पुणे: पुणे लोकसभा मतदारसंघात ब्राह्मण उमेदवार द्यायचा की ब्राह्मणेतर या कोड्यात भाजप अजूनही अडकून पडली आहे. माजी महापौर, भाजपचे प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रचारक सुनील देवधर या दोघांमध्ये उमेदवारीसाठी चुरस असून दोघांच्याही दिल्ली वाऱ्या सुरू झाल्या आहेत. मोहोळ हे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या माध्यमातून दिल्लीत बस्तान बांधण्यासाठी तयारी करत आहेत, तर देवधर हे दिल्लीतील अनुभव पणाला लावण्यात गुंतले आहेत.

खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर पुण्याचे नवे नेतृत्व निवडण्यासाठी भाजपाला तारेवरची कसरत करावी लागत आहे. कसबा विधानसभा मतदारसंघातील पराभवाचा कटू अनुभव विचारात घेता पुण्यात ब्राह्मण उमेदवार द्यायचा की ब्राह्मणेतर या कोड्यात भाजप अडकली आहे. कसब्याची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी सुनील देवधर यांचे नाव पुढे आले आहे. देवधर हे उमेदवार असतील तर काँग्रेसकडून ब्राह्मणेतर उमेदवार देण्याची तयारी करण्यात येत आहे. त्यामुळे भाजपने ‘प्लॅन बी’ तयार ठेवला आहे. त्यानुसार मोहोळ यांचा पर्याय भाजपकडे आहे. भाजपकडून ब्राह्मणेतर उमेदवार देण्याची व्यूहरचना आखण्यात आली आहे. त्यामुळे मुरलीधर मोहोळ यांचे नाव सध्या उमेदवार म्हणून आघाडीवर असल्याचे सांगितले जाते. देवधर आणि मोहोळ हे दोघेही सध्या दिल्ली वाऱ्या करत आहेत. मोहोळ यांचे दिल्ली दौरे वाढू लागल्याचे लक्षात येताच देवधर यांनी आजवरचा दिल्लीतील अनुभव पणाला लावण्यास सुरुवात केली आहे.

lure of marriage , pretending to be doctor,
सातारा : डॉक्टर असल्याचे भासवून लग्नाच्या आमिषाने अत्याचार, कराडमध्ये गुन्हा दाखल
walmik karad illegal transportation
वाल्मीक कराड: राखेच्या अवैध वाहतुकीतून दहशतीचा धुरळा!
Pushpa 2 Stampede Case
Pushpa 2 Stampede Case : ‘पुष्पा २’ चेंगराचेंगरी प्रकरणी अल्लू अर्जुनच्या बाउन्सरला अटक; चाहत्यांना धक्काबुक्की केल्याचा आरोप
Will BJP win in Delhi this year Is the election challenging for AAP
दिल्लीत यंदा भाजपची बाजी? ‘आप’साठी निवडणूक आव्हानात्मक का?
Pankaja Munde and Dhananjay Munde vs Suresh Dhas new controversy on political stage after elections
मुंडे बहीण-भाऊ विरुद्ध सुरेश धस, निवडणुकीनंतर राजकीय पटलावर नवा वाद
BJP MLA suresh dhas, pankaja munde,
भाजप आमदार स्पष्टच बोलले, म्हणाले पंकजा मुंडेंनी भाजपचे काम केले नाही
Pramod Gharde Rebel Candidate, Pramod Gharde Welcome banner,
भाजप बंडखोराने लावले फडणवीसांचे स्वागत फलक, बावनकुळेंचेही छायाचित्र
fitness programme multi-exercise combination (MEC-7). kerala
विश्लेषण : केरळमध्ये व्यायाम प्रकारातून इस्लामी मूलतत्त्ववादी प्रचार? नेमका वाद काय? भाजपबरोबर डाव्यांचाही विरोध?

हेही वाचा – दिल्लीचा अर्थसंकल्प रामराज्य आणि रामायणाने प्रेरित; लोकसभा निवडणुकीत होणार फायदा?

देवधर यांच्या नावाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पसंती आहे. देवधर हे पुण्यातील राजकारणात आजवर सक्रिय नव्हते. मात्र, गेल्या तीन ते चार महिन्यांपासून त्यांनी विविध कार्यक्रमांचा धडाका लावला आहे. त्यामध्ये त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विविध कार्यक्रमांना हजेरी लावण्याबरोबरच प्रामुख्याने पुण्यातील अल्पसंख्याक समाजातील लोकांच्या भेटीगाठी वाढविल्या आहेत.

मोहोळ हे पुण्याच्या राजकारणात अनेक वर्षांपासून सक्रिय आहेत. महापौरपदाच्या कार्यकाळात त्यांनी पुण्यातील लोकसंपर्क वाढवला आहे. त्यामुळे लोकसंपर्काबाबत मोहोळ यांची बाजू देवधरांपेक्षा वरचढ आहे. मोहोळ यांनीही विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करून वातावरण निर्मिती केली आहे. मोहोळ हे भाजपचे प्रदेश सरचिटणीस असल्याने त्यांचा राज्यस्तरावरील नेत्यांशी संपर्क वाढला आहे. ते सध्या सातत्याने दिल्लीतील नेत्यांच्या संपर्कात आहेत. ही बाब लक्षात आल्यावर देवधर यांनीही दिल्लीतील संवाद आणखी वाढवला आहे.

हेही वाचा – भाजपाच्या लोकसभा यादीतील एकमेव मुस्लिम चेहरा; कोण आहेत अब्दुल सलाम?

एकाच भागातील दोन खासदार द्यायचे का?

मोहोळ आणि राज्यसभेच्या खासदार मेधा कुलकर्णी या दोघांचेही कार्यक्षेत्र कोथरूड विधानसभा मतदारसंघ आहे. त्यामुळे पुण्यासाठी एकाच भागातील दोन खासदार द्यायचे का? यावर सध्या भाजपमध्ये खल सुरू आहे. ब्राह्मणेतर उमेदवार दिल्यास भाजपचा पारंपरिक मतदान पुन्हा नाराज होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे मोहोळ यांच्या उमेदवारीबाबत प्रश्न निर्माण झाल्याचीही चर्चा सुरू झाली आहे.

भाजपने सुनील देवधर यांना उमेदवारी देणे हे काँग्रेसच्या दृष्टीने पथ्यावर पडणार आहे. देवधर हे उमेदवार असतील तर काँग्रेसकडे कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर यांचा पर्याय असणार आहे. मात्र, मोहोळ हे उमेदवार असतील तर काँग्रेसपुढे उमेदवारीबाबत प्रश्न उपस्थित होणार आहे. माजी आमदार मोहन जोशी, काँग्रेसचे प्रभारी शहराध्यक्ष अरविंद शिंदे हे निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत.

Story img Loader