भाजपाने २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील उत्तर मध्य मुंबई मतदारसंघातून उज्ज्वल देवराव निकम यांना उमेदवारी दिली आहे. उज्ज्वल देवराव निकम हे २६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याप्रकरणी विशेष सरकारी वकील होते. उत्तर मध्य मुंबई मतदारसंघातून भाजपाच्या पूनम महाजन या विद्यमान खासदार आहेत. त्या दोन वेळा खासदार राहिल्या आहेत. खरं तर पूनम महाजन या भाजपाचे ज्येष्ठ नेते दिवंगत प्रमोद महाजन यांच्या कन्या आहेत. विशेष म्हणजे उज्ज्वल निकम यांनी हाताळलेल्या असंख्य प्रकरणांपैकी एक म्हणजे भाजपा नेते प्रमोद महाजन यांच्या हत्येचे प्रकरण होते. प्रसिद्धीमाध्यमांचे लक्ष वेधून घेतलेल्या अनेक ठळक प्रकरणांत निकम यांनी सरकारी वकील म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली आहे. पाकिस्तानी दहशतवादी अजमल कसाब विरुद्धच्या खटल्यातही त्यांची भूमिका निर्णायक होती. २६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याच्या खटल्यातील विशेष सरकारी वकील म्हणून ते ओळखले जातात. निकम यांनी अनेक वर्षांपासून महाराष्ट्रातील महत्त्वाच्या प्रकरणांची गुंतागुंत सोडवण्यात मदत केली आहे. २०११ चा तिहेरी बॉम्बस्फोट, शक्ती मिल सामूहिक बलात्कार प्रकरण, कोपर्डी बलात्कार आणि खून प्रकरणांसह अनेक प्रकरणांमध्ये त्यांची नियुक्ती करण्यात आली होती.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा