पीटीआय, नवी दिल्ली

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या सोमवारपासून तीन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर असून त्या अनेक कार्यक्रमांना उपस्थित राहणार असल्याचे राष्ट्रपती भवनाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.

सोमवारी त्या वारणानगर, कोल्हापूर येथील ‘श्री वारणा महिला सहकारी समूहा’च्या सुवर्णमहोत्सवी सोहळ्यात सहभागी होतील. तर ३ सप्टेंबरला पुणे येथील ‘सिम्बायोसिस इंटरनॅशनल’च्या २१ व्या दीक्षांत समारंभाला संबोधित करतील. ४ सप्टेंबर रोजी लातूर जिल्ह्यातल्या उदगीर येथील बुद्ध विहाराचे उद्घाटन राष्ट्रपतींच्या हस्ते होणार आहे. येथे महाराष्ट्र शासनाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘शासन आपल्या दारी’ आणि ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’तील लाभार्थ्यांच्या मेळाव्याला त्या संबोधित करणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: President draupadi murmu on maharashtra tour amy