ठाणे : शिवसेना (एकनाथ शिंदे) गटाच्या कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केल्याप्रकरणी कारागृहात असलेले भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी आणि कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या भाजपच्या उमेदवार सुलभा गायकवाड यांच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्याला शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी शनिवारी हजेरी लावल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दरम्यान, ‘आवडत असेल किंवा नसेल मात्र महायुतीचा धर्म पाळून सर्वांनी सुलभा गायकवाड यांचा प्रचार करा. आपल्यावर कोणीही शंका घेणार नाही असा प्रचार करून आपल्याला कल्याण पूर्वची महायुतीची जागा निवडून आणायची आहे’, असे आवाहन या वेळी बैठकीला उपस्थित असलेल्या शिवसैनिकांना केले. यामुळे गेले अनेक महिने गणपत गायकवाड यांचा कडाडून विरोध करणाऱ्या शिवसैनिकांमध्ये मात्र अस्वस्थता पसरली आहे.

हेही वाचा >>>Red Book : ‘संविधान बदलणार’ या मविआच्या नरेटिव्हला भाजपाचं प्रत्युत्तर; विधानसभेला ‘लाल पुस्तका’ची चर्चा का होतेय?

कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार गणपत गायकवाड आणि कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांचे संबंध हे कायमच परस्परविरोधी राहिले आहेत. अनेकदा भरसभेत अथवा विविध विकास कामांच्या लोकार्पण कार्यक्रमातून त्यांनी एकमेकांवर उघडपणे टीका केली आहे.

विधानसभा निवडणुकीत सुलभा गायकवाड यांचे प्रचाराचे काम करणार नाही अशी भूमिका स्थानिक शिवसैनिकांनी घेतली होती. तर महेश गायकवाड यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. असे असतानाच खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सुलभा गायकवाड यांच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेल्या महायुतीच्या मेळाव्याला उपस्थित राहिले.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Present of mp shrikant shinde to promote sulabha gaekwad print politics news amy