कोल्हापूर : उसाला पुरेसा दर दिला जात नसल्याच्या कारणावरून निवडणुकीचा रणसंग्राम जोमात असताना राज्यात सर्वाधिक दर देणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील ‘बिद्री’ कारखान्याच्या संचालक मंडळाला निवडणुकीचे आव्हान पेलावे लागत आहे. छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा रणसंग्राम संपल्यानंतर आता कागल तालुक्यातील बिद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची रणधुमाळी उडाली आहे.

विरोधकांनी सत्ताधारी गटाला आव्हान द्यायला सुरुवात केली आहे. मागील निवडणुकीत विरोधी गटाचे नेतृत्व करणारे खासदार संजय मंडलिक यांनी ‘बिद्री’ व त्यांच्या हमीदवाडा मंडलिक कारखान्याची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे म्हटले आहे. सत्ताधारी गटाचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांनी त्याविषयी साशंकता व्यक्त केली आहे. राधानगरी – भुदरगड तालुक्याचा विधानसभा मतदारसंघ निवडणुकीच्या दृष्टीने ‘बिद्री’ची निवडणूक महत्त्वाची असल्याने त्याच्या राजकारणाची दिशा नेमकी कशी राहणार याची उत्सुकता आहे.

Ajit Pawar, sugar factory, Amit Shah allegation,
आजारी साखर कारखान्यांवर अजित पवार गटाचाही कब्जा, अमित शहांच्या आरोपानंतर विरोधी नेत्यांसह सत्ताधारी गटाचीही चर्चा
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Amit Shah alleges that Ajit Pawar group is occupying the sugar factories Print politics news
आजारी साखर कारखान्यांवर अजित पवार गटाचाही कब्जा; अमित शहांच्या आरोपानंतर विरोधी नेत्यांसह सत्ताधारी गटाचीही चर्चा
Onion garlic became expensive while the prices of cotton soybeans decreased
ग्राहक, शेतकरी चिंतेत; कांदा, लसूण महागले तर कापूस, सोयाबीनचे दर पडल्याने नाराजी
Rohit Pawar scandal regarding 32 IT companies in Hinjewadi
“हिंजवडी मधील ३२ आयटी कंपन्या गुजरातला जाणार”; रोहित पवारांचा गौप्यस्फोट, गेल्या दहा वर्षात एक ही…!
Onion garlic shortage
बाजारात कांदा, लसणाचा तुटवडा ? जाणून घ्या, कांदा, लसणाच्या दरातील तेजी किती दिवस
union home minister amit shah slams sharad pawar
‘पवारांच्या कारकिर्दीत राज्यातील १०० साखर कारखाने मृत्युपंथाला’, अमित शहा यांचा हल्लाबोल
National Sugar Factory Federation made various demands to the Central government
साखर उद्योग आर्थिक संकटात ? राष्ट्रीय साखर कारखाना महासंघाने केंद्राकडे केल्या विविध मागण्या

हेही वाचा – काँग्रेसच्या भूमिकेमुळे शिवसेनेत प्रवेश केलेल्या स्नेहल जगताप यांची कोंडी

बिद्री येथील दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखाना हा चार तालुक्यांच्या राजकारणाचा केंद्रबिंदू आहे. भुदरगड, राधानगरी, कागल व करवीर या तालुक्यातील २१८ गावांचे कार्यक्षेत्र आहे. कारखान्याचे ५५ हजार ऊस उत्पादक तर हजारावर संस्था सभासद आहेत. ६१ हजार सभासद असलेल्या या कारखान्याच्या मागील दोन निवडणुका जोरदार गाजल्या असल्याने यावेळी त्याला नेमके कसे वळण लागणार हे विविध घडामोडीमुळे लक्षवेधी बनले आहे.

सर्वाधिक दर असूनही

या कारखान्याचे अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार के. पी. पाटील आहेत. गेल्या निवडणुकीमध्ये तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार हसन मुश्रीफ, के. पी. पाटील यांनी एकत्रित येऊन निवडणूक लढवून यश मिळवले. यावेळी कारखान्यांमध्ये भाजपच्या सहा संचालकांचा प्रवेश झाला. गेल्या पाच वर्षांमध्ये बिद्री साखर कारखान्याने उच्चांक इतर दिला आहे. यावर्षीच्या हंगामात प्रतिटन ३२०९ रुपये देवून ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे समाधान करतानाच के. पी. पाटील यांनी बिद्रीच्या मतपेढीची चांगली बांधणी केली आहे. त्याला शिंदे गटाचे शिवसेनेचे आमदार प्रकाश आबिटकर यांनी आक्षेप घेत कारखान्याचा उतारा अधिक असल्याने एफआरपीपेक्षा अधिक रक्कम देण्यात पाटील अपयशी ठरले असल्याचा आरोप करून निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. मात्र आजवर बिद्रीत त्यांची डाळ शिजली नसल्याचे इतिहास सांगतो.

हेही वाचा – अकोल्यातील हिंसाचाराला राजकीय रंग

विधानसभा आणि कारखाना

सन २०१४ मध्ये के. पी. पाटील आणि त्यांचा चेला असलेले प्रकाश आबिटकर यांच्यात झालेली पहिली निवडणूक त्यावेळच्या विधानसभा निकालाने महत्त्वाची ठरली होती. तेव्हा पाटील यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. लगेचच झालेल्या निवडणुकीमध्ये आबिटकर यांनी कारखान्यात दिलेले आव्हान पाटील यांनी परतावून लावले होते. गेल्या वेळच्या दोन्ही निवडणुकीत आधीचीच पुनरावृत्ती झाली. म्हणजे विधानसभेला आबिटकर आणि कारखाना निवडणुकीत पाटील यांनी झेंडा फडकवला होता. आता पुन्हा एकदा या आजी माजी आणि एकेकाळच्या गुरू-शिष्यांमध्ये लढत होण्याची चिन्हे दिसू लागली असताना त्या भोवतालचे राजकारणही गतिमान झाले आहे.

बिनविरोधाचे नारे

विधानसभा निवडणुकीसाठी आबिटकर यांना खासदार संजय मंडलिक यांची मदत महत्त्वाची ठरते. मंडलिक यांनी बिद्री आणि त्यांच्या हमिदवाडा येथील सदाशिवराव मंडलिक सहकारी साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे म्हटले आहे. अर्थात तसे करायचे झाल्यास त्यांच्यासमोर आबिटकर यांना कारखाना निवडणूक संग्रामात येण्यापासून रोखण्याचे आव्हान असणार आहे. बदलत्या राजकीय परिस्थितीत मंडलिक यांचा शब्द अव्हेरणे आबिटकर यांनाही सोपे राहिलेले नाही. प्रश्न इतकाच राहील की निवडणूक अविरोध करण्यासाठी काही जागा पदरात पडून घेताना आबिटकर यांना पूर्वीच्या निवडणुकीत ‘लबाडांची टोळी’ अशी टीका केलेल्या सत्ताधाऱ्यांच्या टोळीशी हातमिळवणी करणार आहे, त्याचे काय समर्थन ते करणार, हाच महत्त्वाचा मुद्दा. त्यामुळे हा राजकीय तिढा कसा सोडवला जाणार याची उत्सुकता आहे.

हेही वाचा – एक माजी IAS अधिकारी कर्नाटकमधील काँग्रेसच्या विजयाचा शिल्पकार! पडद्यामागे राहून रणनीती ठरवणारे शशिकांत सेंथिल कोण आहेत?

गृहकलहाचा गुंता

आबिटकर यांच्याशी समेट झाला तरी के. पी. पाटील यांना घरातूनच आव्हान देण्याचा प्रयत्न होत असल्याने हा तिढा सोडवण्याची जबाबदारी तितकीच मोठी आहे. के. पी. पाटील व राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष ए. वाय. पाटील हे मेहुणे – पाहुणे आहेत. दोन्ही पाटील पाहुण्यांमध्ये अलीकडे राजकीय अंतर पडत चालले आहे. ए. वाय. पाटील यांची जिल्ह्यात होणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला हटकून उपस्थिती असते. खेरीज त्यांना आमदारकी खुणावू लागली आहे. के. पी. पाटील हे दोनदा विधानसभा निवडणुकीत पराभूत झाले तरी पुन्हा तयारीला लागले आहेत. त्यांची ही तयारी ए. वाय. पाटील यांच्या ध्येयावर बोळा फिरवणारी आहे. यातूनच हे मेहुणे – पाहुणे एकत्र येण्याचे टाळत आहे. त्यावर दोघांचे नेते हसन मुश्रीफ यांची ‘मेव्हण्या-पाहुण्यांशी ४० वर्षांपासूनची मैत्री आहे. दोघांना एकत्र कसे बांधायचे माहिती आहे. आतून ते दोघे एकत्रच आहेत. त्यांच्यात कुठलेही मतभेद नाहीत,’ असे विधान कालच केले असल्याने त्यावरून तर्कवितर्क व्यक्त केले जात आहेत. दोघे पाटील खरेच एकत्र आहेत की वरवर त्यांनी एकमेकांशी वाद असल्याचा आभास निर्माण केला आहे याची चर्चा झडत आहे. अर्थात या पाहुण्यांच्या राजकीय गृहकलहाचा गुंता मुश्रीफ कसे सोडवतात हेही बिद्री कारखाना आणि आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कुतूहलजनक ठरले आहे.