Congress Campaign In Rae Bareli: अमेठी आणि रायबरेलीतील उमेदवारीबाबत काँग्रेसने बराच वेळ घेतला आणि सरतेशेवटी रायबरेलीतून राहुल गांधी यांना तर अमेठीतून काँग्रेस कार्यकर्ते किशोरी लाल शर्मा यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. रायबरेलीतून प्रियांका गांधी पहिल्यांदाच निवडणूक लढवतील, अशी चर्चा सर्वत्र होती, मात्र ती फोल ठरली. अमेठी आणि रायबरेली हे दोन्ही मतदारसंघ नेहरु-गांधी घराण्याचे पारंपरिक मतदारसंघ मानले जातात. विशेषत: रायबरेलीबरोबर नेहरु घराण्याचे नाते १०० वर्षे जुने असल्याचे काँग्रेसकडून सांगण्यात येते. दुसरीकडे २०१९ साली अमेठीमध्ये स्मृती इराणी यांनी राहुल गांधींचा पराभव केल्यानंतर काँग्रेसचा हा बालेकिल्ला भाजपाच्या ताब्यात गेला आहे. त्यामुळे रायबरेली मतदारसंघ राखून ठेवणे आणि अमेठी पुन्हा ताब्यात घेण्याचे प्रयत्न काँग्रेसकडून केले जात आहेत. दुसरीकडे निवडून आल्यानंतर काँग्रेसचे कुणीही या मतदारसंघाकडे लक्ष देत नाही, असा आरोप भाजपाकडून केला जातो आहे. भाजपाच्या या प्रचाराला उत्तर देण्यासाठी प्रियांका गांधीही रायबरेलीतील प्रचारावर लक्ष ठेवून आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा