Priyanka Gandhi Raipur Chhattisgarh: काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी रविवारी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनात बोलत असताना भाजपा सरकारच्या ‘सबका साथ, सबका विकास’ या नाऱ्यावर कडाडून टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उद्योगपती गौतम अदाणी यांच्यासोबत असलेली जवळीक पाहता हा नारा आता “मित्रांची साथ, मित्रांचा विकास” असा झाला असल्याचं त्या म्हणाल्या. तसेच केंद्र सरकार न्यायालय, माध्यमं, ईडी आणि प्राप्तीकर विभागाला हाताशी धरून विरोधकांना नामोहरण करण्याचा प्रयत्न करत आहे, अशीही टीका प्रियांका गांधी यांनी केली. हिंडेनबर्ग संशोधन संस्थेचा अहवाल प्रसारीत झाल्यापासून काँग्रेस पक्ष हा पंतप्रधान मोदी यांच्यावर निशाणा साधत आहे. हिंडेनबर्गच्या अहवालात अदाणी समूहाने शेअर्सच्या किंमतीमध्ये फेरफार केल्याचे आरोप केले होते. या विषयावर काँग्रेसच्या रायपूरमधील अधिवेशनात बोलत असताना प्रियांका गांधी यांनी भाजपाचा समाचार घेतला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा