दूरदर्शन आणि ऑल इंडिया रेडिओला बातम्यांचा मजकूर पुरविण्यासाठी दिल्लीस्थित हिंदुस्थान समाचर या वृत्तसंस्थेची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रसार भारतीने या वृत्तसंस्थेशी दोन वर्षांचा करार केल्यानंतर विरोधी पक्षांनी यावर कडाडून टीका केली आहे. प्रसार भारतीने प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया या वृत्तसंस्थेसोबतचा आपला करार २०२० मध्ये रद्द केला आहे. हिंदुस्थान समाचार या वृत्तसंस्थेची स्थापना विश्व हिंदू परिषदेचे संस्थापकांपैकी एक आणि पहिले सरचिटणीस शिवराम शंकर आपटे यांनी केली होती. हिंदुस्थान समाचार ही संस्था उजव्या विचारसरणीच्या लोकांच्या ताब्यात असून प्रसार भारतीच्या या निर्णयावर विरोधकांकडून टीका करण्यात येत आहे.

केरळचे मुख्यमंत्री पिनरई विजयन यांनी या निर्णयावर टीका केली. ते म्हणाले, “बातम्यांचे भगवीकरण आणि मतमतांतरे दाबून टाकण्यासाठी सदर निर्णय घेण्यात आलेला दिसतो. धर्मनिरपेक्ष आणि लोकशाही शक्तींनी एकत्रित येऊन अशा सांप्रदायिक योजनांचा प्रतिकार करण्याची गरज आहे.” तर तृणमूल काँग्रेसचे राज्यसभा खासदार जव्हार सरकार म्हणाले की, शेवटी प्रसार भारती आणि भाजपाचे विलीनीकरण झालेच. जव्हार सरकार यांनी युपीए दोनच्या २०१२ ते २०१६ या काळात प्रसार भारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहिले होते.

amitabh bachchan
विकी कौशलच्या वडिलांनी सांगितली अमिताभ बच्चन यांची आठवण; म्हणाले, “चिखलाने माखलेल्या अवस्थेत…”
BJP Devendra Fadnavis Assets Net Worth Updates in Marathi
Devendra Fadnavis Income : उपमुख्यमंत्र्यांची एकूण संपत्ती किती?…
What Sarangi Mahajan Said?
Sarangi Mahajan : “प्रवीण महाजन यांना गोपीनाथ मुंडेंनी पिस्तुल घेऊन दिलं होतं, पूनमला..”, सारंगी महाजन यांचा दावा
Sharad Pawar
Sharad Pawar : मविआचा मुख्यमंत्रिपदाबाबत काय निर्णय झालाय? शरद पवार सस्पेन्स मिटवत म्हणाले…
sharad pawar reaction on bjp batenge to katenge slogan
भाजपाच्या ‘बटेंगे तो कटेंगे’ घोषणेवरून शरद पवारांचा हल्लाबोल; म्हणाले, “सत्ताधाऱ्यांची मानसिकता…”
loksatta readers feedback
लोकमानस: धोरणांचा प्रचार झालाच नाही
mukkampost bombilwadi mazi ladki janta yojna
मुक्कामपोस्ट बोंबिलवाडीची ‘लाडकी जनता योजना!’, पोस्ट होतेय व्हायरल, काय आहे ही योजना? वाचा…
Amit shah on Sharad pawar and Devendra Fadnavis
Amit Shah: “आपल्याला देवेंद्र फडणवीसांना पुन्हा…”, अमित शाहांचे शिराळ्याच्या सभेत मोठे विधान; राजकीय चर्चांना उधाण

आपण उत्तर कोरियात राहतोय का?

सीपीआय (एम)चे नेते सीतारम येचुरी यांनी ट्विट करत म्हटले की, दूरदर्शन आणि आकाशवाणी हे आता राष्ट्रीय स्वयंसवेक संघाने दिलेला मजकूर बातम्या म्हणून प्रसारीत करेल. प्रसार भारतीला स्वायत्तता देण्याऐवजी भारत सरकारने त्यांना संघाच्या टाचेखाली आणण्याचा निर्णय घेतला असल्याचे सीपीआय (एम)च्या केंद्रीय समितीचे सदस्य थॉमस आयझॅक यांनी सांगितले. आम्ही कुठे राहतो? भारतात की उत्तर कोरियात? अशा सवाल उपस्थित करुन तेलंगणा युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव रामशेट्टी विष्णू यांनी या निर्णयावर टीका केली.

तर प्रसार भारतीचे सीईओ गौरव द्विवेदी यांनी द इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितले की, आम्ही फक्त कराराचे नूतनीकरण केले आहे. इतर वृत्तसंस्था या केवळ हिंदी आणि इंग्रजी भाषेत बातम्यांचा मजकूर देतात. तर हिंदुस्थान समाचार ही वृत्तसंस्था सर्वच भारतीय बाषांमध्ये बातम्यांचा मजकूर देते.

करार काय आहे?

इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या माहितीनुसार, प्रसार भारतीने हिंदुस्थान समाचार सोबत साडे पंचवीस महिन्यांचा करार केला आहे. जो १४ फेब्रुवारी २०२३ ते मार्च २०२५ पर्यंत वैध आहे. हिंदुस्थान समाचार १२ भाषांमध्ये बातम्यांचा मजकूर पुरविणार आहे. रोज १२ राष्ट्रीय पातळीवरील बातम्या आणि ४० स्थानिक बातम्या भारतीय भाषांमध्ये पुरविण्यात येणार आहेत. या करारानुसार हिंदुस्थान समाचारला एकूण ७.७० कोटी रुपये मिळणार असून प्रति महिना ही रक्कम ३०.१७ लाख एवढी होते.

हिंदुस्थान समाचार सध्या कोण चालवतं?

हिंदुस्थान समाचारच्या संकेतस्थळावरील माहितीनुसार या संस्थेचे मुख्यालय दिल्लीस्थित आहे. हिंदुस्थानचे एकूण २२ ब्युरो आणि ६०० प्रतिनिधी देशभर विखुरलेले आहेत. समूह संपादक म्हणून राम बहादुर राय काम पाहत आहेत. राय यांनी काही वर्ष जनसत्ता या दैनिकात काम केलेले आहे. सध्या ते इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्र (IGNCA) चे अध्यक्ष आहेत. ही संस्था केंद्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाकडून चालविली जाते.