सुहास सरदेशमुख लोकसत्ता

छत्रपती संभाजीनगर: पैठण मतदारसंघातून सलग पाच वेळा विजयी झालेल्या खासदार संदीपान भुमरे यांचे चिरंजीव विलास भुमरे यांना विधानसभा निवडणुकीमध्ये उतरविण्याची तयारी झाल्यानंतर शिवसेनेच्या ठाकरे गटाने पुन्हा एकदा भुमरे यांचा ‘मद्यविक्री’ व्यावसाय चर्चेत यावा, अशा हालचालींना सुरुवात केली आहे. ठाकरे गटाकडून निवडणूक लढविण्यास इच्छूक दत्ता गोर्डे यांनी भुमरेच्या स्नुषा वर्षा या शिक्षिका म्हणून काम करत होत्या. पण आता त्यांच्या नावावरही मद्यविक्रीचा परवाना असल्याचा आरोप केला आहे. केवळ एवढेच नाही तर मद्यपरवाने मिळविण्यासाठी उत्पन्न स्रोतापेक्षा अधिकचा पैसा कोठून आणला याची चौकशी करण्याची मागणी लोकायुक्तांकडे केली आहे.

vegetable section of the market yard will be open on Bhaubij
भाऊबीजेच्या दिवशी मार्केट यार्डातील भाजीपाला विभाग सुरू, सलग सुट्ट्यांमुळे बाजार समिती प्रशासनाचा निर्णय
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट…
Pimpri Vidhan Sabha, Sharad Pawar candidate,
पिंपरी विधानसभा : ठाकरेंच्या शिवसैनिकांनी बंडाचा इशारा दिल्यानंतर शरद पवारांच्या उमेदवार काय म्हणाल्या? वाचा..
Imtiaz Jalil will contest assembly elections from Aurangabad East
इम्तियाज जलील औरंगाबाद पूर्व मधून निवडणुकीच्या रिंगणात
Sujay Vikhe Patil Jayashree thorat Sangamner tension
Sangamner News: बाळासाहेब थोरातांच्या मुलीबद्दल बोलताना भाजपा नेत्याची जीभ घसरली; सुजय विखेंच्या सभेनंतर संगमनेरमध्ये तणाव
Aditya Thackeray power show , Aditya Thackeray latest news, Aditya Thackeray marathi news,
वरळीमध्ये आदित्य ठाकरेंचे शक्तिप्रदर्शन, शिवसेनेच्या नेत्यांसह हजारो शिवसैनिकांची गर्दी
NCP Ajit Pawar candidate for existing MLAs in Pune district Pune news
वर्चस्वासाठी विद्यमानच वरचढ; राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचा पुणे जिल्ह्यात सावध पवित्रा
Vadgaon Sherit Mahayuti was not the candidate for the assembly elections Sharad Pawar group Pune print news
‘इतिहास’ बदलणाऱ्या ‘ या ‘ मतदारसंघाचा ‘वर्तमान’ अस्वस्थ! वडगाव शेरीत महायुतीचा उमेदवार ठरेना; शरद पवार गटाकडून ‘थांबा आणि पाहा’ धोरण

पैठण मतदारसंघावर संदीपान भुमरे यांची मजबूत पकड आहे. त्यांना मतदारसंघातील प्रमुख कार्यकर्त्यांचे फोन नंबर मुखपाठ आहेत. ऐन निवडणुकीत लागणारी सारी सामग्री गोळा करण्याची त्याची ‘ ताकद’ आता वाढलेली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ते अधिक जवळचे असे मानले जातात. त्यामुळे आपल्या मुलास उमेदवारी मिळावी यासाठी ते प्रयत्न करत होतेच. लोकसभा निवडणुकीपूर्वीपासून विलास भुमरे यांचे नाव संभाजीनगर शहरात चर्चेत रहावे, असे प्रयत्नही त्यांनी जाणीवपूर्वक केले. मराठवाडा मंत्रिमंडळ बैठकीच्या वेळी स्वागत कमानीवर विलास भुमरे दिसू लागले.

आणखी वाचा-मुस्लीम कट्टरपंथी ते कावड सेवक; उत्तर प्रदेशच्या राजकारणातील प्रमुख चेहरा, कोण आहेत इम्रान मसूद?

पैठण तालुक्यात तसेच संभाजीनगर शहरात विविध प्रकारची कामे घेऊन येणाऱ्या कार्यकर्त्यांना विलास भुमरे यांची भेट घ्यावी लागते. लोकसभा निवडणुकीतही त्यांनी प्रचार यंत्रणा लावली होती. त्यामुळे विलास भुमरे यांना पैठण विधानसभा मतदारसंघातून निश्चत उमेदवारी दिली जाईल असा दावा केला जातो. विलास भुमरे यांच्या विरोधात शिवसेनेच्या ठाकरे गटाने आता पुन्हा तयारी सुरू केली आहे. या वेळी तोंडी आरोप करण्याऐवजी मद्य परवान्याच्या कागदपत्राच्या आधारे आरोप होऊ लागले आहेत. दत्ता गोर्डे यांनी पत्रकार बैठक घेऊन भुमरे कुटुंबियांचा ‘मद्य विक्री’ व्यावसाय पुन्हा चर्चेत आणला आहे. याशिवाय अन्यही अनेक भ्रष्टाचाराची प्रकरणे चर्चेत आणली जाऊ शकतात, अशी तयारी सुरू केली आहे. जरांगे यांच्या आंदोलनाचा लाभही भुमरे गटास होऊ शकतो, असा दावा केला जात आहे.

आणखी वाचा-संसदेचं नवं रुप आणि राहुल गांधींची बदललेली देहबोली; शशी थरुर काय म्हणाले?

संदीपान भुमरे १९९५ व १९९९,२००४ मध्ये सलग निवडून आले होते. पण २००९ मध्ये संजय वाघचौरे यांनी त्यांचा पराभव केला होता. या मतदारसंघावर १९९० पासून शिवसेनेचा वरचष्मा आहे. १९९० मध्ये अप्पासाहेब वाघचौरे ४२ हजार २७३ मते घेऊन निवडून आले होते. पण त्यानंतर भुमरे यांना या मतदारसंघ बांधला. आता हा मतदारसंघ आपल्या मुलास मिळावा यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. या मतदारसंघात महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादीचा शरद पवार गट यांचाही दावा असू शकतो. सध्या मात्र पुन्हा एकदा भुमरे मद्यविक्री चर्चेत आली आहे.