लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत मतदारांवर प्रभाव पाडणारी दारू, पैसे, अमली पदार्थ, मौल्यवान वस्तूंचा सुमारे ४९४ कोटींची संपत्ती आतापर्यंत जप्त करण्यात आली आहे. मंगळवारी मुंबईत दहिसर येथे दीड कोटींचे सोने जप्त करण्यात आले.

निवडणुकीत मतदारांना प्रलोभने दाखविण्यासाठी राजकीय पक्षांकडून अनेक क्लृप्त्या केल्या जात आहेत. मतदारांना पैसे, दारू, मौल्यवान वस्तूंचे वाटप करण्याच्या घटना सातत्याने उघडकीस येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी तर मतदारांपर्यंत रसद पुरवण्यासाठी पोलिसांच्या गाड्यांचा वापर केला जात असल्याचा आरोप महायुतीवर केला होता. पवार यांचा आरोप आणि राज्यात उघडकीस येत असलेल्या घटनांची गंभीर दखल घेत निवडणूक आयोगाने राज्यात कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी गेल्याच आठवड्यात रुग्णवाहिका, पोलिसांच्या गाड्यांची तपासणी करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर राज्य व केंद्र शासनाच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांच्या कारवाया वाढल्या असून मंगळवारी थेट प्रचार दौऱ्यावर असलेले शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे हेलिकॉप्टरही तपासण्यात आले.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Property worth rs 494 crore seized in maharashtra print politics news zws