नवी दिल्ली : संसदेच्या दोन्ही सदनांतील भाजपच्या खासदारांची गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट घेतली. यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये बिहार व आंध्र प्रदेशच नव्हे तर महाराष्ट्रासारख्या राज्यांसाठीही विकासासाठी भरघोस आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. ही बाब लोकांपर्यंत पोहोचवून विरोधकांचा अपप्रचार मोडून काढा, अशी सूचना मोदींनी भाजपच्या खासदारांना केल्याचे समजते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

विविध राज्यांतील खासदारांशी मोदी संवाद साधत आहेत. मोदींनी बुधवारी दिल्लीतील खासदारांचीही भेट घेतली होती. अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्रासारख्या विधानसभेची निवडणूक होत असलेल्या राज्याच्या तोंडाला पाने पुसल्याची तीव्र टीका राज्यातील विरोधी खासदारांनी केली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील भाजपच्या खासदारांशी मोदींनी केलेली चर्चा महत्त्वाची मानली जात आहे. केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, नितीन गडकरी यांच्यासह केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, मेधा कुलकर्णी, अनिल बोंडे, अशोक चव्हाण आदी खासदार उपस्थित होते. संसदेच्या दोन्ही सभागृहांतील नव्या खासदारांची मोदींनी विशेषत्वाने चौकशी केली. संसदेच्या कामकाजाबद्दलही त्यांनी विचारपूस केल्याचे समजते. संसदेच्या कामकाजामध्ये सहभागी होऊन लोकांचे प्रश्न मांडावेत अशी सूचनाही मोदींनी केली.