लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने बुधवारी उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. या यादीत एकूण ७२ उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. यामध्ये कर्नाटकातील लोकसभेच्या २८ पैकी २० जागांसाठी उमेदवारांची नावेही जाहीर करण्यात आली आहेत. पक्षाने राजघराण्याचे वंशज यदुवीर कृष्णदत्त चामराजा वाडियार यांना म्हैसूरमधून आणि माजी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना हावेरीमधून उमेदवारी दिली आहे. प्रताप सिम्हाच्या जागी म्हैसूरमधून कृष्णदत्त चामराज वाडियार यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

२०१४ आणि २०१९ मध्ये म्हैसूर-कोडागू मतदारसंघात विजयी झालेल्या सिम्हा यांना वगळण्याची कारणे अद्याप देण्यात आलेली नाहीत. डिसेंबर २०२३ मध्ये काही निदर्शकांनी अभ्यागतांच्या गॅलरीत प्रवेश करण्यासाठी सिम्हांनी दिलेल्या पासेसचा वापर केला होता, त्यामुळे संसदेच्या सुरक्षेच्या भंग झाला होता. तेच प्रकरण त्यांना भोवल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

Buldhana ST, ST benefits , maharashtra Assembly elections ,
बुलढाणा : निवडणुकीमुळे एसटी महामंडळाचेही चांगभलं, तब्बल पाऊण कोटीचा…
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
अमरावती : शेअर बाजारात नफ्याचे आमिष; तब्बल २१.९२ लाखांची…
Ex PM Manmohan Singh Admitted To AIIMS In Delhi
Ex PM Manmohan Singh: माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांची प्रकृती बिघडली, AIIMS रुग्णालयात दाखल
Eknath shinde and ajit pawar (1)
NDA च्या बैठकीला अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रतिनिधी गैरहजर; एकनाथ शिंदे म्हणाले, “स्वार्थ भावनेने…”
Pratap Sarnaik and vinod kambli
Vinod Kambli : “तुझा लिव्हर एकदम फ्रेश, बायकोशी किती भांडतोस”, सरनाईक यांचा विनोद कांबळीबरोबरचा मिश्किल संवाद व्हायरल!
Image Of India Alliance Leaders.
AAP vs Congress : “तर काँग्रेसला इंडिया आघाडीतून बाहेर काढायला लावू”; काँग्रेसला भाजपाकडून निधी, आपचे गंभीर आरोप
Underground sewage Scheme , Sulabha Khodke ,
अमरावती : आजी-माजी आमदारांमध्ये जुंपली… ‘हे’ आहे कारण

मंगळवारी पत्रकारांशी संवाद साधताना सिम्हा यांनी वाडियार येथे कृष्णदत्त चामराज यांच्यावरही टीका केली. म्हैसूरच्या राजघराण्यातील राजाला आता वातानुकूलित खोलीत राहण्याऐवजी सामान्य नागरिकांबरोबर (त्यांचे प्रतिनिधी म्हणून) राहण्याची इच्छा आहे, याचा अभिमान वाटतो, असा टोलाही त्यांनी लगावला. त्यांनी म्हैसूरच्या राजघराण्यातील जमिनीच्या वादाचाही दाखला दिला. म्हैसूरच्या राजघराण्यातील मातृसत्ता प्रमोदा देवी वाडियार यांचे दत्तक मूल असलेले वाडियार खासदार झाले तर त्यांना वादग्रस्त जमीन लोकांना द्यावी लागेल, असंही ते म्हणाले.

मंगळुरूचे खासदार आणि भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष नलिन कुमार कटील यांचेसुद्धा तिकीट कापले असून, त्यांच्या जागी ब्रिजेश चौटा यांना उमेदवारी दिली आहे. नलिन कुमार यांनी २०१९ पासून तीनदा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. मे २०२३ मध्ये झालेल्या राज्य निवडणुकीतील पराभवानंतर कटील यांच्या जागी बी. वाय. विजयेंद्र यांची राज्य भाजपा प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली. राज्यातील भाजपाचा मूळ पाया असलेल्या लिंगायतांना पुनरुज्जीवित करण्यासाठी विजयेंद्र यांचे उदात्तीकरण करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

हेही वाचाः चंद्रपूर काँग्रेसमध्ये वडेट्टीवार विरुद्ध धानोरकर वाद शिगेला

“पक्षाने जो निर्णय घेतलाय, तो आम्ही पाळू. नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान बनवणे आणि भाजपाला विजय मिळवून देणे हे आमचे मुख्य लक्ष्य आहे, असे कटील यांनी पत्रकारांना सांगितले. बंगळुरू उत्तरचे खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री डीव्ही सदानंद गौडा या जागेवरून चार वेळा खासदार राहिलेत. परंतु त्यांनासुद्धा तिकीट नाकारण्यात आले आहे. २०२१ च्या व्हायरल व्हिडीओमुळे गौडांना फटका बसला आहे. त्या व्हिडीओत कथितपणे गौडा असलेली एक व्यक्ती अज्ञात महिलेशी बोलत आहे. गौडा यांनी त्यावेळी सायबर क्राइम पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. त्यांच्या विरोधकांकडून सोशल मीडियावर बनावट अन् अश्लील व्हिडीओ व्हायरल केला जात असल्याचा त्यांनी आरोप केला होता.

गौडा यांनी ऑगस्ट २०११ ते जुलै २०१२ दरम्यान ११ महिने कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले आणि यापूर्वी त्यांनी केंद्र सरकारमध्ये रेल्वे, रसायने आणि खते, कायदा आणि न्याय, सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी यासह अनेक खाती सांभाळली आहेत. नोव्हेंबर २०२३ मध्ये त्यांनी निवृत्तीची घोषणा केली होती.

Story img Loader