चंद्रपूर : चिमूरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या प्रचार सभांची मतदारांमध्ये तुलनात्मक चर्चा सुरू आहे. कुणाच्या सभेला गर्दी अधिक होती, कुणाचे भाषण मुद्देसूद झाले, यावरून दोन्ही सभांमध्ये तुलना केली जात आहे. मोदींच्या सभेचा लाभ भाजप उमेदवार आमदार कीर्तीकुमार भांगडिया यांना होतो, की राहुल गांधींच्या सभेचा फायदा काँग्रेस उमेदवार डॉ. सतीश वारजुरकर यांना होतो, याबाबत विविध तर्क लावले जात आहे.

पंतप्रधान मोदी व राहुल गांधी यांच्या एकाच आठवड्यात झालेल्या दोन जाहीर सभांमुळे चिमूर मतदारसंघाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. चिमूरमधून सलग दोन वेळा आमदार असलेले भाजपचे कीर्तीकुमार भांगडिया उमेदवार आहेत, तर काँग्रेसने डॉ. सतीश वारजुरकर यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना दुसऱ्यांदा निवडणूक रिंगणात उतरविले आहे. २०१९ मध्ये काँग्रेसमधील बंडखोरीमुळे भांगडिया अवघ्या ९ हजारांच्या मताधिक्क्याने विजयी झाले होते. मात्र, यंदा डॉ. वारजुरकर यांनी कडवे आवाहन उभे केल्याने भांगडिया यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यातूनच पंतप्रधान मोदी यांच्या जाहीर सभेचे नियोजन चिमूरमध्ये करण्यात आले होते. १२ नोव्हेंबर रोजी मोदींची सभा दुपारी एक वाजता झाली. या सभेत मोदींनी काँग्रेसवर थेट हल्ला करीत दलित, आदिवासी समाजात भांडणे लावत असल्याचा आरोप केला होता. तसेच राहुल गांधी आरक्षण संपविण्याची भाषा बोलत आहेत. त्यांना दलित, आदिवासींना आरक्षण द्यायचे नाही, अशी टीका केली. भाजप संविधान वाचविण्याचे काम करीत आहे. काँग्रेस राज्यातील तसेच देशातील विकासकामांना ब्रेक लावण्याचे काम करीत आहे. राज्यातील महाविकास आघाडीने भ्रष्टाचारात पीएच.डी. केली, असा थेट आरोपही मोदींनी केला. मोदींच्या सभेला प्रचंड गर्दी झाली होती. मात्र मोदींचे भाषण सुरू होताच लोक सभामंडप सोडून जात होते. सुरक्षा व्यवस्था इतकी कडक होती की भाजपच्या उमेदवारांसोबतच मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष यांनाही मंचावर जाण्यापासून रोखण्यात आले. त्याचा नकारात्मक परिणाम बघायला मिळत आहे.

narendra modi yogi adityanath campaign in maharashtra
लालकिल्ला : मोदी-योगींच्या प्रचाराने काय साधणार?
16 November Aries To Pisces Horoscope Today in Marathi
१६ नोव्हेंबर पंचांग: कृतिका नक्षत्रात मेषला शुभ दिवस,…
Yogendra Yadav, Bharat Jodo Andolan,
‘भारत जोडो’ आंदोलनातील सहभागी शहरी नक्षलवादी संघटनांची नावे जाहीर करा, योगेंद्र यादव यांचे देवेंद्र फडणवीस यांना आव्हान
Kasba Constituency, Ravindra Dhangekar,
विचारांची लढाई विचारांनी लढली पाहिजे : रविंद्र धंगेकर
Sanjay Raut and Mallikarjun Kharge
खरगेंच्या मुखी समर्थ रामदासांचा श्लोक, पण संजय राऊत निरुत्तर; जाहीरनामा प्रसिद्ध करताना नेमकं काय घडलं?
Tuljapur Devanand Rochkari, Tuljapur, Dheeraj Patil,
तुळजापुरात मैत्रीपूर्ण लढत की, आघाडीत बिघाडी? मविआचा अधिकृत उमेदवार कोण? रोचकरी की, पाटील?
Amit Shah on Uddhav Thackeray
Amit Shah : “उद्धव ठाकरे तुमच्यात दम असेल तर…”, अमित शाहांचं भर सभेत खुलं आव्हान, म्हणाले…
Maharashtra vidhan sabha election 2024 Confusion in Mahavikas Aghadi will be profitable for Minister Suresh Khade
महाविकास आघाडीतील गोंधळ मंत्री सुरेश खाडे यांच्या पथ्थ्यावरच

हेही वाचा – विरोधकांचे ‘सोयाबीन अस्त्र’ ‘लाडक्या बहीण’चा प्रभाव रोखणार ?

s

दुसरीकडे, राहुल गांधी यांची सभा डॉ. वारजुरकर यांच्या प्रचारार्थ झाली. या सभेलाही लोकांची प्रचंड गर्दी होती. या सभेत एकप्रकारे लोकांमध्ये जीवंतपणा व उत्साह दिसून येत होता. राहुल गांधी मंच सोडत नाही, तोपर्यंत लोक सभास्थळाहून हललेदेखील नाही. संघ व संविधान अशा दोन विचारधारा देशात आहेत. आम्ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, महात्मा गांधी याचे विचार असलेल्या संविधानासोबत असल्याचे राहुल यांनी सभेत सांगितले. अदानी यांना धारावी प्रकल्प मिळावा, यासाठी राज्यातील महाविकास आघाडी सरकार पाडण्यात आले. पक्ष फोडाफोडी केली, असा आरोप त्यांनी भाजपवर केला.

जनगणना, दलित, आदिवासी व मागासवर्गीयांना आरक्षण मिळालेच पाहिजे, यासाठी आरक्षण मर्यादा ५० टक्क्यांपेक्षा अधिक वाढविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. पंतप्रधान मोदी यांना संविधानविरोधी सांगत भाजपकडून मी संविधानविरोधी, आरक्षणविरोधी असल्याचा अपप्रचार सुरू आहे. शेतकऱ्यांच्या सोयाबीन, कापूस पिकांना रास्त भाव देण्याची आमची तयारी आहे. महिलाना तीन हजार प्रतिमाह देण्यासोबतच आरोग्य विमा, बेरोजगारांना रोजगार, अशा विविध घोषणा त्यांनी केल्या.

हेही वाचा – धामणगावात भाजप, काँग्रेसमध्‍ये वर्चस्‍वाची लढाई

पंतप्रधान मोदी व राहुल गांधी हे भाजप व काँग्रेस पक्षांचे दोन्ही मोठे नेते येथे आल्याने सध्या चिमूरवासीयांकडून याच दोन सभांमध्ये तुलना केली जात आहे.