सांगली : अखेर लोकसभा निवडणुकीच्या मैदानासाठी काँग्रेसच्या निद्रावस्थेतील हत्तीला जाग आणण्याचे प्रयत्न सुरू झाले. शनिवारी झालेल्या बैठकीत पक्ष देईल त्या उमेदवाराचा प्रचार करून काँग्रेसला पुन्हा गतवैभव प्राप्त करून देण्याचा निर्धार आढावा बैठकीत व्यक्त करण्यात आला. वसंतदादा पाटील यांचे नातू विशाल पाटील हेच लोकसभेचे संभाव्य उमेदवार असतील अशी अटकळ बांधून मोर्चेबांधणी सुरू केली असली तरी याच बैठकीत पलूस-कडेगावच्या कार्यकर्त्यांनी जिल्हा बँंकेच्या उपाध्यक्षा जयश्री पाटील यांचे जावई डॉ. जितेश कदम यांच्या उमेदवारीची मागणी पुढे रेटली आहे. यामागे दबावाचे राजकारण आहे की विधानसभा निवडणुकीतील अडसर दूर करण्याचा एक प्रयत्न आहे हे सध्या तरी कळायला मार्ग नाही.

लोकसभा निवडणुकीच्या तयारीला सर्वच राजकीय पक्ष लागले आहेत. भाजपने तर सहा महिन्यांपूर्वीच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या दौर्‍याचे आयोजन करून पुढाकार घेतला आहे. अशा स्थितीत विरोधक कोण असा प्रश्‍न निर्माण झाला असताना सांगलीची जागा कोणाची यावरच काथ्याकूट सुरू असताना अखेर काँग्रेसनेही पक्ष निरीक्षक माजी मंत्री हुसेन दलवाई यांच्या उपस्थितीत पक्षाच्या पदाधिकार्‍यांची बैठक घेऊन हालचाली सुरू केल्या आहेत. या निमित्ताने काँग्रेसच्या बशा बैलाला उठविण्याचे प्रयत्न सुरू झाले हे एक बरे झाले. निदान भाजपला आम्ही रोखू शकतो हा आत्मविश्‍वास मरगळलेल्या काँग्रेसमध्ये निर्माण होण्यास मदत होणार आहे.

मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Bajrang Sonavane Demand
Bajrang Sonavane : “अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रिपद घ्यावं, त्यांना अंधारात कोण काय…”, बजरंग सोनावणेंची मागणी
raining in Akola district during the winter season
अकोला: ऐन हिवाळ्यात पावसाचा तडाखा; वातावरणातील बदलाने…
Two hundred acres of farmland damaged by rangava in Shirala
शिराळ्यात गव्यांकडून दोनशे एकर शेतीचे नुकसान
tiger sighted again in barshi fear continues among villagers
बार्शीत वाघाचे पुन्हा दर्शन; गावकऱ्यांमध्ये दहशत कायम
martyred soldier shubham ghadge cremated news in marathi
सातारा : शहीद शुभम घाडगे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
tiger seen sitting on elephant shocking video viral
भयंकर घटना! वाघाला पकडून हत्तीवर बांधले अन् पुढे केलं असं काही की…, धक्कादायक VIDEO पाहून लोकांचा राग अनावर

हेही वाचा – सर्व लोकसभा व विधानसभा मतदारसंघात भाजपची ‘वॉर रुम’ सुरू होणार

गत निवडणुकीवेळी काँग्रेसची उमेदवारी कोणाच्या गळ्यात मारायची यावर पडद्याआडच्या हालचाली सुरू होत्या. माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतिक पाटील यांनी पक्षाकडे उमेदवारीची मागणीही केली होती की नाही हे स्पष्ट झाले असले तरी अखेरच्या क्षणी वसंतदादांचे नातू विशाल पाटील यांनी दादांच्या समाधीस्थळाचा राजकीय वापर करून पक्षाअंतर्गत विरोधकांना आव्हान देण्याचा प्रयत्न केला. यातच काँग्रेसमधील काही नेत्यांनी विधानसभेसाठी उमेदवारी मागणार्‍या पृथ्वीराज पाटील यांना बळेच घोड्यावर बसविण्याचे प्रयत्न केले. त्यांनी उमेदवारीसाठी तासगाव, आटपाडीचे दौरेही केले. मात्र, अखेरच्या टप्प्यात उसना उमेदवार देत सांगलीची जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदरात टाकण्यात आली. अगदी कमी वेळेत उमेदवारीचा निर्णय झाला होता. तरीही लोकसभेच्या मैदानात चांगली धडक दिली होती. मात्र, वंचित बहुजन आघाडीचे गोपीचंद पडळकर यांच्या उमेदवारीने घात केला आणि भाजपच्या संजयकाका पाटील यांचा विजय सुकर होण्यास मदत झाली.

आता मात्र, लोकसभेसाठी विशाल पाटील यांनी अगोदरपासूनच मानसिकता केली आहे. त्यांची विधानसभा की लोकसभा ही द्बिधा मनस्थिती यावेळी नसेल अशी आशा करण्यासारखी स्थिती आहे. यादृष्टीने पक्षीय पातळीवर त्यांनी तयारी सुरू केली असली तरी मित्र पक्षाचे काय असा प्रश्‍न कायमपणे संभ्रम निर्माण करणारा ठरत आला आहे. आता पक्षाने आपली तयारी सुरू केली असून माजी राज्यमंत्री डॉ. विश्‍वजित कदम यांच्यावर लोकसभेची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीला काँग्रेस एकसंघपणे सामोरे जाणार असल्याचा निर्वाळा कदम देत आहेत.

हेही वाचा – नगर जिल्ह्यातील काँग्रेसच्या विस्कळीत पक्ष संघटनेस एकसंघ करण्याचे आव्हान

लोकसभेसाठी विशाल पाटील यांची उमेदवारी निश्‍चित मानली जात असली तरी यालाही अंतर्विरोध असल्याचे शनिवारच्या बैठकीवेळी दिसून आले. उमेदवारी कोणालाही मिळाली तर काँग्रेसचे कार्यकर्ते मन लावून काम करतील असा विश्‍वास निदान बैठकीत व्यक्त करण्यात आला असला तरी सांगलीत शक्तीशाली असलेल्या स्व. मदन पाटील यांच्या गटाकडून जितेश कदम यांच्या उमेदवारीची मागणी पुढे करण्यात आली. यासाठी पलूस – कडेगावमधील कार्यकर्त्यांचा आग्रह असल्याचे दिसून आले.

जितेश कदम हे विश्‍वजित कदम यांच्या चुलत बंधूचे पूत्र तर माजी आमदार मोहनराव कदम यांचे नातू आहेत. यामुळे उमेदवारीची मागणी दुर्लक्ष करण्यासारखी निश्‍चितच नसावी. जितेश कदम यांनी या मागणीला ठाम विरोध दर्शवला आहे. तरीही दादा घराण्यातील मतभेदाला चूड लावण्याचा प्रयत्न या मागणीमागे आहे का अशी शंका उपस्थित केली जात आहे. पक्षीय पातळीवर या मागणीचा विचार होतो, का हा दबाव तंत्राचा भाग आहे हेही नजीकच्या काळात दिसेलच, पण यामागे विधानसभा उमेदवारीतील एक अडसर दूर करण्याचा प्रयत्न तर नाही ना अशी शंका उपस्थित केली जात आहे.

Story img Loader