पुणे : अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी पुणे, पिंपरी-चिंचवडसह ग्रामीण भागातील मतदारसंघांतील लढतींचे चित्र साधारण स्पष्ट झाले असून, जिल्ह्यात प्रामुख्याने ‘राष्ट्रवादी’ विरुद्ध ‘राष्ट्रवादी’ आणि भाजप विरुद्ध काँग्रेस अशा लढती रंगणार आहेत. जिल्ह्यात महायुती आणि महाविकास आघाडी, दोन्हीकडचे उमेदवार तगडे असल्याने बहुतांश लढती चुरशीच्या होतील, असा अंदाज असून, प्रचारात कोण, कशी बाजू मारतो, यावर बरेच काही अवलंबून असेल.

हेही वाचा : सिंचन घोटाळाप्रकरणी आर. आर. पाटलांनी फसवले, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आरोप

Former corporator of NCP Ajit Pawar group Nana Kate will contest as an independent
पिंपरी : चिंचवडमध्ये महायुतीत बंडखोरी, अजितदादांच्या राष्ट्रवादीचे नाना काटे अपक्ष लढणार
Daily Horoscope On 30 October
३० ऑक्टोबर पंचांग: दिवाळीआधीच येईल सोनेरी संधी, आर्थिक…
article Shiv Sena MLA Shahaji Bapu Patil denies links to cash seizure
उलटा चष्मा : डोंगर, झाडी, बंडले…
kolhapur, maha vikas aghadi, mahayuti,
कोल्हापुरात आघाडी, महायुतीत बंडाचे झेंडे !
Sharad pawar demand supreme court to freeze clock,
‘घड्याळ’ चिन्हाबाबत उद्या सुनावणी; शरद पवार गटाची बाजू ऐकण्याची तयारी
Rebellion to Mahayuti and Mahavikas Aghadi in Purandar
पुरंदरमध्ये महायुती, महाविकास आघाडीला बंडखोरीचे ग्रहण
Challenge of Rebellion for Mahayuti in Amravati
अमरावती जिल्‍ह्यात महायुतीसमोर बंडखोरीचे आव्‍हान
Marathwada NCP, constituencies Marathwada,
मराठवाड्यात राष्ट्रवादीत फूट पडलेल्या मतदारसंघांमध्ये चुरस

विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत मंगळवारी संपली. शहरी भागात प्रामुख्याने भाजप विरुद्ध काँग्रेस आणि ग्रामीण भागात राष्ट्रवादी (अजित पवार) विरुद्ध राष्ट्रवादी (शरद पवार), अशा दोन पक्षांतील उमेदवारांमध्ये सामना होणार आहे. काही ठिकाणी बंडखोरी झाली असली, तरी अर्ज मागे घेण्याच्या मुदतीत यातील काही बंडखोर माघार घेतील, अशी शक्यता आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही जिल्ह्यातील काही मतदारसंघांत उमेदवार दिले आहेत. मात्र, सरळ लढती महायुती आणि महाविकास आघाडीतील उमेदवारांमध्येच रंगणार आहेत. शहरातील आठ विधानसभा मतदारसंघापैकी काही मतदारसंघांतील लढत महायुतीमधील भाजप आणि महाविकास आघाडीतील काँग्रेसमध्ये यांच्यात आहे. त्यामध्ये कसबा, शिवाजीनगर, पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघांचा समावेश आहे. तर, वडगावशेरी आणि हडपसरमध्ये ‘राष्ट्रवादी’ विरुद्ध ‘राष्ट्रवादी’ अशी लढत होईल. कोथरूडमध्ये भाजप विरुद्ध शिवसेना (ठाकरे) पक्षात लढत होणार असून, बंडखोरी झालेल्या पर्वतीमध्ये भाजप विरुद्ध राष्ट्रवादी (शरद पवार) पक्ष अशी लढत होईल. खडकवासाल मतदारसंघात भाजपच्या उमेदवारापुढे राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाच्या उमेदवाराचे आव्हान असणार आहे.

ग्रामीण भागातील मतदारसंघांचा विचार करता बहुतांश मतदारसंघांत राष्ट्रवादी (शरद पवार) आणि राष्ट्रवादी (अजित पवार) असाच सामना रंगणार आहे. जुन्नरमध्ये विद्यामान आमदार अतुल बेनके यांना काँग्रेसमधून राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षात आलेले सत्यशील शेरकर यांचे आव्हान असेल. शिरूरमध्ये शिवसेना (ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख माऊली कटके यांनी राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षात प्रवेश केला आहे. या मतदारसंघात भाजपचे नेते प्रदीप कंद यांनी बंडखोरी केली असली, तरी विद्यामान आमदार राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे अशोक पवार आणि माऊली कटके यांच्यातच सामना रंगेल. भोरमध्ये काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे यांच्याविरोधात राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाच्या उमेदवाराचे आव्हान असणार आहे. पुरंदरमध्ये शिवसेना (शिंदे) पक्षाचे माजी राज्यमंत्री विजय शिवतारे आणि काँग्रेसचे आमदार संजय जगताप यांच्यात लढाई आहे. बारामतीचा सामना अजित पवार आणि त्यांचे सख्खे पुतणे युगेंद्र पवार असा होणार आहे. इंदापूरमध्ये राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे आमदार दत्तात्रय भरणे यांच्यापुढे भाजपमधून राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षात गेलेले माजी मंत्री हर्षवर्धन पाटील लढत देणार आहेत. दौंडमधील लढत भाजपचे आमदार राहुल कुल यांच्या विरोधात माजी आमदार रमेश थोरात अशी होईल. थोरात हे महायुतीमधील राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षात होते. मात्र, त्यांनी अजित पवार यांची साथ सोडून राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षात प्रवेश केला.

हेही वाचा : ‘मविआ’ सरकारच्या काळातच टाटा एअरबस, अन्य प्रकल्प राज्याबाहेर, देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना प्रत्युत्तर

आंबेगाव मतदारसंघातील लढत राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील आणि त्यांचेच एके काळचे सहकारी राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे नेते देवदत्त निकम यांच्यात असेल. खेड-आळंदी मतदारसंघात शिवसेना (ठाकरे) पक्ष विरोधात राष्ट्रवादी (अजित पवार) पक्ष आहे. येथे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्यापुढे शिवसेना (ठाकरे) पक्षाच्या उमेदवाराचे आव्हान असणार आहे.

या लढतींकडे लक्ष…

● अजित पवार (राष्ट्रवादी – अजित पवार) वि. युगेंद्र पवार (राष्ट्रवादी – शरद पवार) : बारामती

● रवींद्र धंगेकर (काँग्रेस) वि. हेमंत रासने (भाजप) : कसबा पेठ

● हर्षवर्धन पाटील (राष्ट्रवादी – शरद पवार) वि. दत्ता भरणे (राष्ट्रवादी – अजित पवार) : इंदापूर

● सुनील कांबळे (भाजप) वि. रमेश बागवे (काँग्रेस) : पुणे कँटोन्मेंट

● सिद्धार्थ शिरोळे (भाजप) वि. दत्ता बहिरट (काँग्रेस) : शिवाजीनगर

● भीमराव तापकीर (भाजप) वि. सचिन दोडके (राष्ट्रवादी – शरद पवार) : खडकवासला

● अतुल बेनके (राष्ट्रवादी – अजित पवार) वि. सत्यशील शेरकर (राष्ट्रवादी – शरद पवार) : जुन्नर

● विजय शिवतारे (शिवसेना – शिंदे) वि. संजय जगताप (काँग्रेस) : पुरंदर