अयोध्येत शतकांच्या तपस्येनंतर राम मंदिर उभारले जात आहे. राम जन्मभूमीचा संघर्ष हा केवळ धार्मिक संघर्ष नव्हता, तर त्याला प्रारंभापासून राजकीय बाजू होती. देशाला काबिज करणाऱ्या इंग्रजांनासुद्धा या विषयाचे महत्त्व चांगलेच ठाऊक होते.

१८५५ मध्ये मुहम्मदांनी हनुमान गढीचा ताबा आणि मुस्लिमांनी जन्मस्थानाचा ताबा घेतला. ८ फेब्रुवारी १८५५ रोजी अवध फ्रंटियर पोलिसांचे मेजर जनरल जी. बी. आउटराम यांनी अवधचे नवाब वाजिद अली शाह यांना पत्र लिहिले की, अयोध्येत हिंदू-मुस्लिम संघर्ष होण्याची दाट शक्यता आहे. त्यांची भीती पाच महिन्यांनंतर खरी ठरली. २८ जुलै रोजी झालेल्या रक्तरंजित संघर्षात मुस्लिम समुदायातील ७५ सदस्यांचा मृत्यू झाला.

syria civil war marathi news
सीरियातील अचानक सत्ताबदलाने कुणाला काय मिळणार? रशिया-इराणचे नुकसान कसे? तुर्कीये-इस्रायलचा फायदा कसा?
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
shivsena ubt adv harshal Pradhan
महाराष्ट्र पुढे जाणार तरी कसा?
sarva jat dharm ekta manch
बांगलादेशातील हिंदू विरुद्ध अत्याचार मोदी सरकारने रोखावेत, सर्व जाती-धर्म एकता मंचची मागणी
Aaditya Thackeray
Aaditya Thackeray : महाराष्ट्र कर्नाटक सीमाभागाबाबत आदित्य ठाकरेंची मोठी मागणी; म्हणाले, “सर्व विवादित भाग…”
Maharashtra Assembly Elections 2024 Narendra Modi BJP MVA
‘गुजरात मॉडेल’चा महाराष्ट्रात पायरव…
book review kashmir under 370 a personal history by j and ks former director general of police
बुकमार्क : काश्मीरचे भूतभविष्य…
article about mpsc exam preparation guidance mpsc exam preparation tips in marathi
MPSC मंत्र : महाराष्ट्र विधानसभा : चालू घडामोडी सराव प्रश्न

त्यांचे अलीकडील पुस्तक ‘ट्रिस्ट विथ अयोध्या’मध्ये, पत्रकार-भाजप नेते आणि माजी राज्यसभा खासदार बलबीर पुंज यांनी आउटराम यांच्या पत्राचा हवाला दिला आहे: “शाह गुलाम हुसेन याने फैजाबादच्या कोटुआहैन परिसरात मुस्लिमांची मोठी फौज एकत्र केली आहे. शांततेचा भंग आणि हिंदूंची वस्ती असलेल्या हनुमान गढीचा नाश करण्याचा त्याने निर्धार केला आहे. त्याचा सहायक मौलवी साहिब त्याच्यापेक्षा अधिक क्रूर आणि हिंसेसाठी तयार आहे. त्यामुळे हनुमान गढी (मंदिर) येथे आपल्या जीवाचे रक्षण करण्यासाठी उपस्थित असलेल्या भक्तांना शस्त्र देण्यात आले आहे. येथील रहिवासी यामुळे अत्यंत चिंतेत आहेत. गुलाम हुसेन आणि त्याच्या सहकाऱ्यांना तात्काळ अटकाव करण्यासाठी वेगाने प्रयत्न करावे आणि अत्यंत तातडीने आदेशांसह संदेशवाहक पाठवण्याची विनंती करतो.”

नोव्हेंबर २०१९ च्या निकालात ‘अयोध्या टायटल सूट’ हिंदूंच्या बाजूने मंजूर करण्यात आला. सर्वोच्च न्यायालयानेदेखील निकालात या संघर्षाचा संदर्भ दिला. “जन्मस्थान हनुमान गढीपासून काही अंतरावर आहे. १८५५ मध्ये मुहम्मदांनी हनुमान गढीचा ताबा आणि मुस्लिमांनी जन्मस्थानाचा ताबा घेतला. त्याप्रसंगी मुहम्मदांनी हनुमान गढीच्या पायऱ्या चढायचा प्रयत्न केला. पण, त्यांना संपूर्ण ताकदीने मागे खेचण्यात आले. हिंदूंनी आपला प्रयत्न सुरू ठेवला आणि तिसऱ्या प्रयत्नात जन्मस्थान परत मिळवले. या गेटवर ७५ मुहम्मदांना शहीदांच्या कबरीत (गंज-ए-शहीद) येथे दफन करण्यात आले आहे. हा संघर्ष किंग्ज रेजिमेंटचे बरेच लोक पाहत होते. परंतु, त्यांना यात हस्तक्षेप न करण्याचा आदेश होता. ”

निकालात पुढे म्हटले आहे : “असे म्हटले जाते की, तोपर्यंत हिंदू आणि मुहम्मद लोक मशिदी-मंदिरात पूजा करत असत. ब्रिटीश राजवटीत हा विवाद टाळण्यासाठी एक कुंपण लावण्यात आले; ज्याच्या आत मशीद, जिथे मुहम्मद प्रार्थना करत, तर कुंपणाच्या बाहेर हिंदू पूजा करत.”

नागा साधू, वैरागी आणि इतर हिंदू या ठिकाणी जमले होते. या चकमकीचा तेही एक भाग होते. असे स्वातंत्र्यपूर्व काळातील हिंसाचाराच्या संदर्भात पुंज सांगतात.

पुंजने आपल्या पुस्तकात असा युक्तिवाद केला आहे की, १७५१ च्या सुरुवातीस मराठे चढाईवर असताना अवधच्या नावाबाने दोआब प्रदेशातील पठाण सैन्याचा पराभव करण्यास मराठ्यांची मदत केली होती. यावेळी त्यांनी अयोध्या, काशी आणि मथुरा यांचे नियंत्रण हस्तांतरित करण्याचे आवाहन केले होते. १७५६ मध्ये जेव्हा नवाब शुजा-उद-दौला यांनी अफगाण आक्रमणाच्या विरोधात मदत मागितली, तेव्हा मराठ्यांनी तीनही ठिकाणे परत करण्याची विनंती केली.

नवाबाने नंतर स्वतःची बाजू बदलली. त्यामुळे मराठ्यांच्या मागणीलाही महत्त्व उरले नाही. अहमद शाह अब्दालीकडून पानिपतचे तिसरे युद्धही ते हरले आणि हेच मराठा साम्राज्याचा ऱ्हास होण्याचे कारण ठरले.

या पुस्तकात पुंज हनुमान गढीवर कब्जा करण्याच्या आणखी एका अयशस्वी प्रयत्नाबद्दल लिहितात. हा प्रयत्न अमीर अली अमेथवी याने केला होता, ज्याला नंतर ब्रिटीश सैन्याने ठार केले.

हेही वाचा : पंतप्रधान मोदींचे विश्वासू; कोण आहेत राम मंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्र ?

३० नोव्हेंबर १८५८ रोजी मोहम्मद सलीमने काही निहंग शिखांविरुद्ध एफआयआर दाखल केली. या शिखांनी बाबरी मशिदीत निशाण साहिब बसवले, हवन केले आणि ‘राम’ही लिहले होते. या विरोधात ही एफआयआर दाखल करण्यात आली, असे पुंज सांगतात.

हे सर्व १८५७-५८ च्या कालावधीत घडले. या घटनांना शिपाई बंडाळी किंवा भारताचे पहिले स्वातंत्र्ययुद्ध असेही म्हणतात.

Story img Loader