सुजित तांबडे
पुणे : घराणेशाहीला थारा नसल्याची वल्गना करणाऱ्या भाजपला पुण्यात मात्र घराणेशाहीची लागण लागल्याचे स्पष्ट झाले आहे. भाजपने पुणे शहराची कार्यकारिणी जाहीर केली असून, त्यामध्ये घराणेशाहीचा पगडा असल्याचे दिसून आले आहे. दिवंगत खासदार गिरीश बापट यांची स्नुषा स्वरदा आणि पर्वतीच्या आमदार माधुरी मिसाळ यांचे पुत्र करण यांना स्थान देण्याबरोबरच नव्या चेहऱ्यांऐवजी मागील महापालिका निवडणुकांमध्ये भाजपमध्ये आलेल्यांना संधी मिळाल्याने मूळचे भाजपचे एकनिष्ठ विरूद्ध अन्य पक्षांतून आलेले भाजपनिवासी यांच्यात सुप्त संघर्ष सुरू झाला आहे.

पुणे महापालिकेचे माजी सभागृहनेते धीरज घाटे यांची शहराध्यक्ष पदावर वर्णी लागल्यावर त्यांनी नवीन कार्यकारिणी जाहीर केली आहे. आगामी पुणे महापालिकेच्या निवडणुका विचारात घेता या कार्यकारिणीला महत्त्व प्राप्त झाले आहे. या कार्यकारिणीवर पालकमंत्री चंद्रकांत पाटील समर्थकांचे प्राबल्य आहे. मात्र, कार्यकारिणी तयार करताना भाजपच्या एकनिष्ठ पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना संधी देण्याऐवजी गेल्या महापालिका निवडणुकीत अन्य पक्षांतून भाजपमध्ये आलेल्यांना संधी देण्यात आल्याने मूळनिवासी भाजपच्या पदाधिकाऱ्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.

kalyan municipalitys Rukminibai Hospital show that three people were bitten by stray dog
कल्याणमधील भटक्या श्वानाचे तीन जणांना चावे, भटक्या श्वानांच्या उपद्रवाने नागरिक, शाळकरी विद्यार्थी त्रस्त
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Two hundred acres of farmland damaged by rangava in Shirala
शिराळ्यात गव्यांकडून दोनशे एकर शेतीचे नुकसान
criem news
विशाल गवळीने घरातच मुलीवर अत्याचार करून केली तिची हत्या , पत्नीच्या साह्याने मृतदेहाची विल्हेवाट
Manikrao Kokate On Chhagan Bhujbal
Manikrao Kokate : “ओबीसी म्हणून त्यांना फक्त मुलगा अन् पुतण्या दिसतो”, राष्ट्रवादीच्याच नेत्याची भुजबळांवर खोचक टीका
Conflict in Mahayuti over post of Guardian Minister of Raigad aditi tatkare bharat gogawale
रायगडच्या पालकमंत्री पदावरून महायुतीत संघर्ष
Allu Arjun House Attack
Allu Arjun House Attack : अल्लू अर्जुनच्या घरावर हल्ला, घरात घुसून तोडफोड; आठ जण ताब्यात
Loksatta lalkilla BJP Congress video viral Rahul Gandhi Amit Shah
लालकिल्ला : शहांची कोंडी आणि भाजप सैरावैरा!

हेही वाचा… राज्यात मैत्री अन् अकोला जिल्ह्यात कुरघोडी

उपाध्यक्ष पद दिलेले हरिदास चरवड हे मूळचे काँग्रेसचे आहेत. मागील निवडणुकीत ते भाजपच्या तिकीटावर नगरसेवक झाले. माजी नगरसेवक शाम देशपांडे हे शिवसेनेमध्ये होते. त्यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर त्यांची या पदावर वर्णी लागली आहे. रुपाली धावडे यांचे पती दिनेश धावडे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक आहेत. चिटणीसपदी नेमणूक झालेले किरण बारटक्के हे काँग्रेसचे माजी नगरसेवक आहेत. उमेश गायकवाड, अनिल टिंगरे आणि आनंद रिठे हे मूळचे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक आहेत. गेल्या निवडणुकीत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. भाजपबाहेरून आलेल्यांना प्रमुख पदे मिळाल्याने निष्ठावंतांमध्ये धुसफूस सुरू झाली आहे.

हेही वाचा… कळवा-मुंब्य्रात गणेशोत्सवात मंडळांची ‘दिवाळी’

निष्ठावंतांना डावलण्याबराेबरच कार्यकारिणीमध्ये घराणेशाहीला स्थान देण्यात आल्याने भाजपचा बेगडीपणा उघड झाला आहे. पर्वतीच्या आमदार माधुरी मिसाळ यांचा पुत्र करण मिसाळ यांना युवा मोर्चाचे अध्यक्षपद देण्यात आले आहे. उपाध्यक्षपदी दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्या स्नुषा स्वरदा बापट यांना संधी देण्यातआली आहे. सरचिटणीस आणि भाजप महिला आघाडी शहर प्रमुखपदी नेमणूक केलेल्या वर्षा तापकीर या भाजपचे खडकवासला विधानसभा मतदार संघाचे आमदार भीमराव तापकीर यांच्या कुटुंबातील आहेत. आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निष्ठावंतांमधील नाराजी दूर करण्याचे आव्हान भाजपपुढे उभे राहिले आहे.

Story img Loader