छत्रपती संभाजीनगर : तिरंगी लढतीमध्ये हिंदू मताचे विभाजन व्हावे आणि दलित व मुस्लिम मतांचे ध्रुवीकरण व्हावे, या औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील राजकारणात निर्णायक भूमिका घेऊ शकणाऱ्या वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या सभेला मुस्लिम मतदारांची गर्दी कमी दिसून आली. ‘युती धर्म पाळता येत नसेल तर युती करू नका,’ या शब्दात प्रकाश आंबेडकर यांनी ‘एमआयएम’ ला फटकारले. आता मत देताना चूक केली तर मुस्लिम सर्वसमावेश व्हायला तयार नाहीत, असा संदेश जाईल. शिवाय माणूस कितीही चूक असेल धर्म म्हणून आम्ही त्याच्याच पाठिशी उभे राहणार असा संदेश जात राहील. मुस्लिमांना सर्वसमावेशकता मंजूर नाही, हेही स्पष्ट होईल. त्यामुळे या वेळी मतदान करताना चूक करू नका, असे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी मुस्लिमांना केले. शिवसेना, काँग्रेस हे दोन्ही पक्ष धर्मनिरपेक्ष नाहीत, हेही सांगायला ते विसरले नाहीत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा