अविनाश कवठेकर

पुणे : शहराचे माजी महापौर आणि आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पुण्यातून निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेले मुरलीधर मोहोळ यांची भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेता प्रवास योजना समितीच्या प्रदेश सहसंयोजक पदावर नियुक्ती करण्यात आल्याने भारतीय जनता पक्षाच्या वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरू झाली आहे. मोहोळ यांच्यावर नेत्यांच्या दौऱ्यांची जबाबदारी टाकल्याने त्यांच्या नावाचा विचार लोकसभा निवडणुकीसाठी होणार नाही, अशी चर्चा आहे. तर या नियुक्तीने मोहोळ यांना पश्चिम महाराष्ट्रातील दहा लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी मिळाली असून पक्षाच्या अतिवरिष्ठ नेत्यांपर्यंत त्यांचा संपर्क वाढणार आहे. हीच बाब त्यांच्यासाठी फायदेशीर ठरेल, असा एक मतप्रवाही भाजपमध्ये आहे. दरम्यान, पक्षाने दिलेली जबबादारी स्वीकारल्याचे मोहोळ यांनी स्पष्ट केले आहे.

Ladki Bahin Yojana Next Installment Date
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींना जानेवारीचा हप्ता कधी मिळणार? १५०० रुपये मिळणार की २१०० रुपये? आदिती तटकरेंनी दिली मोठी माहिती
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Sanjay Raut Devendra Fadnavis
Devendra Fadnavis : वाल्मिक कराड आणि फडणवीसांचं नेमकं नातं काय? संजय राऊतांचे मुख्यमंत्र्याना गंभीर सवाल
Chhagan Bhujbal On Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana : “…अन्यथा दंडासह रक्कम वसूल करण्यात येईल”, लाडकी बहीण योजनेबाबत छगन भुजबळांचं मोठं विधान
Nitish Kumar
Nitish Kumar : नितीश कुमार ‘ॲक्शन मोड’वर; बिहार विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मंत्रिमंडळात मोठे फेरबदल करणार?
Image Of Ramdas Athawale
Ramdas Athawale : रामदास आठवलेंचा पक्षही दिल्लीच्या मैदानात, विधानसभा निवडणुकीसाठी जाहीर केले १५ उमेदवार
Hasan Mushrif
Hasan Mushrif : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत हसन मुश्रीफ यांचं विधान चर्चेत; म्हणाले, “आता पुढील निवडणुकीच्या…”
Vijay Wadettiwar On Devendra Fadnavis
Vijay Wadettiwar : ‘देवेंद्र फडणवीसांनी आता नरेंद्र मोदींचं वारसदार व्हावं’, विजय वडेट्टीवार यांचं मोठं विधान

भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक रचनेमध्ये विविध समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. त्याअंतर्गत केंद्रीय नेत्यांचा राज्यातील प्रवास, त्यांच्या सभांचे नियोजन करण्यासाठी केंद्रीय नेता प्रवास समिती आहे. या समितीच्या पश्चिम महाराष्ट्रासाठीच्या सहसंयोजकपदाची जबबादारी माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही नियुक्ती जाहीर केली आहे.

हेही वाचा… पुणे फेस्टिव्हलच्या निमित्ताने भाजपबरोबर ‘जवळीक’ साधण्याचा कलमाडींचा प्रयत्न, काँग्रेसच्या व्यासपीठावर भाजप नेत्यांची मांदियाळी

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मुरलीधर मोहोळ पुण्यातून निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. भारतीय जनता पक्षाबरोबरच अन्य पक्षातील नेत्यांबरोबरचे त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध, विशेषत: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्याबरोबरचे त्यांचे निकटचे संबंध, देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांच्याबरोबरच त्यांचे विश्वासू अशी त्यांची ओळख असून करोना संसर्ग काळात महापौर म्हणून मोहोळ यांनी पार पाडलेली जबबादारी आणि शहराच्या प्रश्नांचा आवाका यामुळे लोकसभा निवडणुकीसाठी त्यांच्या नावाचा विचार होऊ शकतो, अशी चर्चा भाजपमध्ये आहे. आगामी काळात महापालिका निवडणुकीसह जिल्हा परिषदेचीही निवडणूक होणार आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या दौऱ्यांच्या नियोजनाची जबबादारी त्यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. मात्र नेता प्रवास योजनेची जबाबदारी त्यांच्याकडे देण्यात आल्याने पक्षाकडून त्यांच्या नावाचा विचार लोकसभा निवडणुकीसाठी होणार नाही, अशी चर्चा सुरू झाली आहे. ही जबाबदारी देऊन पक्षाने त्यांची पदावनती केल्याचेही बोलले जात आहे. पुण्यातील राजकारणात भाजपचे नेतृत्व म्हणून मोहोळ यांच्याकडे पाहिले जात होते. मात्र ही जबाबदारी त्यांना दिल्याने पक्षातूनच आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

हेही वाचा… Maharashtra News Live : महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडीचा आढावा, जाणून घ्या एकाच क्लिकवर!

मुरलीधर मोहोळ यांचा लोकसभा निवडणूक लढविण्याचा मार्ग खडतर झाल्याचे बोलले जात असले तरी मोहोळ निवडणुकीच्या स्पर्धेत असल्याची चर्चा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा या सारख्या प्रमुख नेत्यांच्या दौऱ्यांचे नियोजन त्यांना करावे लागणार आहे. पश्चिम महाराष्ट्रातील दहा लोकसभा मतदारसंघ त्यांच्याकडे असतील. यानिमित्ताने त्यांचा संपर्क आखणी वाढणार असून पक्षाच्या प्रदेश आणि केंद्रीय नेत्यांसमवेतची त्यांची जवळीक वाढणार आहे. त्यामुळे मोहोळ यांचे पक्षातील राजकीय वजन वाढण्यास मदत होईल, असा दावा भाजपच्या एका गटाकडून केला जात आहे.

दरम्यान, कार्यकर्ता म्हणून पक्षाचे काम सुरू केले. पक्षाने दिलेली जबाबदारी मी नेहमीच आनंदाने स्वीकराली आहे. नवी जबाबदारी सोपविण्यात आली असून त्यालाही योग्य न्याय दिला जाईल, अशी प्रतिक्रिया मुरलीधर मोहोळ यांनी दिली.

Story img Loader