नुकत्याच पार पडलेल्या राज्यसभा निवडणुकांमध्ये भाजपासाठी राजकीय समीकरणं जुळून आल्याचं निकालांवरून दिसून आलं. मात्र, आता भाजपाचं लक्ष्य आहे ते पुढील महिन्यात होणाऱ्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकांवर. या निवडणुकांमध्ये आपल्या उमेदवाराला सहजसोपा विजय मिळवून देण्यावर भाजपाचा भर असेल. केंद्रात आणि देशातल्या अनेक राज्यांमध्ये भाजपा सत्तेत असून मोठं संख्याबळ भाजपाच्या पाठिशी आहे. मात्र, असं असलं तरी भाजपाकडून राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी इतर पक्षीयांसोबत चर्चा-विनिमयाचा मार्ग स्वीकारला जात आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठीचं मतदान आणि त्यासाठी आवश्यक असणारं संख्याबळ मोजण्याची पद्धत यामध्ये याचं कारण सापडू शकेल.

भाजपाला गेल्या काही वर्षांमध्ये अनेक धोरणात्मक निर्णयांवर जनतेच्या नाराजीचा सामना करावा लागला आहे. नोटबंदी, जमीन अधिग्रहण कायदा, तीन शेतकरी कायदे माघारी घेण्याची नामुष्की, नागरिकत्व कायद्याच्या अंमलबजावणीत झालेला विलंब या पार्श्वभूमीवर २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुका आणि पुढील महिन्यात होणाऱ्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकांसाठी भाजपाकडून काळजीपूर्वक पावलं टाकली जात आहेत. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यावर पक्षानं राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारासाठी इतर पक्षीयांचा पाठिंबा मिळवण्याची जबाबदारी सोपवली आहे.

Nitin Gadkari campaign Miraj, Suresh Khade,
काँग्रेसच्या चुकीच्या धोरणामुळे ग्रामीण भाग विकासापासून वंचित, नितीन गडकरी यांचे टीकास्त्र
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
maharashtra assembly polls 2024 state economy in decline during bjp rule says chidambaram
भाजपच्या सत्ताकाळात महाराष्ट्राची पीछेहाट; माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांची टीका
maharashtra vidhan sabha election 2024 opposition united against ravi rana
लक्षवेधी लढत : रवी राणा यांच्याविरोधात सारे एकवटले
yogi adityanath criticize congress and mahavikas aghadi
योगी आदित्यनाथ म्हणाले “काँग्रेस नेतृत्वातील ‘मविआ’ची नियत साफ नाही”
maharashtra assembly election 2024, aheri constituency,
भाजप पाठोपाठ काँग्रेसचाही बंडखोरांना छुपा पाठिंबा, अहेरी विधानसभेत युती, आघाडीत अंतर्गत कलह
mayura kale vs sumit wankhede arvi assembly constituency election
लक्षणीय लढत : खासदार पत्नी विरुद्ध फडणवीसांचे विश्वासू असा सामना

नड्डा, सिंह की गडकरी?

सर्वपक्षीयांमध्ये मित्रत्वाचे संबंध असणाऱ्या नेत्यालाच भाजपाकडून उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. यामध्ये प्रामुख्याने जे. पी. नड्डा, राजनाथ सिंह आणि महाराष्ट्राच्या विदर्भातील नेते नितीन गडकरी यांची नावं चर्चेत आहेत.

केरळच्या राजकारणात खळबळ उडवणारं ३० किलो सोनं! आरोपी स्वप्ना सुरेशच्या नव्या दाव्यानं राजकारण तापलं

आकडेवारी काय सांगते?

भाजपा आणि मित्रपक्षांकडे एकूण आवश्यक मतांच्या ४८ टक्के मतं आहेत. अर्थात राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मतदान करणारे लोकसभा, राज्यसभा, राज्यांच्या विधानसभा, परिषदा यांच्या उमेदवारांची एकूण संख्या १० लाख ८६ हजार इतकी आहे. त्यापैकी भाजपा आणि मित्रपक्षांचे मिळून ५ लाख २६ हजार मतं आहेत. त्यामुळे आपल्या उमेदवाराला जिंकून आणण्यासाठी भाजपाला बिजू जनता दल (३१ हजार मतं), वायएसआरसीपी (४३ हजार मतं) आणि एआयएडीएमके (१५ हजार मतं) या पक्षांची देखील मदत लागणार आहे. या पक्षांनी आधीच भाजपा उमेदवाराला आपला पाठिंबा जाहीर केल्यामुळे भाजपासाठी ही निवडणूक सोपी असल्याचं मानलं जात असलं, तरी बिहारमधून भाजपासाठी काहीशा अडचणीच्या घडामोडी घडू लागल्या आहेत.

बिहारमधून भाजपाचा मित्रपक्ष असलेल्या जदयुनं आधीच नितीश कुमार राष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून उभे राहू शकतात, अशी चर्चा सुरू केली आहे. त्यांच्याच मंत्रीमंडळातील श्रावण कुमार यांनी नितीश कुमार हे राष्ट्रपतीपदासाठी चांगले उमेदवार ठरू शकतात, असं विधान केलं आहे. ही गोष्ट भाजपासाठी अडचणीची ठरू शकते. त्यासाठीच पक्षानं मे महिन्यातच केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना पाटण्याला जाऊन नितीश कुमार यांच्याशी चर्चा करण्याची जबाबदारी सोपवली होती.

विदर्भातील अपक्ष आघाडीकडे जाणार की फडणवीसांकडे?

नितीश कुमार यांच्या नावाला भाजपाचा विरोध का?

नितीश कुमार देशाचे राष्ट्रपती झाल्यास भाजपासाठी तो अवघड पेपर ठरू शकतो. विषेशत: २०२४मध्ये होणाऱ्या निवडणुकांच्या दृष्टीने नितीश कुमार राष्ट्रपतीपदी असणं भाजपासाठी त्रासदायक ठरू शकतं. नितीश कुमार यांच्यावर भाजपा पूर्णपणे भरवसा ठेऊ शकत नाही, असं देखील अंतर्गत गोटातून सांगितलं जात आहे. विशेषत: महत्त्वाच्या विषयांवर नितीश कुमार प्रसंगी प्रचंड आडमुठी भूमिका घेऊ शकतात. तसेच, इतर पक्षीयांसोबत नितीश कुमार यांचे चांगले संबंध आहेत. खुद्द काँग्रेसमधून देखील नितीश कुमार यांच्या राष्ट्रपतीपदासाठी पाठिंबा देण्याचे संकेत दिले जात आहेत.

२०१७च्या निवडणुकांमध्ये भाजपाने विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासाठी ७ लाख २ हजार ०४४ मतं जमवली होती. पण यावेळी मात्र भाजपाकडचा मतांचा कोटा थेट ५ लाख २६ हजारपर्यंत खाली आलेला आहे.