जयेश सामंत, लोकसत्ता
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
अंधेरी पोटनिवडणुकीत घडलेल्या नाट्यमय घडामोडीनंतर ऐनवेळेस घ्यावी लागलेली माघार तसेच नुकत्याच झालेल्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात भाजप उमेदवारांचा झालेला पराभव यामुळे राज्यात नव्यानेच स्थापन झालेल्या शिंदे-फडणवीस सरकारविरोधात महाविकास आघाडीच्या पंखांना बळ मिळू लागल्याने पुण्यात होऊ घातलेल्या दोन्ही पोटनिवडणुका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कमालिच्या प्रतिष्ठेच्या केल्याचे चित्र आहे.
चिंचवड मतदारसंघात महाविकास आघाडीत झालेल्या बंडखोरीमुळे भाजप आणि शिंदे गटात काहीसे अनुकूल चित्र निर्माण झाले असले तरी भाजपच्या परंपरागत कसबा मतदारसंघात युतीला फारसे पोषक वातावरण नसल्याचे अंदाज मिळू लागल्याने मुख्यमंत्र्यांच्या गोटात गेल्या काही दिवसांपासून वेगाने हालचाली होताना दिसत आहेत. भाजप, संघ परिवाराशी संबंधित असलेले नेते, पदाधिकाऱ्यांसोबत मुख्यमंत्र्यांनी थेट संवाद प्रस्थापित केल्याची चर्चा असून ठाणे जिल्ह्यातून विशेषत: ब्राम्हण, सोनार, कासार समाजातील माजी नगरसेवक, प्रतिष्ठीत, प्रभावी मंडळींची टीम तयार करत कसब्याच्या मोहीमेवर पाठवणी केली जात असल्याचे वृत्त आहे.
हेही वाचा >>> हसन मुश्रीफ यांनी दंड थोपटले
राज्यात सरकार स्थापन झाल्यानंतर झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये भाजप तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाला मोठे यश मिळाल्याचा दावा या दोन्ही पक्षांचे नेते सातत्याने करताना दिसतात. असे असले तरी ग्रामपंचायत निवडणुकांची एकंदर मांडणी लक्षात घेता सर्वच पक्षांच्या या दाव्यांमध्ये कितपत तथ्य असते याविषयी संभ्रम व्यक्त होताना दिसतो. नुकत्याच झालेल्या शिक्षक तसेच पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीचा कौल मात्र महाविकास आघाडीच्या बाजूने लागलेला पहायला मिळाला. भाजपला त्यांच्या बालेकिल्ल्यातच पराभवाचा धक्का बसला. या निवडणुकांच्या निकालांमुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कमालिचे सतर्क झाल्याचे चित्र असून येत्या २६ फेब्रुवारी रोजी होऊ घातलेल्या पुण्यातील दोन्ही विधानसभा पोटनिवडणुकीत भाजप उमेदवारांमागे सर्व प्रकारची ताकद उभी करण्यास स्वत: शिंदे यांनी सुरुवात केल्याचे विश्वसनिय माहिती आहे. चिंचवड आणि कसबा या दोन्ही मतदारसंघात भाजपचे उमेदवार आहेत.
हेही वाचा >>> गर्दीमुळे मुख्यमंत्री तर, कामांच्या मंजुरीने आमदार कांदे सुखावले
कसबा हा तर भाजपचा परंपरागत मतदारसंघ असून चिंचवड मतदारसंघातही दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांची ताकद आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत मोडणारा चिंचवड हा मतदारसंघ एकेकाळी राष्ट्रवादी काॅग्रेस पक्षाचा बालेकिल्ला मानला जात. २०१४ नंतर बदलेल्या राजकीय समिकरणामुळे याठिकाणी सत्ताबदल झालेला पहायला मिळाला. यावेळी होत असलेल्या पोटनिवडणुकीत चिंचवड मतदारसंघात महाविकास आघाडीत बंडखोरी झाल्यामुळे भाजपच्या गोटात खुशीचे वातावरण असले तरी कसबा मात्र ‘सोपा’ नाही असे अंदाज पुढे येऊ लागल्याने याठिकाणी युतीच्या गोटात हालचालींना वेग आला आहे.
शिंदे समर्थकांचा कसब्यात ठिय्या
कसबा पोटनिवडणुकीत भाजपने यंदा ब्राम्हण समाजातून उमेदवार दिला नसल्याचे त्याचे पडसाद याठिकाणी उमटताना दिसत आहे. तसेच या मतदारसंघात कॉंग्रेसला मानणारा मोठा मतदार असल्याचे मागील काही निवडणुकांमध्ये दिसून आले आहे. या पोटनिवडणुकांमध्ये एकाही ठिकाणी भाजपला धक्का बसल्याने नव्याने स्थापन झालेल्या सरकारविरोधात महाविकास आघाडीला आणखी बळ मिळेल या शक्यतेमुळे मुख्यमंत्री शिंदे यांनी स्वत:ची मोठी यंत्रणा भाजपच्या मदतीसाठी उतरवली आहे. भाजपने गेल्या काही दिवसांपासून याठिकाणी सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांना तैनात केले आहे. चंद्रकांत पाटील यांच्या दिमतीला चव्हाण यांनी कल्याण डोंबिवलीतील भाजपचे जुने जाणते नगरसेवक तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील महत्वाच्या पदाधिकाऱ्यांना याठिकाणी मदतीला घेतले आहे. ब्राम्हण समाजात काही प्रमाणात नाराजी असल्याची चर्चा जोर धरत असताना या समाजातील विशीष्ट संस्था तसेच प्रभावी मंडळींच्या भेटीगाठी घेऊन ही नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मुख्यमंत्र्यांनी ठाणे शहर तसेच जिल्ह्यातील भाजपमधील ब्राम्हण समाजातील माजी नगरसेवक, पदाधिकारी तसेच काही संघातील काही विशीष्ट पदाधिकाऱ्यांसोबत जातीने चर्चा सुरु केली असून ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के यांची सध्या कसब्यात पाठवणी करण्यात आली आहे. कसब्यातील राजकीय, समाजिक समाजिक संस्था, विशेषत: गणेश मंडळांचा प्रभाव, तसेच येथील इतर प्रश्नांची बारीक माहिती मुख्यमंत्री घेत असून त्यादृष्टीने रणनिती आखली जात आहे. या मतदारसंघात मर्यादित स्वरुपात का होईना असलेला मनसेचा प्रभाव पहाता ‘शिवतिर्था’वरुन भाजप उमेदवाला पुर्ण मदत होईल अशी व्यवस्थाही थेट ‘वर्षा’वरुन केली जात असल्याचेही सांगण्यात येते.