद पडळकर, कडेगावचे माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांची मदत होईलच याची खात्री पक्षालाच सध्या वाटत नाही. यामुळे नवीन मित्र आणि तेही पक्षाबाहेरील जोडण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

हेही वाचा… गौरव सोहळ्याला उपस्थित राहून शरद पवार मोदींविरोधात सक्रिय

या पार्श्‍वभूमीवर पक्षाने नवीन पदाधिकारी नियुक्त करून नव्याने आयातीचे धोरण स्वीकारले आहे. जतमध्ये माजी आमदार विलासराव जगताप गेली चाळीस वर्षे राजकारणात सक्रिय आहेत. जतचा आमदार कोण हे मीच ठरवू शकतो असा त्यांचा समज मागील विधानसभा निवडणुकीत धुळीला मिळाला. मात्र, ग्रामीण भागात आजही त्यांची ताकद असताना त्यांना विश्‍वासात न घेता जिल्हा परिषदेचे माजी सभापती तमणगोंडा रविपाटील यांना पक्षाने विधानसभा प्रमुख केले. पाटील तरूण असल्याने त्यांनी पक्षाचा मोदी अ‍ॅट नाउनचा कार्यक्रम तळागाळापर्यंत पोहचवत असताना जतचे चार माजी नगरसेवक भाजपमध्ये आणले. पक्षाच्या प्रचारासाठी राज्यात पहिल्यांदा तालुका पातळीवरील वॉररूम सुरू केली. यासाठी प्रशिक्षित तरूणही तैनात केले. पक्षाचा कार्यक्रम राबविण्यात पश्‍चिम महाराष्ट्रात जत तालुका सर्वात आघाडीवर आहे.

हेही वाचा… धर्मातराच्या आरोपांवर नगर जिल्ह्यातील भाजप नेत्यांचे मौन, बाहेरील नेते अधिक सक्रिय

रविपाटील यांचे पक्षाचे कामच आता जगताप यांच्या नाराजीला कारणीभूत ठरले आहे. पक्षातूनही जगताप यांच्या भूमिकेला फारसे महत्व दिले जात नाही. यामुळे त्यांनी आमचा जर विचार केला नाही तर वेगळा विचार करण्याची मानसिकताही त्यांनी केली आहे. यामुळे जत लोकसभेसाठी जतची रणभूमी निवडणुकीपुर्वीच गाजत आहे. पक्षापेक्षा मी मोठा या भूमिकेमुळे जगताप पक्षिय पातळीवर दुर्लक्षित होत आहेत. पक्षातंर्गत मतभेद जाहीर पणे मांडत त्यांनी खासदारांनाही टोकाचा विरोध सुरू केला आहे. जत विस्तारित सिंचन योजनेसाठी पहिल्या टप्प्यात ९५० कोटींची निविदा जाहीर झाली. मात्र, सरकारच्या भूमिकेवरच त्यांनी प्रश्‍न उपस्थित करून पक्षालाच अडचणीत आणण्याचे प्रयत्न केले. याचबरोबर राष्ट्रवादीच्या फुटीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नेतृत्व आश्‍वासक व दिलेला शब्द पाळणारे असल्याचे सांगत पुढचा पर्याय कोणता असू शकतो याचे संकेतही दिले आहेत.

Story img Loader