Bihar Politics : गेल्या काही दिवसांपासून बिहारच्या राजकारणात जनसुराज पक्षाचे संस्थापक प्रशांत किशोर हे चांगलेच चर्चेत आहेत. प्रशांत किशोर यांनी विविध मुद्यांवरून बिहार सरकारला घेरलं आहे. बिहार पब्लिक कमिशनची(बीपीएससी) पूर्व परीक्षा पुन्हा घेतली जावी, या मागणीसाठी प्रशांत किशोर यांनी आक्रमक भूमिका घेत २ जानेवारीपासून गांधी मैदानात आमरण उपोषण सुरु केलं होतं. मात्र, पोलिसांनी त्यांच्यावर अटकेची कारवाई केली. त्यांचं आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, या घडामोडींवरून बिहारमध्ये राजकारण चांगलंच तापलं आहे.
बिहार पब्लिक सर्व्हिस कमिशन (BPSC) मधील कथित अनियमिततेच्या विरोधात करण्यात येणारे निदर्शने चर्चेत आहेत. दुसरीकडे मात्र मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील सरकार याबाबत उदासीन असल्याचं बोललं जात आहे. तसेच प्रशांत किशोर यांच्या नेतृत्वात करण्यात येणारे आंदोलन आणि मोर्चा हा केवळ दिखाऊपणा असल्याचा आरोप सरकारमधील काही नेत्यांकडून केला जात आहे. आता बिहारच्या विधानसभेच्या निवडणुका काही महिन्यांनी होणार आहेत. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर अशा प्रकारचे मोर्चे काढले निघतात. ऐन निवडणुकीच्या तोंडावर अशा प्रकारे आवाज उठवला जातो. मात्र, पेपर लीक झाल्याचा कोणताही पुरावा नाही. त्यामुळे या आंदोलनाचा कोणताही असर सरकारवर होणार नाही, असं भाजपामधील काही सूत्रांचं म्हणणं आहे.
यासंदर्भात जेडीच्या (यू) एका वरिष्ठ नेत्याने परीक्षाबद्दल कोचिंग सेंटर्सना जबाबदार धरलं. कारण यामुळे त्यांच्यासाठी अधिक पैसे कमवण्याचा मार्ग खुला झाल्याचं म्हटलं. बीपीएससी परीक्षा पारदर्शक झाली, यावर भर देत जेडीच्या (यू) नेत्याने म्हटलं की, परीक्षा रद्द केल्याने उमेदवारांवर अधिक ताण येईल. पण आता विधानसभा निवडणुका तोंडावर आल्यामुळे अशा प्रकारचा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, हे प्रकरण शांत होईल.
प्रशांत किशोर यांनी बिहार पब्लिक सर्व्हिस कमिशनच्या मुद्यांवरून राजकारण केल्याचा आरोप सत्ताधारी नेत्यांकडून केला जात आहे. दरम्यान, उपविभागीय दंडाधिकारी आणि पोलीस उपअधीक्षकांच्या पदांसह राज्य सेवांमधील पदे भरण्यासाठी जेव्हा पटना येथील आयोगाच्या कार्यालयाबाहेर असंख्य विद्यार्थी स्कोअरिंगवर लेखी आश्वासनाची मागणी करत जमले होते. तसेच जिल्हा दंडाधिकारी चंद्रशेखर सिंग यांनी आंदोलक विद्यार्थ्याला थप्पड मारल्याचा आरोप झाल्यानंतर निदर्शने वाढली होती. परीक्षा सुरू झाल्यापासून आणि पटनाच्या एका केंद्रावर विसंगती असल्याच्या बातम्या आल्यापासून जेथे परीक्षा सुरू होण्यास विलंब झाला होता. विद्यार्थ्यांचा एक मोठा वर्ग बीएसपीसी परीक्षा रद्द करून पुन्हा घेण्याच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरला होता.
दरम्यान, या सर्व मुद्यांच्या पार्श्वभूमीवर भाजपाच्या एका नेत्याने जनसुराज पक्षाचे संस्थापक प्रशांत किशोर यांच्यावर टीका करत विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी एकाद्या मुद्द्याचं राजकारण करण्याचा हा हताश प्रयत्न असल्याचं म्हटलं होतं. विशेषत: जेएसपीने अलीकडील पोटनिवडणुकीत पहिल्या निवडणूक लढतीत चारपैकी एकही जागा जिंकली नाही. तसेच एनडीएने पोटनिवडणूक सहज जिंकली. त्यामुळे प्रशांत किशोर हे एखादा मुद्दा बनवत आहेत. जर तुम्ही निरीक्षण केलं तर प्रमुख विरोधी पक्ष आरजेडी देखील हा मुद्दा उपस्थित करत नाही, असं भाजपाच्या नेत्याने म्हटलं.
दरम्यान, आरजेडी पक्षाने प्रशांत किशोर यांच्या निदर्शनातील त्यांच्या भूमिकेला प्रशासन आणि प्रशांत किशोर यांच्यातील सहयोगी कृती असल्याचं म्हटलं होतं. बिहार सरकारमधील एका सूत्राने सांगितलं की, आरजेडीने निषेधाचे समर्थन करताना प्रशांत किशोर या मुद्द्यावर पुढाकार घेत असल्यामुळे आरजेडी अंतर राखून आहे. ज्या आंदोलनात प्रशांत किशोर स्वत:चा चेहरा समोर आणत आहेत, त्या आंदोलनात आरजेडी पक्ष का सहभागी होईल? असा सवाल उपस्थित केला.