पुणे : पुणे मतदारसंघात यंदा चौरंगी लढत होणार असून, पहिल्यांदाच चारही उमेदवार हे पुणे महापालिकेचे माजी नगरसेवक आहेत. या उमेदवारांकडून पुण्याच्या भविष्याचा आराखडा मांडला जाण्याची पुणेकरांची अपेक्षा असली, तरी वैयक्तिक पातळीवर टीका करत ‘वॉटर, मीटर आणि गटर’ या प्रश्नांवरच बोलण्यावर उमेदवारांनी भर दिल्याने यंदा प्रचाराचा दर्जाही घसरला आहे. त्यामुळे केंद्राकडून पुण्यासाठी कोणत्या नवीन योजना आणणार, याबाबतचा दूरदर्शीपणाचा प्रचारात अभाव असल्याने यंदाची निवडणूक ही लोकसभेपेक्षा महापालिकेच्या पातळीवर पोहोचल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ, काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर, वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार वसंत मोरे आणि ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनचे (एमआयएम) उमेदवार अनिस सुंडके हे चौघेही पुणे महापालिकेचे माजी नगरसेवक आहेत. मोहोळ यांनी महापौर आणि स्थायी समितीचे अध्यक्षपद भूषविले आहे. धंगेकर हे चार वेळा नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत निवडून येईपर्यंत ते महापालिकेत सक्रिय होते. वसंत मोरे हे सलग तीन वेळा नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. ते मनसेचे महापालिकेत गटनेतेही होते. सुंडके हे आतापर्यंत काँग्रेसमध्ये होते. ऐन निवडणुकीत ते एमआयएममध्ये आले आहेत. सुंडके हे स्थायी समितीचे माजी अध्यक्ष आहेत. चौघांची राजकीय कारकीर्द ही महापालिकेत घडली असल्याने प्रचारामध्येही या उमेदवारांकडून पाणी, वीज आणि सांडपाणी व्यवस्था या प्रश्नांभोवती फिरत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

99 crore RTE fee refund, RTE, refund ,
ठाणे : ९९ कोटी रुपयांचा आरटीई शुल्क परतावा थकीत !
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Article about obcs dominate government job recruitment
लोकजागर : ओबीसींची ‘सर्वोच्च’ अडवणूक!
zilla parishad loksatta
राज्यातील सहा जिल्हा परिषद, ४४ पंचायत समितींवर ‘प्रशासक राज’; मुदतवाढ नाहीच
Thane Municipal Corporation prepares water supply plan for next 30 years amid urbanization
अवाढव्य वाढलेल्या ठाण्याची तहान वाढीव पाणी पुरवठा भागवेल का?
sebi taken various steps to encourage the dematerialization of shares print
‘डिमॅट’ अनिवार्य करण्याचा विचार : सेबी
principal posts , Reservation , MPSC,
अर्जप्रक्रिया पूर्ण झाल्यावर एमपीएससीने आरक्षण काढून टाकले, आता सर्व पदे खुल्या वर्गासाठी
mpsc result latest marathi news
‘एमपीएससी’च्या समाज कल्याण अधिकारी पदाचा निकाल जाहीर, मात्र केवळ ‘या’ उमेदवारांना मुलाखतीची संधी

हेही वाचा : पंतप्रधान मोदींचा हल्ला दानिश अलींसाठी कौतुकाचा विषय, काय म्हणाले अली?

पुणे लोकसभेतील आजवरच्या खासदारांपैकी अण्णा जोशी. गिरीश बापट आणि अनिल शिरोळे हे महापालिकेत भाजपचे नगरसेवक होते. मात्र, त्यांच्यासमोर असलेले उमेदवार हे नगरसेवक नसल्याने प्रचारात पुण्यासाठी केंद्राकडून कोणते प्रकल्प आणणार, यावर भर देण्यात येत असे. मात्र, यंदाच्या निवडणुकीत पहिल्यांदाच चारही प्रमुख उमेदवार हे नगरसेवक असल्याने वैयक्तिक टीका आणि पुण्यातील स्थानिक प्रश्न सोडविण्याचे आश्वासन देण्यात येत आहेत. पुण्यासाठी भविष्यातील प्रकल्यांचा प्रचारात अभाव असल्याने ही निवडणूक लोकसभेची आहे की महापालिकेची, असा प्रश्न पुणेकरांना पडू लागला आहे.

जुन्या प्रकल्पांवर चर्चेचे गुऱ्हाळ

पुण्यात मेट्रो, जायका, स्मार्ट सिटी आणि पुरंदर येथील नियोजित विमानतळ हे केंद्र सरकारशी संबंधित प्रकल्प आहेत. यापैकी मेट्रो प्रकल्प सुरू झाला आहे. स्मार्ट सिटी प्रकल्प केंद्रानेच गुंडाळला आहे. जायका प्रकल्प वादग्रस्त झाला असून नवीन विमानतळाच्या प्रकल्पाचे कागदी घोडे नाचविले जात आहेत. हे प्रकल्प आणल्याचा प्रचार भाजप करत असून, काँग्रेसकडून हे प्रकल्प अद्याप अर्धवट असल्याची टीका केली जात आहे. वंचित बहुजन आघाडी आण एमआयएम या प्रश्नांवर फारसे बोलताना दिसत नाही.

हेही वाचा : “मोदींनी तरुणांना पूर्णपणे उद्ध्वस्त केले”, मल्लिकार्जुन खरगेंचे पंतप्रधानांवर गंभीर आरोप; काय म्हणाले?

महापालिकेतील कारभार आणि चारित्र्यहनन

एकेमेकांचे चारित्र्यहनन आणि महापालिकेत नगरसेवक असताना केलेल्या कारभारावर टीका करणे, यावरच प्रामुख्याने भाजप आणि काँग्रेसच्या उमेदवारांनी लक्ष केंद्रित केले आहे. धंगेकर यांना उमेदवारी जाहीर होताच त्यांच्या समर्थकांनी समाजमाध्यमांमध्ये प्रचार करताना धंगेकर यांच्या छायाचित्राबरोबर दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्या छायाचित्राचा वापर केला. त्यास भाजप आणि बापट यांचे चिरंजीव गौरव बापट यांनी आक्षेप घेतला. त्यानंतर उमेदवारांकडून वैयक्तिक चारित्र्यहननाला सुरुवात झाली. धंगेकर यांचे शिक्षण आठवी नापास असल्याचा प्रचार समाजमाध्यमांतून करण्यात आला. त्यावरून वादंग झाला. त्यानंतर धंगेकर आणि मोहोळ यांच्यात आरोप-प्रत्यारोपांचे डावपेच सुरू झाले आहेत. कोथरुड येथील उद्यानातील मोनोरेल प्रकल्प हा मोहोळ यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असताना त्यास स्थानिक नागरिकांनी विरोध सुरू केल्यावर धंगेकर यांनी हा विषय हाती घेतला. मोनोरेल प्रकल्पाला विरोध करत मोहोळ यांना हा प्रकल्प होणार नसल्याचे जाहीर करण्यास भाग पाडले. पौडरोड-बालभारती या रस्त्याला पर्यावरणवाद्यांचा विरोध आहे. मोहोळ यांनी चर्चेतून मार्ग काढण्याचे वक्तव्य केल्यावर धंगेकर यांनी हा विषय धरून ठेवला. त्यामुळे मोहोळ यांना एक पाऊल मागे घ्यावे लागले. मोहोळ यांनी महापौर आणि स्थायी समिती अध्यक्षपदाच्या कार्यकाळात केलेल्या प्रकल्पांवर टीका करणे आणि मोहोळ यांनी त्यास उत्तर देणे, या प्रकारामुळे ही निवडणूक लोकसभेपेक्षा महापालिकेच्या पातळीवर येऊन पोहोचली आहे.

हेही वाचा : पंतप्रधान मोदींना पर्याय कोण? महाराष्ट्रातील जनतेच्या काय आहेत भावना?

भाजपला मोंदींचा आधार

वैयक्तिक टीका आणि महापालिकेच्या कारभाराबाबत आरोपांमुळे भाजपकडून आता मोदींचा पुन्हा पंतप्रधान करण्याचा मुद्दा सातत्याने पुढे केला जाऊ लागला आहे. येत्या २९ एप्रिल रोजी पुण्यात मोदींची जाहीर सभा होत असल्याने स्थानिक प्रश्नांवरील प्रचार देशपातळीवर नेण्याचा प्रयत्न भाजपकडून करण्यात येत आहे. मात्र, काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएमकडून स्थानिक प्रश्नांवरच जोर दिल्याचे दिसून येते.

Story img Loader