मुंबई : आमदारांची अधिवेशनातील उपस्थिती, मांडलेल्या समस्या, विचारलेले प्रश्न या आधारे केलेल्या मुंबईतील मूल्यमापनात महाविकास आघाडीचे आमदार अव्वल ठरले आहेत, तर शेवटच्या तीन क्रमांकावर महायुतीचे आमदार आहेत. प्रजा फाऊंडेशन या स्वयंसेवी संस्थेने मुंबईतील आमदारांच्या विधिमंडळातील कामगिरीचे मूल्यमापन करणारे प्रगतिपुस्तक जाहीर केले आहे.
दक्षिण मुंबईतील काँग्रेसचे आमदार अमीन पटेल हे सलग तिसऱ्या वर्षी पहिल्या क्रमांकावर आहेत. पक्षांच्या कामगिरीमध्ये काँग्रेस पक्षाची कामगिरी सर्वोत्तम असल्याचाही शेरा यात देण्यात आला आहे. तसेच १४व्या विधानसभा सत्रातील आमदारांची कामगिरी गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत खालावलेली असल्याचेही या अहवालात म्हटले आहे.
हेही वाचा : महिलांपाठोपाठ शेतकऱ्यांना खूश करण्याचा प्रयत्न, सव्वा कोटी लाभार्थींना महासन्मान योजनेचा चौथा हप्ता
प्रजा फाऊंडेशन या स्वयंसेवी संस्थेने यंदाही मुंबईतील आमदारांच्या कामगिरीचे प्रगतिपुस्तक तयार केले आहे. त्यामध्ये अर्थसंकल्पीय सत्र २०२३ ते अर्थसंकल्पीय सत्र २०२४ या वर्षभराच्या कालावधीतील आमदारांच्या कामगिरीचे मूल्यमापन केले आहे. मंत्री आणि विधानसभा अध्यक्ष यांना वगळून हे प्रगतिपुस्तक तयार करण्यात आले आहे. राष्ट्रवादीचे नवाब मलिक हे तुरुंगात होते त्यामुळे त्यांची उपस्थिती आणि त्यांनी विचारलेले प्रश्न यांना शून्य गुण देण्यात आले आहेत. मात्र मलिक यांनी राजीनामा दिला नव्हता व ते तुरुंगातूनही प्रश्न उपस्थित करू शकले असते, त्यामुळे त्यांना या प्रगतिपुस्तकातून वगळलेले नसल्याचेही म्हटले आहे.
कामकाजाचे दिवस घटले
तेराव्या विधानसभा सत्रापेक्षा चालू सत्रातील कामगिरी खालावलेली आहे. कामकाजाचे दिवस घटले आहेत. २०१९ ते २०२४ या कालावधीत १४ व्या विधानसभेचे कामकाज ११९ दिवस चालले.
हेही वाचा : “मोदीशहांच्या हाती महाराष्ट्र देऊ नका!”, मल्लिकार्जुन खरगे यांचे आवाहन
बाराव्या विधानसभेचे कामकाज २१० दिवस चालले होते. करोनामुळे विधानसभेचे अधिवेशन होऊ शकले नाही हे खरे असले तरी तंत्रज्ञानाच्या साहाय्याने दृकश्राव्य माध्यमातून हे अधिवेशन, कामकाज करणे शक्य होते असे मत प्रजा फाऊंडेशनचे साहाय्यक व्यवस्थापक एकनाथ पवार यांनी मांडले.
अमीन पटेल, सुनील प्रभू यांना अव्वल गुण
वर्षभराच्या कामगिरीमध्ये दक्षिण मुंबईतील काँग्रेसचे आमदार अमीन पटेल, शिवसेना ठाकरे गटाचे सुनील प्रभू आणि काँग्रेसच्या वर्षा गायकवाड या तीन आमदारांना अव्वल गुण देण्यात आले आहेत. या तीन आमदारांनी सभागृहामध्ये नागरिकांच्या समस्यांवर आधारित प्रश्न विचारले आहेत आणि त्यांची सर्वाधिक उपस्थिती होती, असे या प्रगतिपुस्तकात म्हटले आहे.
भाजप पीछाडीवर
आमदारांच्या कामगिरीवरून त्यांच्या संबंधित राजकीय पक्षांच्या कामगिरीचा विचार करण्यात आला आहे. त्यानुसार काँग्रेसने सर्वाधिक ७२ टक्के गुण मिळवून पहिले स्थान पटकावले आहे. तर भारतीय जनता पक्षाला ६० टक्के देण्यात आले असून दुसऱ्या क्रमांकावर स्थान देण्यात आले आहे.
राम कदम, दिलीप लांडे शेवटच्या क्रमांकावर
या प्रगतिपुस्तकात शेवटच्या पाच क्रमांकांवर महायुतीतील भाजप आणि शिवसेना शिंदे गट या दोन पक्षाचे आमदार असल्याचे म्हटले आहे. शेवटच्या क्रमांकावर भाजपचे घाटकोपरमधील आमदार राम कदम असून त्याखालोखाल शिवसेना शिंदे गटाचे चांदिवलीतील आमदार दिलीप लांडे, मागाठाणे येथील आमदार प्रकाश सुर्वे, माहीम मधील आमदार सदा सरवणकर यांचा समावेश आहे.
आमदारांची अधिवेशनातील उपस्थिती, मांडलेल्या समस्या, विचारलेले प्रश्न या आधारे केलेल्या मुंबईतील मूल्यमापनात महाविकास आघाडीचे आमदार अव्वल ठरले आहेत, तर शेवटच्या तीन क्रमांकावर महायुतीचे आमदार आहेत. प्रजा फाऊंडेशन या स्वयंसेवी संस्थेने मुंबईतील आमदारांच्या विधिमंडळातील कामगिरीचे मूल्यमापन करणारे प्रगतिपुस्तक जाहीर केले आहे.